जळगाव - पाचोरा येथील रहिवासी असलेल्या लिपिकाची बदली करून दिली, यासाठी मोबदला म्हणून तेथील महसूल विभागातील एका लिपिकाने एक लाखाची मागणी केली होती. ही रक्कम जळगाव - भुसावळ रस्त्यावरील हॉटेल बासुरीजवळ स्वीकारताना त्यास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने आज सायंकाळी सापळा रचून अटक केली.
तक्रारदार पाचोरा येथील रहिवासी आहे. त्यांची अमरावती येथून जळगावात बदली करण्यात आली आहे. या बदलीसाठी मदत केली म्हणून मंत्रालयातील महसूल विभागातील लिपिक ओमप्रकाश लखनलाल यादव (वय 32) (रा. रुम नं. 103, बी विंग, गोपाल हाईट्स, बदलापूर, जि. ठाणे वर्ग 3) यांनी एक लाखाची मागणी केली. "तू पैसे दिले नाही, तर तुझ्या नोकरीची वाट लावेल', अशी धमकीही देत होता. संशयित ओमप्रकाश यादव याने आज जळगावात आहे, असे सांगून पैशांची मागणी करीत धमकी दिली. याबाबत तक्रार यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला माहिती दिली.
|