धुळे : जिल्ह्यात ‘ब्रेक द चेन’अंतर्गत (Break the chain) असलेल्या निर्बंधांनुसार वैद्यकीयसेवा वगळता अत्यावश्यक सेवांसाठी जीवनावश्यक वस्तूंची दुकाने सकाळी सात ते ११ दरम्यान सुरू ठेवण्याची मुभा आहे. आता या वेळेत अंशतः बदल झाला आहे. त्यानुसार सोमवार (ता. २४)पासून सकाळी नऊ ते दुपारी एक, या वेळेत दुकाने खुली असतील. जिल्हाधिकारी संजय यादव (Collector sanjay yadav) यांनी शनिवारी (ता. २२) त्यासंबंधीचा सुधारित आदेश काढला. हा आदेश महापालिका व पालिका क्षेत्रापुरता मर्यादित आहे. ग्रामीण भागात पूर्वीच्या निर्धारित वेळेनुसार दुकाने (Dhule lockdown) सुरू असतील. (collector-sanjay-yadav-lockdown-new-rules_
कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी लॉकडाउन लागू आहे. जीवनावश्यक वस्तू, किराणा, दूध व दुग्धजन्य पदार्थ, भाजीपाला, फळे, अंडी, मटण, चिकन, मासे विक्री, तसेच कृषी संबंधित सर्व सेवा, दुकाने, पशुखाद्य विक्री केंद्रे सुरू ठेवण्यास सकाळी सात ते अकरापर्यंतची मुदत दिली. मात्र, यादरम्यान बाजारपेठेत मोठी गर्दी होत होती. गर्दीमुळे कोरोनाचा संसर्ग अधिक वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. तसा अहवाल जिल्हा पोलिस अधीक्षक व मनपा आयुक्तांकडून सादर झाला. तसेच व्यापाऱ्यांनी दुपारपर्यंत दुकाने सरू ठेवण्यास परवानगीची मागणी जिल्हा प्रशासनाकडे केली. त्यानुसार जिल्हाधिकारी संजय यादव यांनी जिल्ह्यातील नागरी क्षेत्रामध्ये अत्यावश्यक बाबींसाठी वेळेमध्ये अंशतः बदल करण्याचा निर्णय घेतला.
आजपासून एकपर्यंत वेळ निश्चित
आजपासून अत्यावश्यक सेवेतील आस्थापनांसाठी सकाळी नऊ ते दुपारी एक, ही वेळ निश्चित केली आहे. याबाबत संबंधित यंत्रणेला आदेश दिले आहेत. इतर नियमांमध्ये कोणतीही शिथिलता दिलेली नाही. नवीन आदेशानुसार धुळे महापालिका, शिरपूर पालिका, दोंडाईचा पालिका, शिंदखेडा व साक्री नगरपंचायत क्षेत्रातील जीवनावश्यक वस्तूंची दुकाने आता सकाळी नऊ ते दुपारी एक, या वेळेत उघडी ठेवता येतील. आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध कारवाई होणार आहे.
दोन हजार व्यापाऱ्यांचा व्यवसाय बंद
कोरोना लॉकडउनमुळे अनेक व्यवसाय बंद आहेत. गेल्या दीड वर्षांपासून ही परिस्थिती असल्याने व्यापारी आर्थिक संकटात सापडले आहेत. त्यामुळे नियम व वेळेचे बंधन घाला; पण दुपारी दोनपर्यंत दुकाने सुरू ठेवण्यास परवानगी द्या. आर्थिकचक्र सुस्थितीत आणण्यासाठी व्यावसायिकांना पॅकेज जाहीर करावे, अशी मागणी धुळे व्यापारी महासंघाने गेल्या आठवड्यात प्रशासनाकडे केली होती. लॉकडाउनमुळे विक्रेते अडचणीत आले आहेत. कोरोनामुळे अनेक दुकाने मार्च, एप्रिल, मेमध्ये बंद होते. वर्षभरात साधारण ५० टक्के व्यवसाय याच तीन महिन्यांत होतो. परंतु लॉकडाउनमुळे जिल्ह्यातील सुमारे दोन हजार व्यापाऱ्यांनी व्यवसाय बंद ठेवला. पुढे पावसाळा सुरू होत आहे. त्यामुळे अर्थचक्राला गती मिळावी, यासाठी दुकाने सुरू ठेवण्यास परवानगी मिळावी, अशी मागणी व्यापारी महासंघाचे प्रतिनिधी नितीन बंग, सुनील रुणवाल, उमेश जैन यांनी जिल्हाधिकारी संजय यादव यांची भेट घेत केली होती.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.