पासींग नागालॅंड, नंबर प्लेट हरियाणा; कंटेनरमध्ये ४७ गुरे

कमालच..पासींग नागालॅंड, नंबर प्लेट हरियाणा; कंटेनरमध्ये ४७ गुरे
transporting cattle
transporting cattlesakal
Updated on

शिरपूर (धुळे) : नोंदणी नागालँडची, नंबर प्लेट हरियाणाची, मालक औरंगाबादचा आणि चालक मध्यप्रदेशचा असा गोलमाल असलेला कंटेनर थाळनेर पोलिसांनी जप्त केला. बुधवारी (१९ मे) दुपारी शिरपूर- चोपडा रस्त्यावर भाटपुरा पोलिस चौकीजवळ केलेल्या कारवाईत कंटेनरसह त्यात कोंबलेली ४७ गुरे जप्त करण्यात आली. या मुद्देमालाची एकूण किंमत ३१ लाख रुपये आहे.

transporting cattle
एटीएम फोडण्याचा प्रयत्‍न फसला; मशीनचे नुकसान

राजस्थानकडून औरंगाबादकडे गुरांची अवैध वाहतूक सुरू असल्याची माहिती थाळनेर पोलीस ठाण्याचे सहाय्यक निरीक्षक उमेश बोरसे यांना मिळाली होती. त्यांनी सहकाऱ्यांसह शिरपूर- चोपडा रस्त्यावर भाटपुरा शिवारातील पोलिस चौकीजवळ सापळा रचला. दुपारी चोपड्याकडे निघालेल्या कंटेनर (एचआर ५५, एएच २७७९) ला संशयावरून थांबवले. वाहनाची तपासणी केली असता कंटेनरच्या मागील भागात चारही पाय बांधून ठेवलेली गाई व गोऱ्हे मिळून एकूण ४७ गुरे आढळली.

चार गुरांचा मृत्‍यू

त्यातील चार गुरांचा अन्न- पाण्याअभावी व गुदमरल्याने मृत्यू झाल्याचे आढळले. वाहन चालक अकबर गफार नियारगर (वय ३३, रा. मुलतानपुरा जि. मंदसौर) याला अटक करण्यात आली. त्याच्यासह कंटेनरचा मालक बद्रुद्दिन मिया शेख (रा. सिडको, औरंगाबाद) याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. वाहनाची कागदपत्रे तपासल्यावर त्याचा मूळ नोंदणी क्रमांक एनएल ०१, एसी ५५८६ असल्याचे निष्पन्न झाले. बनावट नंबर प्लेट लावून कत्तलीसाठी गुरांची अवैध वाहतूक केल्याचा हा प्रकार असल्याचे पोलिसांनी सांगितले. सहायक निरीक्षक उमेश बोरसे, उपनिरीक्षक नवनाथ रसाळ, हवालदार चव्हाण, प्रकाश मालचे, सिराज खाटीक, सुनील पगारे, कृष्णा पावरा गृहरक्षक दलाचे मुकेश कोळी, विशाल कोळी यांनी ही कारवाई केली. गुरांची सुटका करून त्यांना खर्दे (ता.शिरपूर) येथील राधाकृष्ण फाउंडेशनच्या गोशाळेत रवाना करण्यात आले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()