देऊर (धुळे) : कांदा हे अतिशय संवेदनक्षम पीक आहे. यंदा बियाणे, रोप लागवडीपासून थेट काढणी अवस्थेपर्यंत कांदा उत्पादक शेतकरी चिंतेतच आहे. त्यातच उन्हाळ कांदा रोपांची झालेली फसवणूक अवकाळी पाऊस, बदलते हवामान, फवारणी, खते, निंदणी तुलनेत कांदा उत्पादन खर्च जास्तीचा झाला आहे. मात्र उत्पादीत विक्री मालाला अपेक्षित भाव नाही. बाजारपेठेतील होणारी घसरणीमुळे शेतकरी धास्तावले आहेत.
कांदा पिकाला जुगार म्हटले जाते. मात्र यंदा खर्चाच्या तुलनेत भाव आवश्यक आहे. जिल्ह्यात यंदा बळीराजाच्या कांदा पिकाला साडेसातीचे ग्रहण लागले आहे. कांद्याच्या भावात मोठी चढउतार असते. भाव कोसळले की शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसतो. मात्र इतर पिकांची होणारी परवड, नुकसान ऐवजी कांदा लागवडीचा शेतकऱ्यांनी पर्याय निवडला. अर्थात जुगाराच्या माध्यमातून नशिब आजमावले आहे.
दरवर्षी जिल्ह्यात कांद्याची लागवड वाढत आहे. उत्पादन खर्च कमी करून अधिक उत्पादन काढणे गरजेचे आहे. मात्र हल्ली उत्पादन खर्च हा वाढत आहे. पूर्वी 15 ते 20 रुपये किलो कांदा गेला तरी शेतकऱ्यांना परवडत होते. आता हा दर परवडत नाही. उत्पादन खर्च वाढल्याने एका दृष्टचक्रात कांदा पीक सापडले आहे.
बियाणेत फसवणूक झाली उघड
यंदा उन्हाळ कांदा बियाण्यांचा मोठा तुटवडा होता. त्याचा गैरफायदा बनावट कंपन्यांनी घेतला. तब्बल 5 हजारांवर अधिक भावाने शेतकऱ्यांनी बियाणे घेतले. हे बियाणे खरेदी केले उन्हाळ कांद्याचे अन् निघाले खरिपाचे यामुळे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. हा माल साठवणूक करता येणार नाही. या पार्श्वभूमीवर बहुतांश शेतकऱ्यांना नाईलाजाने कांदा विक्री करावा लागत आहे. काही ठिकाणी बियाणे उगवले नाही. जे उगले त्या कांद्याला डेंगळे आल्याने शेतकऱ्यांची फसवणूक झाल्याचे उघड झाले.
निर्यात महत्वाची
कांदा बाजारपेठेला निर्यात महत्वाची आहे. या पार्श्वभूमीवर केंद्र व राज्य सरकारने शेतकऱ्यांना बाजारपेठेतील बाजारभाव दररोज अपडेट मोबाईलवर मेसेज करून निर्यातीकडे लक्ष द्यावे. भाव घसरणार नाही. याकडे विशेष लक्ष केंद्रित करावे अशी मागणी आहे. स्थानिक बाजारपेठ यासाठी तेवढीच महत्त्वपूर्ण आहे. म्हसदी, देऊर, नेर, कुसुंबासह मोराणे प्र.ल. येथे थेट ओपन ट्रॉली कांदा खरेदी करायला सुरूवात झाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना तालुक्यातच बाजारपेठ उपलब्ध झाली आहे. जेथे भाव जास्त तेथे शेतकरी कांदा विक्री करतील. भाव घसरणीमुळे बहुतांश शेतकऱ्यांनी कांदा चाळीत साठवणूक करण्याकडे लक्ष दिले आहे. तसे नियोजन सुरू आहे. बांधावर थेट खरेदी बहुतांश व्यापारी यंदा बांधावर थेट कांदा खरेदी करणार असल्याची चर्चा आहे. संबंधित व्यापारांनी संपर्क वाढवला आहे. एजंट मार्फत निरोप दिले जात आहे.एकंदरीत स्पर्धेत भाव मिळावेत हीच अपेक्षा शेतकऱ्यांना आहे.
संपादन ः राजेश सोनवणे
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.