सारंगखेडा (नंदुरबार) : खानदेशात निसर्गाचा ऊन- सावल्यांचा खेळ सुरू आहे. गेल्या १६ महिन्यात प्रत्येक महिन्यात अधूनमधून अवकाळी पावसाने हजेरी लावली. या उन्हाळ्यात सूर्य नारायणाने कृपाच केली असे म्हणावे लागेल. गेल्या दशकातील हा सर्वाधिक थंड उन्हाळा ठरला. लॉकडाऊनची (Coronavirus lockdown) बंधने पाळताना कोरोनाच्या भितीने नागरीक बहुतांशी वेळ घरीच असल्याने खानदेशात उष्माघाताची (Summer Heatstroke) एकही नोंद झालेली नसल्याचे शासकीय दप्तरी दिसून येते. (nandurbar-this-year-summer-most-low-temperature-last-ten-year)
धुळे, नंदुरबार जिल्ह्यात एप्रिल व मे महिन्या दरम्यान तापमान साधारणतः ४० ते ४५ अंश सेल्सिअसपर्यंत जाते. तर जळगाव जिल्ह्यात ४७ पर्यंत जाते. त्यामुळे आरोग्य विभागाकडून (Helath Department) दरवर्षी मार्चमध्येच सर्व सोयींनीयुक्त उष्माघात कक्ष तयार करण्यात येतो. जिल्हा रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय, ग्रामीण व प्राथमिक आरोग्य केंद्रातील कर्मचाऱ्यांना उष्माघाताचा रुग्ण आल्यास कसे उपचार करावेत याबाबत दरवर्षी सूचना देण्यासह त्यांना प्रशिक्षणही दिले जाते. मात्र गेल्या वर्षापासून कोरोनाचा संसर्ग (Coronavirus) वाढत असल्याने आरोग्य यंत्रणा कोरोना रूग्णांवर उपचार व लसीकरण मोहिमेत गुंतलेली आहे. त्यामुळे आरोग्य विभागाचे अधिकारी उष्माघाताचा आजार याच महिन्यांमध्ये आढळतात.
ग्लोबल वार्मिंगचाच परिणाम
कोरडे वातावरण असेल तरच तापमानात वाढ होते. या उन्हाळ्यात ते चित्र पाहायला मिळाले नाही. गेल्या १६ माहिन्यात अवकाळी पावसाने नियमित हजेरी लावून त्यात बाधा आणली. उन्हाची तीव्रता कमी होण्याचे हे प्रमुख कारण ठरले. 'ग्लोबल वॉर्मिग'मुळे ही वातावरणावर विपरित परिणाम होत असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. त्यामुळे उष्माघाताचे रुग्ण समोर आलेलेच नाहीत.
तापमानात घट
दरवर्षी मे महिन्यात भीती वाटणाऱ्या उन्हाचा चटका यंदा कोरोनाच्या भीतीने गायब झाल्याचे दिसून येते. नागपूर खालोखाल खानदेशात तापमान चाळीसच्या पुढे असते. एप्रिल महिन्याच्या अखेरीस ४५ ते ४७ पर्यंत असते. यंदा एप्रिल अखेर उन्हामुळे धुळे, नंदुरबार जिल्ह्यातील पारा ४१.४ अंश सेल्सिअस तर जळगावला ४३ अंश सेल्सिअसपर्यंत गेला होते. ८ मे ४० अंश सेल्सीअस तापमान होते. त्या व्यतिरिक्त इतर दिवस ३७ ते ३९ अंश सेल्सिअस एवढेच होते. त्यामुळे यंदा एप्रिल हीटही तसा जाणवला.
घरगुती उपचारांवर भर
कोरोनाचा संसर्ग वाढला असल्याने छोटे व किरकोळ आजार घरगुती उपचाराने बरे करण्याचा प्रयत्न अनेकजण सध्या करीत आहेत. छोट्या दुखण्यासाठी रुग्णालयात गेले व तेथे कोरोना टेस्ट घेतली असता ती पॉझिटिव्ह आली; तर कसे होईल या भितीने रूग्ण डॉक्टरांकडे जायला तयार नाहीत. त्यामुळे ग्रामीण भागात एखाद्याला ऊन लागल्यास गुळ खाणे, मधाचे पाणी पिणे, शेळी किंवा गाईचे दुध अंगाला व तळपायाला लावणे, कांद्याचा रस डोक्याला लावणे आदी घरगुती उपचार केले जात आहेत.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.