सदस्य नागसेन बोरसे यांनी अमृत योजनेतंर्गत गैरव्यवहार झाल्याचा गंभीर आरोप केला. उद्यानांच्या छायाचित्रांसह अमृत योजनेत गैरव्यवहार, अशा माहितीचे बॅनर त्यांनी सभागृहात झळकवले.
धुळे ः महापालिकेत (Dhule Municipal Corporation) स्थायी समितीची गुरुवारी (ता. ५) झालेली (Standing Committee Meeting) बैठक विविध विषयांमुळे वादळी ठरली. वाढता कचरा आणि घंटागाड्यांचा प्रश्न, अमृत योजनेतील गैरव्यवहार, बदल्या, नस्ती- फाईल गहाळ होणे आदी प्रश्नांवर सदस्यांनी अधिकाऱ्यांना धारेवर धरले. अमृत योजनेत गैरव्यवहार (Amrut Yojana scam), असा आशयाचा बॅनर भाजपचे सत्ताधारी नगरसेवक (Corporator) नागसेन बोरसे यांनी झळकविले.
महापालिकेच्या भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी सभागृहात बैठक झाली. तीत महापालिकेतून नस्ती- फाईल गहाळ झाल्याचा मुद्दा सदस्य सुनील बैसाणे यांनी ऐरणीवर आणला. कर्मचारी दीपक खोंडे यांनी नस्ती- फाईल कपाटातून अज्ञात व्यक्तीने गहाळ केल्याबाबत पोलिसांकडे तक्रार दिली आहे. ती अज्ञात व्यक्त कोण, असा प्रश्न श्री. बैसाणे यांनी उपस्थित केला. त्या व्यक्तीचा शोध घेत प्रशासनाने गुन्हा दाखल करावा, अशी मागणीही त्यांनी केली. त्यावर सभापती संजय जाधव यांनी प्रशासनाने याबाबत कार्यवाही केली नाही, तर सर्वच सदस्य तक्रार दाखल करतील, असे सांगितले.
अमृत योजनेबाबत चौकशी
सदस्य नागसेन बोरसे यांनी अमृत योजनेतंर्गत गैरव्यवहार झाल्याचा गंभीर आरोप केला. उद्यानांच्या छायाचित्रांसह अमृत योजनेत गैरव्यवहार, अशा माहितीचे बॅनर त्यांनी सभागृहात झळकवले. या योजनेंतंर्गत साडेचार कोटींच्या निधीतून शहरातील ३० उद्यानांचा विकास करण्यात आला. त्यात २४ उद्यानांची कामे पूर्ण झाली. मात्र, सहा उद्यानांची कामे केवळ पाच ते दहा टक्के झाली आहेत. तरीही ७० टक्के कामे झाल्याचा अहवाल शासनाला सादर झाला आहे. या उद्यानांबाबत चुकीची कामे झाली आहेत. अनेक नागरिकांनी या कामाला विरोध केला होता. तरीही कामे उरकरण्यात आली. त्यामुळे या योजनेतील गैरव्यवहाराची सखोल चौकशी करावी, अशी मागणी सदस्य बोरसे यांनी केली. त्यावर अधिकाऱ्यांनी चौकशीसाठी समिती नेमू, असे आश्वासन दिले.
बदल्यांचा प्रश्न
महापालिकेत अनेक अधिकारी व कर्मचारी वर्षानुवर्षे एकाच जागेवर आणि पदावर आहेत. फक्त मागासवर्गीयांच्या बदल्या करण्यात आल्या. हा त्यांच्यावर अन्याय आहे. त्यामुळे एकाच जागी असलेल्या इतर अधिकारी व कर्मचाऱ्यांच्याही बदल्या कराव्यात, अशी मागणी सदस्य बैसाणे यांनी केली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.