धुळे : मराठा समाजाला आरक्षणाचा (Maratha community Reservation) लाभ मिळावा, यासाठी केंद्र सरकारने सकारात्मक भूमिका घ्यावी, अशी मागणी घेऊन मराठा महासंघ (Maratha Federation), राष्ट्रवादी काँग्रेस युवक आघाडीतर्फे (Nationalist Congress Youth Front) पत्रोत्तर मोहीम सुरू करण्यात आली आहे. एक पत्र (Letter) मराठा युवकांच्या उज्ज्वल भविष्यासाठी या मोहिमेत राज्यातून पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) यांना एक कोटी पत्र पाठविण्यात येणार आहेत. त्यातील एक लाख पत्रे धुळे जिल्ह्यातून पाठविण्यात येणार आहेत. त्याचा प्रारंभ शहरातील गल्ली सहामधील पवनपुत्र व्यायामशाळेजवळ झाला. (maratha reservation dhule district one lakh letter prime minister)
मराठा समाजाच्या आरक्षणासाठी मोठ्या प्रमाणात संघर्ष करण्यात आला. पण, कायदेशीर पातळीवर आरक्षणाबाबतचा राज्यकर्त्यांचा निर्णय अमान्य झाला. मराठा समाजाला आरक्षण द्यायचे असेल, तर त्यात घटनात्मक दुरुस्ती करावी लागेल, असे लक्षात आले. त्यामुळे आता केंद्र सरकारने सकारात्मक भूमिका घेऊन मराठा आरक्षणाचा लाभ मिळवून द्यावा, यासाठी मराठा क्रांती मोर्चा आणि मराठा महासंघातर्फे प्रयत्न केले जात आहेत. संघटनेच्या पातळीवर होत असलेल्या प्रयत्नांना आता राजकीय पक्षांचे पाठबळ मिळू लागले आहे. आरक्षणाच्या संदर्भात न्यायालयात योग्य भूमिका मांडली गेली नाही, असे म्हणत राजकीय पक्षांनी पहिल्यांदा परस्परांवर दोषारोप केले. त्यानंतर आता काही पक्ष मराठा आरक्षणाच्या बाजूने भूमिका घेऊन आरक्षणाची मागणी करीत आहेत.
उज्ज्वल भविष्यासाठी मोहीम
राष्ट्रवादी काँग्रेसच्या युवक आघाडीचे प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख यांच्या मार्गदर्शनाखाली पंतप्रधान मोदी यांना राज्यातून एक कोटी पत्र पाठविण्याचा निर्धार केला आहे. एक पत्र मराठा युवकाच्या उज्ज्वल भविष्यासाठी, अशी ही मोहीम राबविण्यात येत आहे. यात धुळे जिल्ह्यातून एक लाख पत्र पाठविण्याचा संकल्प राष्ट्रवादी काँग्रेसच्या युवक आघाडीने केला आहे. त्याचा प्रारंभ गुरुवारी धुळे शहरातील गल्ली सहामधील पवनपुत्र व्यायामशाळेजवळ झाला. सुमित पवार यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी कुणाल पवार, मयूर देवरे, वाल्मीक मराठे, स्वप्नील पाटील, निखिल मोमया, राजदीप काकड, प्रशांत बोरसे, कार्तिक मराठे, राजेंद्र चौधरी आदी उपस्थित होते.
एकत्र येण्याची गरज
मराठा समाजातील तरुणांच्या भविष्यासाठी आता एकत्र येण्याची गरज आहे. त्यांना शिक्षण क्षेत्रात, सरकारी नोकरीत आरक्षण मिळायला पाहिजे. त्यासाठी समाजातील तरुण-तरुणींनी या उपक्रमात सहभागी व्हावे, असे आवाहन पक्ष आघाडीचे प्रदेश सचिव सुमित पवार, सत्यजित सिसोदे, आशिष अहिरे, चिराग माळी, सागर पाटील, कल्पेश पाटील आदींनी केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.