सोनगीर (धुळे) : कर्मभूमी कुठेही असली, तरी जन्मभूमीशी नाळ प्रत्येकाची जोडलेली असते. अशा जन्मभूमी सोनगीरची (Songir gram panchayat) पण कर्मभूमी वेगवेगळ्या ठिकाणी असणाऱ्या सोनगीरकरांनी सामाजिक बांधीलकी जपत गावविकासात सहभाग असावा यासाठी प्रयत्न करीत आहेत. मुंबईच्या प्रागतिक विद्यालय मरोळ येथील शिक्षक मुरलीधर मोरे यांनी पुढाकार घेतला आहे. आम्ही सोनगीरकर हा विधायक कार्य करणारा गट स्थापन केला असून गटाशी बाहेरगावी नोकरी व व्यवसाय करणाऱ्या सर्वांना जोडून घेतले आहे. लवकरच प्रत्येक भिंतीवर शैक्षणिक माहिती रंगविण्याचा उपक्रम हाती घेतला आहे. (dhule-whatsapp-group-meet-and-songir-village-all-wall-educational-information-draw)
येथील विद्यार्थ्यांनी राज्य व केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत उत्तीर्ण होऊन गावाचे नाव रोशन करावे यासाठी अभ्यासिका सुरू करण्याचे आम्ही सोनगीरकरांसह काही स्थानिकांनी ठरवले. त्यासाठी ग्रामपंचायतीच्या माध्यमातून तीन ते चार खोल्या पाहिल्या. परंतु लॉकडाउनमुळे अभ्यासिका सुरू होऊ शकली नाही. आता मात्र लवकरच अभ्यासिका विद्यार्थ्यांच्या सेवेत दाखल होईल.
कोरोनामुक्तीसाठी झूम मिटींग
सोनगीर कोरोनामुक्त व्हावे यासाठी विविध माध्यमातून तसेच झूम बैठक घेऊन ग्रामस्थांना कोरोना जागृती, घ्यायची काळजी व मानसिक आणि शारीरिक काळजी घेण्याबाबत श्री. मोरे यांनी टीप्स दिल्या. प्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी आयुष मंत्रालय मान्यताप्राप्त अर्सेनिक अल्बम गोळ्या वाटप केल्या. धन्वंतरी मेडिकल फाउंडेशनचे अध्यक्ष व गिंदोडीया हॉस्पिटलचे संचालक डॉ. जगदिश गिंदोडीया यांनी गोळ्या दिल्या. एवढेच नव्हे तर आम्ही सोनगीरकर गटाचे मालेगावचे सदस्य रईस शेख यांनी मालेगाव काढा वाटप केला. केदारेश्वर मोरे, शिवनाथ कासार, ज्ञानेश्वर चौधरी, एल. बी. चौधरी, आरिफखाँ पठाण यांनी वाटपाचे नियोजन केले.
आता गावातील भिंती रंगविणार
आता संपूर्ण गावातील भिंतीवर शालेय अभ्यासक्रम रंगविण्याचा उपक्रम हाती घेतला आहे. भिंतीवर पाढे, गणिताची सुत्रे, विज्ञानाच्या महत्त्वाच्या व्याख्या, शास्त्रज्ञांची ओळख, राजकीय थोर नेत्यांची माहिती अशी अनेकविध माहितीचा खजिना रंगवला जाईल. त्यासाठी निधी जमा करण्याचे काम सुरू झाले आहे.
ज्या गावाने आपल्याला लहानाचे मोठे केले. मित्र, परिवार, नातेवाईक जोडले त्या जन्मगावाला विसरणे शक्य नाही. गावाचा विकास म्हणजेच आमचा विकास झाल्याचे आम्ही मानतो. गावातील प्रत्येक विद्यार्थ्यांला चांगले शिक्षण मिळून प्रगती व्हावी यासाठी प्रयत्न करणे हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे. मी सोनगीरकर असल्याचा मला अभिमान आहे.
- मुरलीधर मोरे, माध्यमिक शिक्षक व शिक्षक सेना मुंबई विभाग सरचिटणीस
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.