साक्री (धुळे) : कोरोनाच्या कालावधीत (Coronavirus lockdown) डबघाईला जात असलेल्या एसटी महामंडळाने १ जुन २०२० पासून राज्यात मालवाहतुकीस (Maharashtra state road transport service) सुरुवात केली. या मालवाहतुकीतून एसटी महामंडळास आर्थिक लाभ होत असला तरी एसटी चालकांसाठी ही माल वाहतुक सेवा डोकेदुखी ठरत आहे. एकावेळी चालक मालवाहतुकीसाठी घेवून गेलेले वाहन सात ते आठ दिवस अडकून राहत आहे. तसेच जेथे वाहन उभे असते तेथून परतीचा माल लगेच मिळत नसल्याने चालकांना (MSRTC bus driver) अडचणींचा सामना करावा लागत आहे. मालवाहतुकीतून एसटी तारली जात असली तरी चालक मात्र बेहाल होत असल्याचेच चित्र निर्माण झाले आहे. (dhule-MSRTC-bus-Freight-service-driver-not-satisfide)
एसटीने प्रवासी वाहतुक बरोबर मालवाहतुकीला दमदार सुरवात केली आहे. काही जुन्या बसगाड्यांचे रुपांतर मालवाहतुक ट्रकमध्ये करण्यात आले. सध्या बाजारामध्ये असलेल्या मालवाहतुकीच्या दराप्रमाणे एसटी महामंडळ आपले दर आकारत आहे. या माल वाहतुकीला चांगला नागरिकांकडून प्रतिसाद मिळत आहे. धुळे विभागात मालवाहतुकीसाठी ४५ ते ५० ट्रक्स तयार करण्यात आले आहेत. परंतु काही दिवसांपासून ही मालवाहतुक चालकांसाठी डोकेदुखी ठरली आहे.
तिनशे रूपये भत्त्याची मागणी
जिल्ह्यातून इतरत्र माल घेवुन गेलेली गाडी ७ ते ८ दिवस परत येत नाही. त्या ठिकाणावरून लवकर परतीचा माल मिळत नसल्याने चालकांना प्रचंड अडचणी येत आहेत. याबाबत महाराष्ट्र एसटी वर्कर्स इंटक युनियनचे अध्यक्ष जयप्रकाश छाजेड व सरचिटणीस मुकेश तिगोटे यांनी महाव्यवस्थापक व परिवहन मंत्री यांच्यांशी पत्र व्यवहार देखील केला असुन मालवाहतुकिसाठी जाणाऱ्या चालकांना प्रतीदिन ३०० रूपये भोजन भत्ता देण्यात यावा; अशी मागणी वरिष्ठ पातळीवर केली आहे.
चालकांना नाहक त्रास
साक्री आगारास मालवाहतुकीच्या माध्यमातून जून २०२० ते ४ जून २०२१ पर्यंत ह्या एक वर्षाच्या कालावधीत ७७ हजार ५४३ किमी अंतर पार झाले आहे. तर उत्पन्न साधारण ३२ लाख ९३ हजार २३५ रुपये आले आहे. ही बाब कोरोनाच्या संकटकाळात दिलासादायक असली, तरी यात वाहन चालक यांना देखील दिलासा देण्यासाठी प्रयत्न व्हावेत; अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. मालवाहतुकीच्या ट्रकसाठी १०/२० साईजचे टायर असणे गरजेचे आहे. परंतू एसटी महामंडळाच्या मालवाहतुकीच्या ट्रक्सना ९/२० साईजचे टायर आहेत. अनेकदा १२ टन वजनापर्यंत देखील माल वाहनात असतो अशा वेळी टायर खराब होण्याची शक्यता असते अशा वेळी चालकांना चुक नसतांना आरोप किंवा दंड सोसावा लागतो.
एका विभागाचे मालवाहतुकीचे वाहन अन्य विभागात गेल्यास कर्मचाऱ्यांना दोन दिवसांपेक्षा जास्त थांबवू नये, अशा सुचना असतानाही प्रत्यक्षात चालकांना ७ ते ८ दिवस व त्यापेक्षा अधिक दिवस कर्मचाऱ्यांना थांबून राहावे लागत आहे. तसेच त्या ठिकाणी चालकांना राहण्याची नास्ता व जेवणाची व्यवस्था केली जात नाही ती व्हावी.
- वैभव सोनवणे, माजी अध्यक्ष, एस.टी.वर्कर्स इंटक संघटना, साक्री आगार.
चालकांना मालवाहतुक सुरु झालेल्या दिवसापासून तिनशे रूपये भत्ता देण्यात यावा. रस्त्यावर धावणारे वाहन तपासून चालकांकडे द्यावेत तसेच वाहनात बिघाड झाल्यास चालकांना आर्थिक भुर्दंड देणे तात्काळ बंद करावे.
- दिनेश नेरकर, राज्य कार्यकारिणी सदस्य, महाराष्ट्र एसटी वर्कर्स इटंक युनियन
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.