राज्याची सीमाबंदी तरीही परराज्यातून अनधिकृत बियाणांचा पुरवठा

राज्याच्या सीमाबंदी असतानाही परराज्यातून अनधिकृत बियाणांचा पुरवठा
cotton seeds
cotton seedssakal
Updated on

शहादा (नंदुरबार) : कोविड-१९ चा प्रादुर्भाव (Coronavirus) टाळण्यासाठी सध्या जिल्हा बंदी व राज्य बंदी करण्यात आली आहे. त्यासाठी सीमावर्ती भागात वाहनांच्या तपासणीसाठी पोलिसांचे पथकही कार्यान्वित आहे तरीही अनधिकृत कापूस बियाणे (Cotton seeds) जिल्ह्यात दाखल झाले आहे. परराज्यातील अनधिकृत बियाणे जिल्ह्यात आणण्यात नेमका कोणाचा आशीर्वाद या गोरख धंद्याला लाभला आहे. याचीही तपासणी होणे गरजेचे आहे. (coronavirus lockdown duplicate cotton seeds transportation)

cotton seeds
कोविडच्या रणसंग्रामात ३१ शिक्षक योध्दांनी गमावला जीव

जिल्ह्या लगतचा गुजरात राज्यातून एजंट मार्फत अनधिकृत बियाण्याचा पुरवठा केला जातो हे सर्वश्रुत आहे. यंत्रणेने खोलवर तपास केल्यास निश्चितच पाळेमुळे खणले जातील परंतु तेवढी तसदी संबंधित यंत्रणा घेत नसल्याचे निदर्शनास येत आहे. दरवर्षी लाखोंचे बियाणे विकून कोट्यधीश होण्याचे स्वप्न पाहणाऱ्या या कथित विक्रेत्यांना नेमका आशीर्वाद कोणाचा लाभत आहे याचाही तपास होणे गरजेचे आहे. पोलिस विभागाकडूनही वाहनांची तपासणी होणे गरजेचे आहे. परराज्यात प्रवासासाठी पास घेणे अनिवार्य करण्यात आले आहे. मग बियाणे आणताना कोणत्या मार्गाने आणले जाते. त्या चोरट्या मार्गाचाही तपास होणे आवश्यक आहे.

अनधिकृत साठा मोठ्या प्रमाणात

जिल्हाभर या विक्रेत्यांचे जाळे फोफावले असले तरी शहादा तालुक्यात याची सर्वाधिक विक्री होते. ग्रामीण भागात पसरलेले जाळे नेस्तनाबूद करण्यासाठी कृषी विभागाने स्थानिक गुन्हा अन्वेषण अथवा दूतांमार्फत तपास केल्यास निश्चितच मोठ्या प्रमाणावर अनधिकृत बियाण्याच्या साठा जप्त होईल यासाठी कृषी विभागाने पुढाकार घेणे गरजेचे आहे.

cotton seeds
अद्याप परतावा मिळालाच नाही..शेतकऱ्यांची पिक विम्याकडे पाठ !

अज्ञानाचा घेतला जातोय फायदा

जिल्ह्यात अशिक्षितांचे प्रमाण मोठे आहे. पूर्वी शिक्षणाला फारसे महत्त्व दिले जात नव्हते नेमके तेच लोक मोठ्या प्रमाणावर शेती करतात. त्यांच्या या अज्ञानाचा फायदा कथित अनधिकृत बियाणे विक्री करणारे घेत असून संबंधितांना वेगवेगळे आमिष दाखवत बियाणे खरेदीस भाग पाडतात. पैसा कमी लागतो म्हणून शेतकरीही त्यास पसंती देऊन नाडला जातो.

अन्यथा बियाणे अंकुरेल..

दरवर्षी शेतात अनधिकृत बियाणे अंकुरले जाते यावर्षी तरी निदान या अनधिकृत बियाणे लागवडी पासून शेतकऱ्यांना थांबवण्यासाठी कृषी विभागाने कार्यक्रम आखून गावोगावी जनजागृती करणे गरजेचे आहे. शिवाय अनधिकृत बियाणे विकणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करण्यासाठी पोलिस यंत्रणेच्या मदतीने कार्यक्रम आखणे आवश्यक आहे. अन्यथा खरीप हंगाम जवळ आल्याने सर्वत्र बियाणे अंकुरले जाईल आणि शेतकरी पुन्हा नाडला जाईल. यासाठी वेळीच उपाय योजना करणे गरजेचे आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.