सगळेच दिवस सारखे..तब्बल पंधरा वर्षांपासून घसा कोरडा

सगळेच दिवस सारखे..तब्बल पंधरा वर्षांपासून घसा कोरडा
water crisis
water crisiswater crisis
Updated on

वार्सा (धुळे) : धज्याआंबापाडा येथील नागरिकांना तब्बल पंधरा वर्षांपासून पिण्याच्या पाण्याची सोय नसल्याने, वणवण भटकंती करावी लागत आहे. प्रशासन आणि लोकप्रतिनिधी यांच्यामार्फत या वस्तीवर टाकीचे बांधकाम करण्यात आले आहे. पण टाकीत एक थेंब सुध्दा पाणी नसते. याबाबत वेळोवेळी तक्रारी करूनही प्रश्न प्रलंबित आहे. पंधरा वर्षांनंतरही पाण्याचा प्रश्‍न सुटू शकलेला नाही.

या परिसरात मे ते जून दरम्‍यान तीव्र पाणीटंचाई जाणवते. अक्षरशः विहिरीने तळ गाठलेला असतो. पाण्यासाठी १ ते २ किलोमीटर अंतरावर जाऊन पाणी आणावे लागते. शासनामार्फत घर तेथे नळ असे उपक्रम राबवण्यात येतात. परंतु येथील पाड्यावरील नागरिकांचा घसा कोरडाच असतो. या पाड्यावर १५ वर्षापूर्वी प्रशासन आणि लोकप्रतिनिधी यांच्या मार्फत १००० लीटर क्षमतेची टाकीचे बांधकाम करण्यात आले आहे. टाकीचे बांधकाम झाले. विहीर ते टाकीपर्यंत पाइपलाइन केली. पण भोंगळ कारभारामुळे टाकीत थेंब भर पाणी नाही. फक्त कागदोपत्री नोंद करून, ग्रामस्‍थांचा घसा कोरडा आहे.

water crisis
मे, जूनमध्ये रेशन धान्याचे मोफत वाटप

एकही प्रतिनिधीकडून सोय नाही

ग्रामस्‍थांकडून नियमाने पाणी पट्टी वसूल केली जाते. पण घरोघरी नळ पाणीपुरवठा योजना ही फक्त कागदावरच आहे. लोकप्रतिनिधी यांच्या कडून निवडणूक आली की, तुमची पाण्याची सोय करून देऊ असेल आश्वासन देतात. पण प्रत्यक्षात १५ वर्षात एकही प्रतिनिधीला किंवा प्रशासनाला सोय करता आली नाही. हे मोठं दुर्दैव आहे. लोकप्रतिनिधी व प्रशासनातील अधिकारी यांच्याकडे वेळोवेळी तक्रार देऊनही, दुर्लक्ष करीत आहे. यामुळे या भोंगळ कारभारामुळे ग्रामस्‍थ त्रस्त आहेत. वेळीच पाण्याची सोय करावी, अशी अपेक्षा कांतीलाल देसाई, जत्र्या मावळी, बापू देसाई, दिलीप बिलकूळे, रामदास पवार, शिवाजी कुवर यांच्यासह ग्रामस्‍थांनी केली आहे.

जवळपास १० ते १५ वर्षे उलटून झाली. टाकी तर बांधली. पण त्यात पाणीच नाही. टाकीपर्यंत पाइपलाइन देखील केली. पण पाण्याचा प्रश्न राहूनच गेला. तेव्हा पासून थेंब भर पाणी नाही. हा फक्त देखावा आहे.

- अतुल बिलकुळे, ग्रामस्‍थ.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.