अविरत द्वारे शिक्षकांमध्ये सकारात्मक ऊर्जा,बळ देण्याचा प्रयत्न

residentional photo
residentional photo
Updated on

दाभाडी-माध्यमिक शाळांतील शिक्षकांसाठी प्रशिक्षणाचा आगळा वेगळा आयाम अधोरेखित करणाऱ्या बहुउद्देशीय अविरत-३ च्या प्रशिक्षणास प्रारंभ झाला आहे. तणावमुक्त अध्ययन, व्यवसाय समुपदेशन आणि जीवनविषयक सकारात्मक बदल समजून घेत किशोरवयीन मुलांच्या वर्तनविषयक समस्या जाणून त्यावर उपाययोजना या प्रशिक्षणात दिल्या जाणार आहेत. राज्यभर ऑनलाइन पद्धतीने हे प्रशिक्षण देण्यात येत आहे.

 समग्र शिक्षा अभियान व  महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण विद्या प्राधिकरण पुणे, व्यवसाय मार्गदर्शन व मानसशास्त्रीय समुपदेशन विभाग आयोजित सातत्यपूर्ण व्यवसाय विकास प्रशिक्षण अविरत-३चे ऑनलाइन प्रशिक्षण घेण्यात येत आहे. मोबाईल ऍप्सद्वारे राज्यात ४१६०७ माध्यमिक शिक्षक-शिक्षिका प्रशिक्षण घेत आहेत. त्यासाठी राज्यात ८१६ तज्ञ मार्गदर्शकांचे सहकार्य लाभत आहे. या प्रशिक्षणात शिक्षकांना पाच मॉड्युल देण्यात आले असून त्यात विविध माहितीपट, अडिओ, व्हिडीओ, प्रकल्प, स्वमत आणि प्रश्नावली या पायरी पद्धत वापरण्यात आली आहे. कमी वेळेत योग्य पर्याय निवडणाऱ्या प्रशिक्षणार्थींना टक्केवारी निहाय सुवर्ण, रौप्य, कांस्य ही आभासी सन्मानपदके मिळणार आहे. हे पदक सोशल मीडियावर शेअर करता येणार आहे. या प्रशिक्षणाचे खास आकर्षक ठरत आहे. अविरत-३च्या प्रशिक्षणासाठी नाशिक जिल्ह्यात १६५० प्रशिक्षणार्थी व ३७ तज्ञ मार्गदर्शक सहभागी झाले आहेत.

आधुनिक जीवनशैलीत किशोरवयीन मुलांच्या समस्या सोडवण्यासाठी शिक्षकांत नवीन दृष्टिकोन निर्माण करणे, विद्यार्थ्यांचा ताणतणाव कमी करतांना मानसशास्त्रीय विश्लेषणातुन  विवेकनिष्ठ उपचार पद्धती अवलंबने हा उद्देश्य अग्रभागी आहे. व्यक्तीच्या भावना आणि वर्तनामध्ये दीर्घकाळ टिकणारे परिवर्तन घडवून आणून आनंददायी जीवन कसे जगता येईल हे या प्रशिक्षणातून शिक्षकांना मार्गदर्शन करण्यात येत आहे. प्रशिक्षित शिक्षकांनी विद्यार्थ्यांना मदत करतांना 'सुलभका'ची भूमिका अपेक्षित असल्याने मानसशास्त्रीय कसोट्यांचे प्रशिक्षण दिले जात आहे. प्रशिक्षणार्थींनी विहित मुदतीत आपले प्रशिक्षण पूर्ण करावे असे आवाहन प्रादेशिक विद्या प्राधिकरणच्या उपसंचालिका डॉ. वैशाली झनकर यांनी केले आहे.


प्रशिक्षणातील अपेक्षित वैशिष्ट्ये:- 

शिक्षक नव्हे सुलभक, अध्यापनात बदल, सकारात्मक बदल, ताणतणाव व्यवस्थापन, किशोरवयीन मुलांचा वर्तन अभ्यास आणि अध्ययनात कौशल्ये विकसित करणे, विद्यार्थ्यांकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलणे.
 

 स्पर्धेच्या युगात विद्यार्थ्यांच्या मनावरील ताण कमी करणे,  विद्यार्थ्याला करिअर निवडीसाठी मार्गदर्शन करणे, किशोरवयीन मुलांवरती योग्य संस्कार करण्यासाठी शिक्षकांचा दृष्टिकोन विकसित करणे व मानसिक तयारी करणे यासाठी अविरत-३ हे ऑनलाईन प्रशिक्षण सुरू आहे.

डॉ. बाबासाहेब बडे,
अविरत जिल्हा समन्वयक,प्रादेशिक विद्या प्राधिकरण, नाशिक

प्रचलित प्रशिक्षणाला छेद देत तणावमुक्त व आनंददायी जीवन जगण्याची गुरुकिल्ली म्हणून हे ऑनलाइन प्रशिक्षण  उत्स्फूर्तपणे सुरू आहे. तज्ज्ञांच्या सखोल मांडणीचा प्रत्यय प्रशिक्षणार्थी घेत आहेत. 'कधीही आणि कुठेही पण वेळेत' हे वैशिष्ट्ये पसंतीस उतरले आहे.

किरण बावा (गोसावी),अविरत तज्ज्ञ मार्गदर्शक, नाशिक

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.