Dhule News : ‘मालनगाव’ की ‘अक्कलपाडा’ कोणती योजना फायदेशीर? शहराला मुबलक पाण्याची गरज

शहराचा विस्तार होत असताना शहरातील नागरिकांना मुबलक पाणी उपलब्ध होण्यासाठी आताच्या पाणीपुरवठा योजना या अपुऱ्या पडत आहेत.
water
wateresakal
Updated on

Dhule News : शहराचा विस्तार होत असताना शहरातील नागरिकांना मुबलक पाणी उपलब्ध होण्यासाठी आताच्या पाणीपुरवठा योजना या अपुऱ्या पडत आहेत.

अशावेळी किमान पुढच्या ३० ते ४० वर्षांचा पाणी प्रश्न सोडवू शकेल अशा मोठ्या योजनांची शहराला नितांत गरज आहे.(Malangaon and Akkalpada city needs abundant water dhule news)

यात आधीच्या सत्ताधाऱ्यांनी मालनगाव धरणातून थेट पाणीपुरवठा योजनेस मंजुरी मिळविण्यात यश मिळवले होते. मात्र सत्ता बदलानंतर आत्ताच्या सत्ताधाऱ्यांनी या योजनेला ब्रेक लावत नव्याने अक्कलपाडा धरणातून पाणीपुरवठा योजना प्रस्तावित केली आहे. राजकीय वादात या दोन्ही योजना अडकत आहेत.

अशावेळी शहरासाठी दीर्घकालीन उपयुक्त योजना नेमकी कोणती यावर एकत्रित विचार करून, तज्ज्ञांशी चर्चा करून उपयुक्त योजना लवकर पूर्ण करून शहराला मुबलक पाणी उपलब्ध करून देण्याची गरज आहे.

शहराची उन्हाळ्यातील पाण्याची गरज लक्षात घेऊन गेल्या अनेक वर्षांपासून मालनगाव धरणात सुमारे ६९ एमसीएफटी पाणी आरक्षित करण्यात येत असते. हे पाणी कान नदीद्वारे आवर्तनातून टप्याटप्याने शहरासाठी आणले जाते.

मात्र नदीतून पाणी आणत असताना मोठ्या प्रमाणात पाणी वाया जात असल्याने यातील केवळ दहा ते पंधरा टक्के पाणी प्रत्यक्षात पोचून उपयोगात येते. अशावेळी पाण्याचे नुकसान टाळण्यासाठी तत्कालीन गटनेते ज्ञानेश्वर नागरे यांच्या सत्ताकाळात मालनगाव येथील धरणातून थेट पाणीपुरवठा योजना प्रस्तावित करत तिला मंजुरी मिळविण्यात यश मिळवले होते.

water
Dhule Municipality News : सत्ताधारी भाजपला शिवसेनेच्या ठाकरे गटाचे खुले आव्हान

मालनगाव ते साक्री हा नैसर्गिक सरळ उतार असल्याने कुठल्याही अडथळा विना हे पाणी पोचण्यास मदत होणार होती. तसेच मालनगाव धरणात आरक्षित पाण्यातील किमान ५० टक्के पाणी थेट पोचले तरी शहराला दररोज पाणी पुरवणे शक्य होणार असल्याचा दावा तत्कालीन गटाकडून करण्यात येत होता.

मात्र सुरवातीपासूनच या योजनेला आताच्या सत्ताधारी गटाकडून विरोध दर्शविला जात होता. दोन वर्षांपूर्वी झालेल्या सत्ता बदलात भाजपची सत्ता नगरपंचायतीवर आल्यानंतर त्यांनी मंजूर असलेल्या या योजनेला ब्रेक लावत अक्कलपाडा धरणातून नव्याने योजना प्रस्तावित केली. या योजनेच्या मंजुरीच्या अनेक प्रक्रिया पार पडणे अजूनही बाकी असल्याने ही योजना मंजूर होऊन प्रत्यक्षात कार्यान्वित होण्यास अजूनही बराच वेळ जाणार आहे.

''शहराचा दीर्घकालीन पाण्याचा प्रश्न सोडवणुकीसाठी मालनगाव धरणातून थेट पाणीपुरवठा योजना हाच योग्य पर्याय आहे. याद्वारे सरळ ग्रॅव्हिटीने पाणी येणार असल्याने विजेचा खर्च वाचेल. तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यात दरवर्षी पुरेसा पाऊस होत असल्याने धरणात नेहमी मुबलक पाणी असते.

water
Dhule Agriculture News : पश्चिम पट्ट्यातील रब्बीपीक धोक्यात; शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ

या पाण्यातून शहराचा पाणी प्रश्न सुटण्यास मदत होईल. मात्र केवळ राजकीय उद्देशाने या योजनेला थांबवण्यात आले आहे. अक्कलपाडा योजना कदाचित सत्तेच्या दबावात मंजूर होईल, मात्र योजनेचा विजेचा व देखभालीचा दीर्घकालीन खर्च भागविणे नगरपंचायतीला आर्थिकदृष्ट्या मोठे जिकरीचे ठरणार आहे.''- ज्ञानेश्वर नागरे, माजी नगराध्यक्ष, साक्री

''मालनगाव योजना मंजुरीस या लगतच्या १८ गावांचा विरोध असल्याने ही योजना थांबवली आहे. तसेच मालनगाव धरणात गरजेवेळी पुरेसे पाणी देखील उपलब्ध नसते. अशावेळी अक्कलपाडा धरणात मुबलक पाणी असल्याने व अंतर देखील कमी असल्याने या योजनेचा प्रस्ताव पाठवला आहे.

मंजुरीसाठी आमदार अमरीशभाई पटेल स्वतः लक्ष ठेवून आहेत. या योजनेमुळे विजेचा खर्च वाढणार असला तरी त्यासाठी सोलर प्रकल्प उभारत तो खर्च भागविला जाईल.''- बापू गीते, उपनगराध्यक्ष, नगरपंचायत, साक्री

water
Dhule News : अनधिकृत शाळा सुरू झाल्यास कारवाई; शिक्षणाधिकाऱ्यांवर बडगा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.