Nandurbar News : नागाई साखर कारखान्याचे मेन्टेनन्स कामकाज बंद; शेतकऱ्यांकडून बेमुदत धरणे आंदोलन

Farmers protesting on Saturday to get sugarcane bills.
Farmers protesting on Saturday to get sugarcane bills.esakal
Updated on

Nandurbar News : नागाई शुगर प्रायव्हेट लिमिटेड, पुरुषोत्तमनगर साखर कारखान्याचे गाळप हंगाम २०२३-२४ चे मेन्टेनन्स कामकाज शेतकऱ्यांकडून बंद पाडले असून, कारखाना स्थळी शेतकऱ्यांचे शनिवार (ता. ४)पासून बेमुदत धरणे आंदोलन सुरू करण्यात आले आहे.

जोपर्यंत ऊसबिले अदा केली जात नाहीत तोपर्यंत कारखाना सुरू न होऊ देण्याचा इशारा शेतकऱ्यांकडून देण्यात आला.(Maintenance operations of Nagai Sugar Factory closed protest by farmers nandurbar news)

नागाई शुगर प्रायव्हेट लिमिटेड, पुरुषोत्तमनगर येथे गाळप हंगाम २०२२-२३ ला शेतकऱ्यांनी ऊसपुरवठा केला होता. ऊसपुरवठा केल्याची बिले दहा महिने उलटूनही मिळाली नसून त्याबाबत वेळोवेळी आंदोलने व प्रशासकीय स्तरावर निवेदने देण्यात आली होती.

१६ ऑक्टोबरला प्रकाशा ते नंदुरबार जिल्हाधिकारी कार्यालय येथे आंदोलन करण्यात आले होते. आंदोलनादरम्यान पालकमंत्री अनिल पाटील यांनी भेट देऊन शेतकऱ्यांना पेमेंटसंदर्भात शासकीय स्तरावर प्रयत्न करीत असल्याबाबतचे आश्वासन दिले होते.

तसेच १७ ऑक्टोबरला जिल्हाधिकारी मनीषा खत्री, शहादा तहसीलदार दीपक गिरासे, नागाई देवी शुगरचे संचालक रवींद्र चौधरी, शिरीष चौधरी व शेतकऱ्यांचे शिष्टमंडळ यांची बैठक झाली असता २१ ते २७ ऑक्टोबरपर्यंत सर्व शेतकऱ्यांची ऊसबिले अदा करण्याचे सर्वांसमोर कबूल केले होते; परंतु २७ ऑक्टोबरपर्यंत एकाही शेतकऱ्याच्या खात्यावर पैसे आले नाहीत.

Farmers protesting on Saturday to get sugarcane bills.
Nandurbar Crime News : कुऱ्हाडीचा घाव घालत धनपूर येथे एकाचा खून

२८ ऑक्टोबरला शहादा तहसीलदारांची ऊस उत्पादक शेतकरी प्रतिनिधी यांनी भेट घेतली असता संचालक शिरीष चौधरी यांच्याशी दूरध्वनीने संपर्क केला. त्या वेळी त्यांनी परत १ नोव्हेंबरपर्यंत पेमेंट अदा करू, असे सांगितले. शेतकऱ्यांनी त्या वेळेसही संयम दाखवत वेळ मारून नेला व २ नोव्हेंबरपर्यंत वाट पाहिली; परंतु या वेळेसही शेतकऱ्यांच्या हाती निराशाच आली.

शनिवार सकाळी शेतकऱ्यांना नागाई शुगर प्रायव्हेट लिमिटेडची महत्त्वपूर्ण कागदपत्रे एका गाडीत भरून कुठेतरी घेऊन जात असल्याची माहिती मिळाली. माहिती मिळताच सर्व शेतकऱ्यांनी नागाई शुगर फॅक्टरी पुरुषोत्तमनगर स्थळी धाव घेतली. शेतकऱ्यांनी कारखाना साइटवर पाहणी केली. नवीन २०२४ गाळप हंगामाकरिता साखर कारखान्याचे मेंटेनन्स सुरू असून, कॉन्ट्रॅक्ट बेसने कामे केली जात आहेत व त्यांची बिले अदा केली जात आहेत.

तसेच बाहेरून मेंटेनन्ससाठी माणसे मागवली आहेत. शेतकऱ्यांची बिले अदा न करता कारखान्याचे कामकाज पुढे चालू कसे, यावरून निर्णय घेत शेतकऱ्यांनी कर्मचाऱ्यांना विनंती करून कारखान्याचे पुढील कामकाज बंद पाडले व जोपर्यंत पेमेंट मिळत नाही तोपर्यंत बेमुदत धरणे आंदोलन करण्याचे ठरवले.

Farmers protesting on Saturday to get sugarcane bills.
Nandurbar News : जप्त जमिनीचा 17 नोव्हेंबरला लिलाव

''दहा महिन्यांपासून सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनास जिल्ह्यातील एकही राजकीय नेत्याने उपस्थिती किंवा पाठिंबा दिला नसल्याची खंत या वेळी शेतकऱ्यांनी बोलून दाखवली. आम्ही शेतकरी आमचा हक्काचा पैसा मागत असून, मागील दहा महिन्यांतील सर्व सण कोरडे गेले आहेत. ऐन दिवाळी तोंडावर आली आहे. अद्याप पेमेंट नाही.''-सुनील संभू पाटील, शेतकरी, प्रकाशा

''आमचा हक्काचा साखर कारखाना म्हणून आम्ही येथे ऊस दिला; परंतु शेतकऱ्यांची पिळवणूक होत असून, शेतकरी मेटाकुटीला आला आहे. अद्यापही शेतकऱ्यांना पैसे मिळाले नाहीत तर आत्महत्येशिवाय दुसरा पर्याय नाही.''-रामकृष्ण चौधरी, शेतकरी, पाडळदा

Farmers protesting on Saturday to get sugarcane bills.
Nandurbar News : जप्त जमिनीचा 17 नोव्हेंबरला लिलाव

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.