नाशिक5 ः अल्ट्रासॉनिक सेन्सरचा वापर केलेली टोपी परिधान केली, की चार मीटरपर्यंतच्या अडथळ्याची जाणीव टोपी देते. दिव्यांगांच्या संरक्षणासाठी सरस्वतीनगरच्या के. के. वाघ विद्यालयात दहावीमध्ये शिकणाऱ्या प्रथमेश सोनवणे याचे हे संशोधन आहे.
अनोखे संशोधन ठरणार उपयुक्त
आर्डीनो सर्कीट आणि बॅटरीचा वापर या तंत्रज्ञानात करण्यात आला आहे. ही टोपी परिधान केल्यावर एखादी व्यक्ती, वाहन अथवा वस्तूला दिव्यांग धडकू शकत नाहीत. सर्वसाधारणपणे एक ते चार मीटर परिघामध्ये अडथळा आल्यावर सेन्सर सिग्नल पाठवला आणि टोपी "व्हायब्रंट' व्हायला लागते. सेन्सरच्या सिग्नलसाठी परिघाची कक्षा कमी-अधिक करता येते. भविष्यामध्ये या तंत्रज्ञानाचा उपयोग दैनंदिन वापरातील वस्तू, चष्मा, बूट, मोबाईलमध्ये करण्याचा मानस प्रथमेशचा आहे.
आवाजावर चालणारा सेन्सर
गेल्यावर्षी प्रथमेशने यू-ट्युबवरुन माहिती घेत आवाजावर चालणारी गाडी तयार केली होती. त्यात त्याने आवाजावर चालणारा सेन्सर वापरला होता. ही गाडी आपल्या आज्ञेप्रमाणे चालते. या उपकरणावरुन त्याला टोपीची संकल्पना सूचली. आर्डीनो सर्कीट व सेन्सरचा "प्रोग्राम' त्याने संगणकाच्या सहाय्याने तयार केला. सर्कीट जोडण्यासाठी शोल्डर गणचा वापर करण्यास त्याला वडिलांची मदत झाली. या प्रयोगाबद्दल शाळेने प्रथमेशच्या पाठीवर कौतुकाची थाप दिली.
दिव्यांग बांधवांसाठी यापूर्वीही देशभर वेगवेगळ्या वस्तूंच्यासंदर्भात अनेक संशोधने झाली आहे. प्रत्येक संशोधन हे त्यांच्यादृष्टीनेच उपयुक्तच ठरतात.विशेषतः अभ्यासक्रमांशी संबंधीत अथवा दैनंदिन जीवनशैलीशी निगडीत संशोधन असेल तर त्यांचा त्यांना खूप उपयोग होतो. या मुलांसाठी काम करणाऱ्या संस्थांही आपआपल्यापरिने त्यांना मदत करण्याचा प्रयत्न करीत असतात. फारशी किंमत न आकारता त्यात नाविन्यता जपण्याचाही प्रयत्न केला जातो.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.