धुळे जिल्हा आजपासून ‘अनलॉक’; सायंकाळनंतर निर्बंध कायम

धुळे जिल्हा आजपासून ‘अनलॉक’; सायंकाळनंतर निर्बंध कायम
unlock dhule
unlock dhulesakal
Updated on

धुळे : राज्य शासनाच्या निकषाप्रमाणे कोरोना पॉझिटिव्हिटी (Coronavirus) रेट पाच टक्क्यांपेक्षा कमी, तसेच ऑक्सिजनयुक्त बेडचा वापर २५ टक्क्यांपेक्षा कमी असल्याने जिल्हा सोमवार (ता. ७)पासून ‘अनलॉक’ होत (Dhule unlock) आहे. यात सकाळी सात ते सायंकाळी पाचपर्यंत काही निर्बंधांसह आर्थिक व सामाजिक व्यवहार खुले राहतील. नंतर विविध निर्बंध कायम राहतील, अशी माहिती (Collector sanjay yadav) जिल्हाधिकारी संजय यादव, निवासी उपजिल्हाधिकारी संजय गायकवाड यांनी दिली. त्यांनी तसे आदेशही काढले. (dhule-coronavirus-lockdown-today-unlock-district-collector-order)

unlock dhule
झुलत्या पुलावर टवाळखोरांचा उच्छाद

वैद्यकीय सेवा, मेडिकल दुकाने, चित्रीकरण (शूटिंग), बांधकामे, कृषी केंद्र, निर्यात, कारखाने, ई- कॉमर्स संस्था व सेवा नियमित सुरू राहतील. मात्र, अत्यावश्‍यक सेवेत नसलेली दुकाने, व्यापार, व्यवहार सकाळी सात ते सायंकाळी पाचपर्यंतच सुरू राहतील. मॉल, चित्रपटगृहे, नाट्यगृहे क्षमतेच्या ५० टक्क्यांपर्यंत सुरू राहतील. सर्व रेस्टॉरंट रात्री नऊपर्यंत बैठक व्यवस्थेच्या ५० टक्के क्षमतेने अन्नपदार्थांच्या सेवेसाठी सुरू राहतील. होम डिलिव्हरी सुविधा सुरू ठेवण्यास परवानगी असेल.

विविध सूचना

मैदाने, वॉकिंग, जॉगिंग ट्रक पहाटे पाच ते सकाळी नऊपर्यंत, दुपारी चार ते सायंकाळी सहापर्यंत सुरू राहतील. सर्व खासगी कार्यालये सायंकाळी पाचपर्यंत सुरू ठेवण्यास मुभा आहे. शासकीय व खासगी कार्यालयांतील उपस्थिती शंभर टक्के ठेवण्यास परवानगी आहे. जीम, व्यायामशाळा पहाटे पाच ते सकाळी नऊ आणि सायंकाळी पाच ते रात्री नऊपर्यंत सुरू ठेवता येईल. सामाजिक, सांस्कृतिक, मनोरंजनाचे कार्यक्रम सायंकाळी पाचपर्यंत कार्यक्रम स्थळाच्या ५० टक्के क्षमतेनुसार आणि अधिकाधिक शंभर व्यक्तींच्या उपस्थितीत घेता येतील.

unlock dhule
जळगाव जिल्‍हा पूर्ण क्षमेतेने अनलॉक; तरीही काही ठिकाणे ५० टक्‍के बंदच

विवाह सोहळ्याला बंधने

विवाह समारंभास अधिकाधिक शंभर व्यक्तींना उपस्थितीची परवानगी असेल. त्यासाठी तहसीलदारांकडून परवानगी घ्यावी लागेल. त्यासाठी उपस्थित राहणाऱ्या व्यक्तींकडे विवाह समारंभाच्या तीन दिवसांपूर्वीची आरटीपीसीआर किंवा ॲन्टिजेन टेस्टचा अहवाल बंधनकारक असेल. यात आचारी, वाढपी, इतर कर्मचाऱ्यांना ही अट लागू आहे. विवाह समारंभावेळी प्रत्येकाची ऑक्सिजन पातळी, शरीराचे तापमान तपासून कोरोनासंबंधी नियमांचे पालन करावे लागेल. अंत्यविधी व त्यानंतरच्या विधीसाठी अधिकाधिक ५० व्यक्तींची उपस्थिती असावी. त्यात कोरोनासंबंधी नियम पाळले जावे. जमावबंदी व संचारबंदी लागू नसेल. सलून, ब्यूटिपार्लर, स्पा, मसाज, वेलनेस सेंटर सकाळी सात ते सायंकाळी पाचपर्यंत सुरू राहतील. त्यात ग्राहकांची ५० टक्के क्षमतेची मर्यादा पाळावी लागेल, अशा सेंटरमध्ये एसी वापरता येणार नाही.

सार्वजनिक बससेवा

सार्वजनिक वाहतुकीतील बससेवा शंभर टक्क्यांपर्यंत नियमित सुरू ठेवता येईल. मात्र, उभ्याने प्रवासास बंदी असेल. मालवाहतूक नियमित सुरू राहणार असली, तरी तीन व्यक्ती वाहनांसोबत असतील व त्यांना नियम लागू राहतील. कार, टॅक्सी, बस, रेल्वेने पाच स्तरावरील जिल्हे वगळता अन्य जिल्ह्यांसाठी ई- पास बंधनकारक असेल. जिल्ह्यात सायंकाळी पाचपर्यंत खुल्या असलेल्या दुकानांमधील कामगार, कर्मचारी आदींना घरी सायंकाळी सहापर्यंत पोहोचावे लागेल. नंतर त्यांना ये-जा करण्यासाठी परवानगी नसेल, असे आदेशात नमूद आहे. परिस्थिती नियंत्रणात नव्हे, तर सुधारण्याच्या टप्प्पात राहील, यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत, असे आवाहन जिल्हाधिकारी यादव यांनी केले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()