धुळे : शहरातील जगन्नाथनगर, देवपूर येथे सोमवारी (ता. २६) भरदुपारी विवाहितेचा (Married Woman) घरात घुसून खून (Murder) झाल्याची घटना घडली. मारेकऱ्याने तीक्ष्ण हत्याराने विवाहितेच्या मानेवर व पोटावर वार करून पलायन केले. आर्थिक (Economic disputes) देवाणघेवाणीवरून हा खून झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. या प्रकरणी पश्चिम देवपूर पोलिस ठाण्यात (Devpur Police Station) गुन्हा दाखल झाला आहे. फरारी हल्लेखोरांच्या शोधासाठी दोन पोलिस पथके रवाना झाली आहेत.
(dhule city married woman murder by in house)
जगन्नाथनगर येथे जितेंद्र पाटील यांच्या मालकीच्या घरात भिकन पाटील (रा. कापडणे) आई, पत्नी शीतल व दोन मुलांसह दोन ते तीन वर्षांपासून भाडेतत्त्वावर राहतात. त्यांचा नानखटाई, कुरकुरे विक्रीचा व्यवसाय आहे. सोमवारी (ता. २६) दुपारी एकच्या सुमारास संशयिताने घरात घुसून शीतल (वय ३२) यांच्यावर धारदार हत्याराने वार केले. त्या वेळी त्यांच्या सासूबाई पोळ्या करीत होत्या, तर पती भिकन पाटील वरच्या मजल्यावरील नातेवाइकांकडे गेले होते. शीतल यांच्या सासूबाईंना कमी ऐकू येते. मात्र, खालच्या मजल्यावर कोणी तरी ओरडत असल्याचा आवाज भिकन पाटील यांना आल्याने ते धावतच खाली आले. त्या वेळी पत्नी शीतल रक्ताच्या थारोळ्यात पडलेली त्यांना दिसली. तोपर्यंत मारेकरी पसार झाला होता. त्यानंतर शेजारीही धावत आले. शीतल यांना रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. माहिती मिळताच उपविभागीय पोलिस अधिकारी दिनकर पिंगळे, पोलिस निरीक्षक रवींद्र देशमुख पथकासह घटनास्थळी दाखल झाले. श्वान पथक, ठसेतज्ज्ञांना पाचारण करण्यात आले. पोलिसांनी घटनास्थळी चाकू जप्त केला. पाटील यांच्या फिर्यादीनुसार संशयित सोमनाथ कुवर याच्याविरोधात खुनाचा गुन्हा दाखल झाला. तो फरारी असून, त्याच्या शोधासाठी दोन पथके रवाना करण्यात आली, असे पोलिस निरीक्षक देशमुख यांनी सांगितले.
हल्लेखोर सीसीटीव्हीत कैद
पोलिसांनी घटनास्थळी व त्यानंतर समोरच्या बंगल्याच्या सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली. फुटेजमध्ये घटनाग्रस्त घरातून एकजण बाहेर पडताना दिसून आला. याबाबत विचारपूस केली असता भिकन पाटील यांनी संशयितास ओळखले. संशयिताचे नाव सोमनाथ रमेश कुवर (वय २८, रा. कापडणे, ता. धुळे) असे आहे. सात ते आठ वर्षांपासून त्याचे पाटील कुटुंबीयांशी घरोब्याचे संबंध असून, तो अधूनमधून त्यांच्या घरी येत असे. त्याचा भिकन पाटील यांच्याशी आर्थिक देवाणघेवाणीचा वाद होता. दोन दिवसांपूर्वी तो पैसे घेण्यासाठी आला होता.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.