मुद्रांक विक्री बंद..कामे खोळंबली; केली जातेय अडवणूक

मुद्रांक विक्री बंद..कामे खोळंबली; केली जातेय अडवणूक
stamp paper
stamp paperstamp paper
Updated on

साक्री (धुळे) : तहसील कार्यालयाकडून शासकीय, बँक, न्यायालय आदी कामांसाठी आवश्यक असणाऱ्या मुद्रांक विक्रीस कोरोनाचा (Coronavirus) वाढता प्रादुर्भाव पाहता मनाई केल्याने साक्री उपकोशागार कार्यालयाकडून मुद्रांक देणे बंद केले आहे. यामुळे मुद्रांक विक्रेत्यांकडे (Stamp sales) चकरा मारणाऱ्या सामान्य नागरिक, महिला तसेच शेतकऱ्यांची कामे खोळंबली आहेत. सुधारित आदेश काढून मुद्रांक विक्री नियमितपणे सुरू करण्याची अपेक्षा सर्वसामान्य नागरिकांनी केली आहे. (Stamp sales stopped Obstruction is done)

शासनाच्या विविध शासकीय योजनांच्या पूर्ततेसाठी सामान्य नागरिक, शेतकरी, महिला, वीजग्राहकांना मुद्रांकाची गरज भासते. यासाठी नागरिकांना तहसील कार्यालय, उपकोशागार विभाग, मुद्रांक विक्रेते (स्टॅम्पवेंडर) यांच्याकडे मुद्रांक उपलब्धतेसाठी फेऱ्या माराव्या लागतात. या संदर्भात उपकोशागार कार्यालयाकडे विचारणा केली असता उपकोशागार अधिकारी श्रीमती भावसार यांनी कोरोनाची पार्श्‍वभूमी असल्याने प्रादुर्भाव वाढू नये म्हणून वरिष्ठांच्या आदेशानुसार आम्ही मुद्रांक देणे बंद केल्याचे सांगितले.

stamp paper
उसाच्या शेतात आढळला तरूणीचा मृतदेह; खुनाचे कारण अस्पष्‍ट

केली जातेय अडवणूक

शासनाच्या आदेशाप्रमाणे शेतीसंबंधी, महसुली, वीज या संदर्भातील कामांना कुठल्याही प्रकारे स्थगिती आदेश नाहीत. तरीही साक्री तहसील कार्यालय व उपकोशागार विभाग यांच्यामार्फत गरजूंची अडवणूक केली जात आहे. सध्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मृत व्यक्तींच्या नातेवाइकांना मृत व्यक्तींच्या पश्चात अनेक शासकीय कामांसाठी हेलपाटे मारावे लागतात. त्यांनाही याकामी मुद्रांकाची गरज पडते.

१५ मेपर्यंतच विक्री बंदचे आदेश

महाराष्ट्र शासनाच्या ‘ब्रेक द चेन’बाबत निर्बंध १५ मेपर्यंत लागू होते. तहसील कार्यालय, साक्री येथे प्रतिज्ञापत्रावर स्वाक्षरी घेण्यासाठी नागरिकांची मोठ्या प्रमाणावर गर्दी होत असल्याने कोरोना विषाणूचा संसर्ग व प्रादुर्भाव होण्याची शक्यता असल्याने कार्यालयामार्फत स्टॅम्पवेंडर किंवा इतर नागरिकांना देण्यात येणारे स्टॅम्प कोणत्याही स्टॅम्पवेंडरना या कार्यालयाचे पूर्वपरवानगीशिवाय देऊ नये, असे म्हटले असून, १५ मे उलटून गेल्यानंतरही अद्याप मुद्रांक विक्रीसंदर्भात निर्णय न झाल्याने मुद्रांक विक्रेते तसेच गरजूंना मुद्रांक उपलब्धतेसाठी फिरावे लागते आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.