Dhule Uday Samant : नरडाणा ‘एमआयडीसी’त एका केमिकल कंपनीला जागा दिल्याच्या निषेधार्थ भारतीय जनता पक्ष पुरस्कृत नरडाणा एमआयडीसी संघर्ष समितीने उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या प्रतीकात्मक पुतळ्याचे जोडे मारो निषेध आंदोलनातून दहन केले. हा असमर्थनीय प्रकार आहे.
याउलट धुळे शहराची वाट लावणाऱ्या आणि जनतेला अडचणीत आणणाऱ्या निर्णयांबाबत निषेध करायचे ठरविले तर रोज भाजपच्या किती नेत्यांचे पुतळे जाळावे लागतील, अशा कडवट प्रहारातून शिवसेनेच्या शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख मनोज मोरे यांनी भाजपवर टिकेची तोफ डागली. (manoj more statement Effigy Burning of Industry Minister uday samant is unacceptable dhule news)
श्री. मोरे यांच्या निवेदनाचा आशय असा ः नरडाणा एमआयडीसी परिसरातील शेतजमिनींचे नुकसान करणारा रासायनिक उद्योग नकोच. परंतु, उद्योगमंत्र्यांचा प्रतीकात्मक पुतळा जाळून निषेध करणे योग्य नाही. भाजप पुरस्कृत नरडाणा एमआयडीसी संघर्ष समितीचे शेतकरी हितासाठी आंदोलन असल्याने आंदोलकांचे अभिनंदन करतो.
परंतु, आंदोलनाची पद्धत चुकीची आहे. शासन एखादा उद्योग स्थानिकांना डावलून देत असेल तर त्याला सनदशीर मार्गाने विरोध करून तो विषय हाणून पाडला पाहिजे. चुकीच्या कामाला विरोध झाला पाहिजे. परंतु, स्थानिक लोकप्रतिनिधींना विश्वासात न घेतल्याने उद्योगमंत्र्यांचा प्रतीकात्मक पुतळा जाळून केलेला निषेध हा वेगळ्याच दुखण्याचा त्रास जाणवतो.
हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?
आक्रमक आंदोलन शक्य
ज्या उद्योगांमुळे नरडाणा परिसरातील विहिरींना लालसर दूषित पाणी येते, तेथील शेतजमिनी खराब होत असतील, नागरिकांच्या आरोग्याला अपाय होत असेल तर सनदशीर मार्गाने भूमिका मांडल्यास हरकत नाही. नरडाणा येथील समितीचे बुधवारचे (ता. ३०) आंदोलन उद्योगमंत्री सामंत यांना ‘टार्गेट’ करण्यासाठी होते का, अशी शंका येते.
आंदोलन करायचे ठरविले तर गल्लोगल्ली भाजपच्या नेत्यांचे पुतळे जाळावे लागतील. त्यास धुळे शहराची लागलेली वाट हे कारण पुरेसे ठरेल. या शहराचे सिंगापूर करू, असे सांगून भाजपने शहर खड्डेपूर करून टाकले.
आठवडाभर पिण्याचे पाणी मिळत नाही. धुळेकर नरकयातना भोगत आहेत. ते लक्षात घेता शिवसेना आक्रमकतेने आंदोलन करू शकते. परंतु, नागरिकांना विकासाच्या माध्यमातून कसा दिलासा देता येईल, यासाठी पक्ष प्रयत्नशील आहे, असे श्री. मोरे यांनी म्हटले आहे
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.