नंदुरबार जिल्ह्यात दोन महिन्यांनंतर पाऊस जोरदार बरसला

Nandurbar Rain News: कमी पावसामुळे कृषी विभागाने ज्वारी, बाजरीसारखी खरीप पिके पेरण्याचे आवाहन केले मात्र त्यासाठीही योग्य पावसाची शेतकऱ्यांना प्रतीक्षा होती.
Rain
RainRain
Updated on

नंदुरबार: जिल्ह्यात शनिवार रात्रीपासून संततधार सुरू आहे. हवामान विभागाने नंदुरबार (Meteorological Department Nandurbar) जिल्ह्यात मुसळधारेचा (Have Rain) अंदाज वर्तविला आहे. त्यामुळे प्रशासनाने तापी नदी (Tapi River) काठच्या गावांना सर्तकतेचा इशारा दिला आहे. दोन महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर का होईना जोरदार पाऊस झाल्याने शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर समाधान आहे.

(after two months of rain in nandurbar district farmer happy)

Rain
जळगावचे उपमहापौर कुलभूषण पाटील यांच्यावर गोळीबार


जिल्ह्यात अवकाळी पावसाव्यतिरिक्त अद्याप जोरदार पाऊस झाला नव्हता. त्यामुळे जिल्ह्यात शेतकऱ्यांची पेरणी खोळंबली आहे. सरासरी ५९ टक्केच पेरणी झाली आहे. त्यात पाण्याची व्यवस्था असलेल्या शेतकऱ्यांकडून कापसाची लागवड केली आहे. अनेकांचे पेरलेले बियाणे वाया गेले, दुबार पेरणीची वेळ आली आहे. मात्र पेरणीयुक्त पाऊस न झाल्याने शेतकरी चिंतेत होते.

जोरदार पाऊस

कमी पावसामुळे कृषी विभागाने ज्वारी, बाजरीसारखी खरीप पिके पेरण्याचे आवाहन केले आहे. मात्र त्यासाठीही योग्य पावसाची शेतकऱ्यांना प्रतीक्षा होती. सरासरी १०० मिली पावसाची गरज आहे. तेवढाही पाऊस जिल्ह्यात झाला नव्हता. त्यामुळे शेतकरी चिंतातूर आहेत. त्यातच काल रात्री नऊपासून जोरदार पावसाला सुरवात झाली. रात्रभर जोरदार पाऊस झाला. सर्वत्र जलमय व गारठ्याचे वातावरण आहे. आजही दिवसभर संततधारा सुरूच होत्या. रविवार असल्याने बाजारपेठ बंद होती. त्यातच पाऊस व गारठा असल्याने शहरातील रस्ते निर्मनुष्य झाले होते.

Rain
सेनेचं नवनेतृत्व..दादांचा वारस अन्‌ लढ्ढांचे कार्यालय!


तापीला पूर
हतनूर धरणाचे सोडलेले पाणी आणि कालपासून सुरू असलेला पाऊस यामुळे तापी नदीच्या पातळीत वाढ झाली आहे. त्यामुळे पुराचे स्वरूप प्राप्त झाले आहे. हवामान विभागाने जिल्ह्यात मुसळधारेचा अंदाज वर्तवला असल्याने प्रशासनाने तापी काठच्या गावांना सर्तकतेचा इशारा दिला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.