धुळे जिल्ह्यात केवळ २९ टक्के जलसाठा

धुळे जिल्ह्यात केवळ २९ टक्के जलसाठा
water storage in Dhule district project
water storage in Dhule district projectwater storage in Dhule district project
Updated on

सोनगीर (धुळे) : जिल्ह्यात लघु व मध्यम प्रकल्पात पाण्याचा उपयुुक्त साठा अवघा २९.५२ टक्के असून पाणी काटकसरीने वापरण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे. गेल्या वर्षी गेल्यावर्षी याच दिवशी ३१.५२ टक्के जलसाठा होता. (water storage in Dhule district project)

water storage in Dhule district project
Video डॉक्‍टरांचे गाणे..रडणारे बाळ डॉक्‍टरांच्‍या कुशीतच झोपले

पाण्याची यंदाची ही स्थिती फारशी चांगली म्हणता येणार नाही. गेल्या वर्षी पाणीटंचाई (Water scarcity dhule district) जाणवली नाही. यंदा मे व जूनमध्ये ११० गावांना पाणीटंचाईची शक्यता वर्तविण्यात आली होती. पण दमदार पावसामुळे जिल्ह्यात सध्या फक्त ३७ गावांना पाणीटंचाई जाणवत असून ४१ हजार ८२ लोकांना टंचाईचा सामना करावा लागत आहे.

लघुप्रकल्‍पात १८ टक्‍के साठा

जिल्ह्यात लघू व मध्यम प्रकल्पात सध्या १४६.०८ दशलक्ष घनमीटर एवढाच जलसाठा आहे. नंदूरबार येथील लघु व मध्यम प्रकल्पात ८९.४९ दशलक्ष घनमीटर म्हणजे ३५.०५इतकाच जलसाठा आहे. धुळे जिल्ह्यात १२ मध्यम व ४७ लघुप्रकल्प आहेत. प्रकल्पांची क्षमता ४९४. ८६ दशलक्ष घनमीटर पाणी एवढी आहे. लघुप्रकल्पांची जलसंचयन क्षमता १२१.९७ दशलक्षघनमीटर एवढी असताना अवघा २२.८१ दशलक्षघनमीटर म्हणजे १८.७० टक्के जलसाठा शिल्लक आहे. मध्यम प्रकल्पाची जलसंचयन क्षमता ४७१. ४३ दशलक्ष घनमीटर असून सध्या १२३.२७ दशलक्षघनमीटर म्हणजेच ३३.०६टक्के जलसाठा आहे.

water storage in Dhule district project
जीवघेण्या लाटांशी आठ तास झुंज; पण सहकारींचा डोळ्यासमोर मृत्‍यू

अद्यापतरी टंचाईचा सामना नाही

धुळे जिल्ह्यातील १२ प्रकल्पांपैकी सर्वात जास्त २५.६५ दलघमी जलसाठा अनेर प्रकल्पात आहे. तर सर्वात कमी ०. ६६ दशलक्षघनमीटर जलसाठा कनोली प्रकल्पात तर सोनवद प्रकल्पात अवघा पाच टक्के जलसाठा आहे. बहूतांश लघुप्रकल्पात अत्यल्प जलसाठा आहे. ४७ पैकी सर्वच लघुप्रकल्पात कमी जलसाठा असून त्यातल्या त्यात ११ प्रकल्पात बऱ्यापैकी पाणी आहे. परिसरातील जामफळ, सोनवद, देवभाने, सातपायरी धरणात अत्यल्प साठा आहे. यंदाच्या या पावसाळ्यात चांगला पाऊस झाल्यास प्रकल्प भरतील व शेतकऱ्यांना अच्छे दिन येतील. कोरोना, वादळाने त्रस्त जनतेला अद्यापही पाणी टंचाईने ग्रासले नाही हे ही नसे थोडके.

३५ गावात विहिर अधिग्रहण

धुळे जिल्ह्यात ३७ गावांना पाणीटंचाई जाणवत असून त्यापैकी ३५ गावी विहीरी अधिग्रहण करण्यात आले असून दोन गावी टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. धुळे तालुक्यात ७, साक्री १६, शिरपूर ५, शिंदखेडा तालुक्यातील ९ गावांना पाणीटंचाई जाणवत आहे. त्यापैकी साक्री व शिंदखेडा तालुक्यातील प्रत्येकी एका गावात टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे.

प्रकल्प... उपलब्ध जलसाठा...टक्केवारी (आकडेवारी दलघमीमध्ये )

पांझरा….. १३.६४...…… ३८.२८

मालनगाव...४.२७...……. ३७.६९

जामखेडी….२.६७...……. २१.६४

कनोली….. ०.६६...……. ७.८१

बुराई……..३.१३...……. २२.०३

करवंद…...४.७७...……. २६.१२

अनेर…... २५.६५...…... ५२.०५

सोनवद….. ०.७७...……. ५.३६

अमरावती... ७.२७...…... ३४.२१

अक्कलपाडा..२१.६५...... २४.३७

वाडीशेवाडी…..१४.९५.... ४४.१०

सुलवाडे…….२३.८४...... ३६.६४

मध्यम प्रकल्प...१२३.२७..... ३३.०६

लघु प्रकल्प….. २२.८१....... १८.७०

एकूण जलसाठा…१४६.०८.... २९.५२

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.