जिल्हा रुग्णालयातील एक रात्र..श्वासोच्छवासाच्या त्रासाचा आकांत; मातेचा हंबरडा अन्‌ निर्दयी म्हणत कोरोनाला देत होती शाप

covid center
covid center
Updated on

कापडणे (धुळे) : साहेब, काहीही करा. अॅडमिट करून ऑक्सिजन लावा. शहरातील कोणत्याही रुग्णालयात ऑक्सीजनसाठी वेटींग आहे. तेथील खर्चही परवडणारा नाही. तुम्हीच सोय करा. अशी आर्त विनवणी करणारे नातेवाईक. खोकला तसेच ऑक्‍सीजनच्या प्रतिक्षेत असलेले विव्हळणारे रुग्ण. नातेवाईकांचा आक्रोश अन्‌ बऱ्याच घडामोडींमुळे जिल्हा रुग्णालयातील रात्री मनाला सुन्न करणाऱ्याच ठरत आहेत. तर चक्करबर्डीत जळणारी प्रेत मने चर्रकिनी जाळत आहे. नको रे देवा आता असा अंत पाहू, असे अलगद ओठांवर तरळत आहे.

धुळे शहरातील जिल्हा रुग्णालयाच्या आवारात रात्रभर मुक्कामाची वेळ आली. अन्‌ तेथील अनुभवांनी वाटले, अशी वेळ दुश्मनावर येवू नये. कुठल्या जन्माच्या पापाचा बदला कोरोना व्हायरस बदला घेत आहे. असेच माझ्या सारख्या नास्तिकाला वाटून अंतःचक्षूला धारा लागल्यात.

त्या आईचा एकुलता एक अन..
त्या रात्री दोनची वेळ होती. नुकतीच मिसरुडी फुटलेला युवक श्वासोच्छवास घेण्यास त्रास होत असल्याने आकांताने ओरडत होता. सकाळपर्यंत त्‍याची प्राणज्योत मालवली होती. त्याच्या मातेने हंबरडा फोडला. निर्दयी म्हणत कोरोनाला शाप देत होती. ती माताही काय करणार एकलुत्याचा करुण अंत झाला होता.

ऑक्‍सीजनअभावी एकुलत्या मुलाचा बापही..
चारच दिवसांपूर्वी जुन्या जिल्हा रूग्णालतील कोवीड सेंटरमधून पती- पत्नीची सुटका झाली होती. रात्री साडेअकरानंतर अचानक ऑक्‍सीजनचे प्रमाण पंचावन्नवर आले. शहरात कुठेही ऑक्सिजन उपलब्ध झाला नाही. जिल्हा रूग्णालयात आणत असतांनाच मध्यरात्री एकला प्राणज्योत मालवली. दहावीतील एकलुत्या प्रणवचे पितृछत्र हरपले होते. पत्नीच्या डोळ्यादेखत पतीचा अंत झाला. सारे काही मनाला काफरे भरणारे होते.

रूग्णवाहीका चालकांमधील देवमाणस
रात्रभर जिल्हा रूग्णालयाबाहेर रुग्णवाहिका लागलेल्या असतात. रूग्णांची ने आण सुरु असते. त्यात नव्वद टक्के रूग्ण कोविडचेच. थांबलेली रूग्णवाहिका चालक रुग्णवाहिकेत डुलकी घेत असतात. कोविड रूग्णांच्या सेवेला होकार देतात. मनात कोणतीही भिती न ठेवणाऱ्या या चालकांमध्ये देवमाणूस पाहायला मिळत होता.

स्मशानभूमीतील आक्रोश
त्या दिवशी सकाळी साडेदहा- अकराला चार- पाच प्रेत एकाचवेळी धगधगत होती. लेकराबाळांचा आक्रोश आसमंत हेलावून सोडत होता. मदत करणारे ते कर्मचारी जिवावर उदार होत सर्व अंत्यसंस्कार करतांना मन सुन्न झाले. स्मशान शांततेत आक्रोश अन्‌ आक्रोश होता.

संपादन- राजेश सोनवणे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.