बिबट्याचा हल्‍ला..डोंगरावर आढळला शेतकऱ्याचा मृतदेह

बिबट्याचा हल्‍ला..डोंगरावर आढळला शेतकऱ्याचा मृतदेह
Leopards attack
Leopards attacksakal
Updated on

साक्री (धुळे) : दरेगाव (ता. सटाणा) येथील शेतकऱ्यावर (Farmer) दिघावे (ता. साक्री) शिवारातील पिसोळबारी परिसरात बिबट्याने हल्ला (Leopards attack) करत ठार केल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. नंदकिशोर धोंडू पवार (वय ४१, रा. दरेगाव, ता. सटाणा) असे बिबट्याच्या हल्ल्यात मृत झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. (farmer-death-Leopards-attack-in-hills-aria)

Leopards attack
जन्मतः दोन्ही पायाने अधू..काम करणारे हातही गेले; पत्‍नी कडेवर घेवून जाते तेव्हा..

पवार हे कुटुंबीयांसह नांदीन (ता. बागलाण) शिवारात वास्तव्यास असून, ते शुक्रवारी (ता. ४) सायंकाळी उशिरा हिरो होंडा मोटारसायकलने पिसोळबारीमार्गे दिघावे येथे अंडी घेण्यासाठी गेले होते. अंडी घेऊन घराकडे निघाले असता, दिघावे येथील पिसोळबारीमध्ये त्यांच्यावर बिबट्याने हल्ला करत त्यांना ओढत ओढत डोंगरावर नेत पवार यांच्या शरीराचे लचके तोडत ठार केले.

घरी आले नाही म्‍हणून शोधाशोध

अंडी घेण्यासाठी गेलेले नंदकिशोर पवार हे रात्र उलटूनही घरी न आल्याने कुटुंबीयांनी त्यांचा शोध सुरू केला असता, त्यांची मोटारसायकल पिसोळबारी घाटाच्या पायथ्याशी बेवारस आढळून आल्याने व घटनास्थळी ओढून नेल्याच्या खुणा मातीत दिसल्याने त्यांचा परिसरात शोध घेतला. त्यांचा मृतदेह छिन्नविच्छिन्न अवस्थेत डोंगरावर आढळून आला. या खळबळजनक घटनेची माहिती जायखेडा पोलिस व ताहाराबाद, पिंपळनेर वनपरीक्षेत्र यांना मिळताच जायखेडा पोलिस ठाण्याचे निरीक्षक श्रीकृष्ण पारधी व वनपरीक्षेत्र अधिकारी नीलेश कांबळे कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी दाखल होत घटनेचा पंचनामा केला. दरम्यान, पवार यांच्या मागे एक मुलगा, मुलगी, पत्नी असा परिवार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.