जागतिक परिचारिका दिन : ..अन्‌ त्‍यांच्या शुश्रूषेमुळे फुलते चेहऱ्यावर हास्य

..अन्‌ त्‍यांच्या शुश्रूषेमुळे फुलते चेहऱ्यावर हास्य
international nurses day
international nurses dayinternational nurses day
Updated on

तळोदा (नंदुरबार) : परिचारिका असा शब्द उच्चारल्याबरोबर रुग्णांची अहोरात्र मेहनत करून सेवा करणारी, रुग्णांना धीर देणारी व त्यांचे मनोबल उंचावणारी, रुग्णाच्या कुटुंबातीलच एक सदस्य बनून आरोग्याची काळजी घेणारी स्त्री आपल्यासमोर उभी राहाते. या कोरोनाकाळात (Corona) तर परिचारिका रुग्णांची सेवा करण्यासाठी वेळप्रसंगी स्वतःच्या कुटुंबाला दुर्लक्षित करून सेवा देत आहेत. त्यामुळे परिचारिका (International nurses day) करीत असलेली मानवतेची सेवा नेहमीच आदरास पात्र ठरली आहे. (internarional nurses day in corona peried)

international nurses day
International Nurses Day: अनाथ रूपाली बनली कोरोना रुग्णांसाठी आधार

दर वर्षी १२ मे हा जागतिक परिचारिका दिन म्हणून साजरा होतो. इसवी सन १८५४ मध्ये क्रिमियन युद्धातील जखमी सैनिकांना मलमपट्टी करीत हिंडणारी आद्य परिचारिका फ्लॉरेन्स नाइटिंगेल यांचा हा जन्मदिवस आहे. फ्लॉरेन्स नाइटिंगेल यांना आधुनिक शुश्रूषा शास्त्राची संस्थापिका समजले जाते. त्यांच्याच पावलांवर पाऊल ठेवून परिचारिकांनी रुग्णांची केलेली सेवा व त्या योगे करत असलेल्या मानवतेचा सेवेचा गौरव करण्याचा हा दिवस आहे.

परिचारिकांची मेहनत

सध्याचा काळ हा आरोग्य सेवेतील महत्त्वाचा काळ मानला जात आहे. या काळात सेवा देताना परिचारिका दिवसरात्र मेहनत घेत आहेत. त्यामुळे जिल्ह्याचा कोरोना रुग्णांचा आलेखही खाली येत आहे. त्यात आता रुग्णसंख्या कमी होताना परिचारिकांनी दिलेली सेवा मोलाची ठरली आहे. तळोदा तालुक्यात प्राथमिक आरोग्य केंद्र व उपकेंद्रावर एकूण ४० परिचारिका आरोग्य सेवा देत आहेत, तर उपजिल्हा रुग्णालयात १५ परिचारिका रुग्णांची सेवा करीत आहेत. त्यात कोरोना रुग्णांसोबतच नियमित रुग्णांची काळजी घेत आहेत. रुग्ण व त्यांच्या नातेवाइकांनी सौजन्याने वागण्याची माफक अपेक्षा परिचारिकांची असते. परिचारिका लसीकरण मोहिमेतही संपूर्ण ताकदीने सेवा देत आहेत. त्यामुळे कोरोना असो वा इतर कोणताही आजार परिचारिका कुठेही कमी पडताना दिसत नाहीत. त्यांच्यासाठी असलेल्या या गौरवदिनी सर्वांनी परिचारिकांचा गौरव करावा, अशी परिस्थिती आहे.

international nurses day
अंतर्गत मुल्‍यमापनाला शाळांची दांडी; केवळ दहा हजार सहाशे शाळांचा सहभाग

मुख्यमंत्र्यांनी केला गौरव

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा नुकताच धडगाव मोलगी भागात दौरा झाला. या दौऱ्यात मुख्यमंत्र्यांनी दुर्गम व अतिदुर्गम भागात आरोग्य सुविधा पोचविण्यासाठी कर्मचारी मेहनत घेत आहेत, असे गौरवोद्‍गार काढले होते. त्यात परिचारिकांचा विशेष उल्लेख करून मुख्यमंत्र्यांनी त्यांचा सत्कारही केला होता. त्यामुळे परिचारिकांनाही हायसे वाटले होते. राज्याच्या प्रमुखांनीच परिचारिकांचा गौरव केल्याने कोरोनाशी दोन हात करण्यासाठी बळ मिळाले होते.

रुग्णांच्‍या सेवेत खूप मोठे समाधान आहे. मानवाची सेवा हीच खरी ईश्वरसेवा समजून सर्वच परिचारिका भगिनी काम करतात. सर्वांचे आरोग्य सुदृढ राहावे म्हणून कर्तव्य भावनेने हे कार्य करत आलो आहोत. रुग्ण बरे होऊन घरी जाताना त्यांचा चेहऱ्यावरील हास्य हेच प्रत्येक परिचारिकेचा सेवेचे फळ असते. त्यात मला परिचारिका असल्याचा अभिमान आहे.

- विमल वळवी, परिचारिका, प्राथमिक आरोग्य केंद्र, बोरद

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.