शिरपूर : खोकी, प्लॅस्टिक बॅरल ठेवण्यासाठी स्वतंत्र गुदामे, रसायन मिश्रणासाठी मोठ्या टाक्या, बॉटलिंग प्लँट, तयार माल ठेवण्याची खोली आणि वाहतुकीसाठी वाहने असा जामानिमा पाहून मुंबईच्या राज्य भरारी पथकाचे (Mumbai State Squadron) अधिकारीही अवाक झाले. ब्लेंड, तयार दारु, यंत्रसामग्री आणि तीन वाहने असा एक कोटीहून अधिक रकमेचा मुद्देमाल त्यांनी जप्त केला. महामार्गाला (Highway) अगदी खेटून असलेल्या या जागेत इतक्या मोठ्या प्रमाणात बनावट मद्यनिर्मिती (Duplicate alcohol) चालते आणि त्याची खबरबात कोणालाही असू नये याबद्दल त्यांनी आश्चर्य व्यक्त केले. (dhule billions of duplicate alcohol stocks seized by police)
मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गालगत (Mumbai-Agra National Highway) सुरू असलेल्या बनावट मद्यनिर्मितीची माहिती मुंबई येथील भरारी पथकाचे निरीक्षक संताजी लाड यांना मिळाली होती. त्यांनी सहकारी निरीक्षक मनोज चव्हाण, धुळे येथील उत्पादन शुल्क विभागाचे (Excise Department) निरीक्षक बी. आर. नवले व पथकासोबत बुधवारी (ता.९) दुपारी चारला अजंदे (ता. शिरपूर) शिवारातील गुदामावर छापा टाकला.
तीन संशयीतांना अटक
रात्री उशिरापर्यंत मुद्देमाल जप्त करून वाहून नेण्याची कार्यवाही सुरू होती. स्पिरिटने भरलेले प्लॅस्टिकचे बॅरल, तयार ब्लेंडचे बॅरल्स, त्यापासून तयार केलेली प्रिन्स देशी दारू, खोकी, बूच, लेबल्स, बॉटलिंग यंत्रे, एक आयशर ट्रक, जीप आणि दुचाकी असा कोट्यवधी रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. घटनास्थळावरून तीन संशयितांना अटक करण्यात आली. पूर्वी जिनिंग असलेल्या या जागेची मध्यप्रदेशातील व्यक्तीला विक्री करण्यात आली असून तेथील गुदामात हा बेकायदेशीर उद्योग सुरू असल्याचे निष्पन्न झाले. मुद्देमाल हाडाखेड (ता. शिरपूर) येथील राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कार्यालयात नेण्यात येणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.