तऱ्हाडी (धुळे) : सूर्य आग ओकत असताना तापमान ४० अंश सेल्सीयेसच्याही पुढे जात आहे. अंकलेश्वर बऱ्हाणपूर राष्ट्रीय महामार्ग व इतर राष्ट्रीय महामार्गावरील झाडांची मोठ्या प्रमाणात झालेली कत्तल त्यामुळे हरवलेली सावली व सावलीतील थंड पाण्याचे माठ, रांजण हे बेपत्ता झाल्याने प्रवाशांची अवस्था दयनीय होत असून प्रवाशांची तहान भागवणे अवघड झाले आहे. प्रवाशांना पाणपोईची प्रतीक्षा आहे.
धुळे जिल्ह्याच्या ग्रामीण भागाकडे जाणाऱ्या प्रत्येक महामार्गाचे रुंदीकरण व नूतनीकरण करून विकास करण्यात येत असताना या विकासाच्या नावाखाली शेकडो वर्षापूर्वीचे हिरवी झाडे नष्ट करण्यात आली. त्यामुळे सर्वसामान्य प्रवाशांची आधार ठरणारी सावली हरवली. त्या सोबतच रोडलगतची छोटे व्यावसायिक हे त्यामुळे दूर गेले. आणि सोबत थंड पाण्याची पाणपोई बंद झाली आणि प्रवाशांची विश्रांती स्थळे हिरावल्या गेलीत.
घशाला कोरड
आता उडणारा धूळ व तापलेला रस्ता यामुळे प्रवाशांची लाहीलाही होत असून पाण्यासाठी इतरत्र भटकंतीची वेळ प्रवाशांवर येत आहे. तर काही प्रवासी भुर्दण्ड सहन करत पाणी बाटल्यावर तहान भागवत आहे पण हे सर्वांना परवडणारे नाही. विविध बसस्थानकावर प्रशासनाने प्रवाशांसाठी पाण्याची कुठलीच योजना आखलेली नसून अति उष्णतेमुळे जीवाची लाहीलाही होत असताना येथील पाणी प्रश्न पेटलेला असून घशाची कोरड भागविण्यासाठी प्रवाशांना भटकंती करावी लागत आहे. अशा अवस्थेत शिरपूर, शाहदा तसेच वाघाडी, अर्थे, वरूळ वडाळी या बसस्थानकावर तरी पाणपोई सुरू व्हावी ही अपेक्षा वावगी नाही.
बसस्थानकातही पाणपोई कोरडीठाक
बसस्थानकात पाणपोई कोरडीठाक असल्याने प्रवाशांना पिण्याच्या पाण्यासाठी मोठी गैरसोय होत आहे. बसस्थानकावर प्रवाशांना तर काही वेळेस पाणी न मिळाल्यास त्यांना विकतचे पाणी प्यावे लागते. त्यासाठी बसस्थानकावर पाणी बाटली विक्रेते बसमध्ये घुसून मोठ- मोठ्याने ओरडून पाणी विकत आहे . मात्र त्यातही सर्वच प्रवासी धनिक नसतात त्यामुळे त्यांना मुख्य रस्ता ओलांडून बाहेर हॉटेल किंवा अन्य ठिकाणी आपली तहान भागविण्यासाठी धाव घ्यावी लागते. उन्हाळ्यात का होईना एस.टी.प्रशासन प्रवाशांना पाणी पाजते. गत वर्षी पेक्षा या वर्षी परिस्थिती वेगळी आहे. यामुळे प्रवाशांच्या सेवेखातर पाणपोई सुरू करण्यात याव्यात अशी अपेक्षा प्रवासी करत आहे.
संपादन- राजेश सोनवणे
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.