संततधारेनंतरही धुळे शहरातील नकाणे तलाव निम्माच

तापी पाणीपुरवठा योजनेआधी धुळे शहराला पूर्णतः नकाणे तलावातूनच पाणीपुरवठा करण्यात येत होता.
Lake Nakane
Lake Nakane
Updated on

धुळे : शहरासह परिसरात दोन दिवसांपासून रिपरिप, संततधार पावसानंतरही पिण्याचा (Dhule Rain) पाणीपुरवठा (Water supply) करणारा नकाणे तलाव (Lake Nakane) निम्माच भरला आहे. त्याच्या जलसाठ्यात अपेक्षित वाढ झालेली नाही. परिणामी, सद्यःस्थितीत केवळ ८० दिवस पाणीपुरवठा होईल इतका म्हणजे ९५ एमसीएफटी पाणीसाठाया तलावात शिल्लक आहे.

Lake Nakane
धुळ्यात कारमधून गांजाची वाहतूक;सापळा रचून पोलिसांची कारवाई


तापी पाणीपुरवठा योजनेआधी शहराला पूर्णतः नकाणे तलावातूनच पाणीपुरवठा करण्यात येत होता. या तलावातून रोज एक एमसीएफटी पाणीपुरवठा करण्यात येतो. नकाणे तलावात सध्या अल्प पाणीसाठा असला तरी या तलावाच्या वरच्या बाजूला हरणमाळ तलाव आहे. त्याची क्षमता ३५० एमसीएफटी इतकी आहे. त्यात सध्या समाधानकारक पाणीसाठा उपलब्ध आहे. अपेक्षित पाऊस न झाल्यास हरणमाळ तलावामधून नकाणे तलाव भरण्यात येईल. अक्कलपाडा धरणाचेही काम सुरू आहे. ते डिसेंबरपर्यंत पूर्ण होणे अपेक्षित आहे. या धरणावरून पाणी सुरू झाल्यास पाण्याची चिंता मिटणार आहे.

Lake Nakane
मघा नक्षत्रात गाढवाने भार उचलला


नकाणे तलावात सध्या केवळ ९५ एमसीएफटी इतका पाणीसाठा शिल्लक आहे. या तलावाची क्षमता ३६० एमसीएफटी इतकी आहे. दमदार पाऊस नसल्याने नवीन पाणीसाठा झालेला नाही. पूर्वी नकाणे तलाव हाच शहराचा मुख्य जलस्रोत होता. त्यानंतर तापी योजनेवर बॅरेज साकारल्याने त्यात बारमाही पाणी साठल्याने तापी योजनेवरून बारामाही पाणी घेणे सुरू झाले. डेडरगाव तलावातूनही शहरात पाणीपुरवठा करण्यात येतो. त्यातही ८० एमसीएफटी इतका पाणीसाठा उपलब्ध आहे. पावसाची अशीच परिस्थिती राहिल्यास याच शिल्लक पाणीसाठ्यातून शहरात पाणीपुरवठा नियोजन करण्यात येणार आहे. तथापि, डेडरगाव तलाव महापालिका मालकीचा आहे. त्याच्या जवळच जलशुद्धीकरण केंद्र आहे. तेथून अवधान व मोहाडी येथील म्हाडा वस्तीला पाणीपुरवठा करण्यात येतो. जलशुद्धीकरण केंद्रांवर रोज केवळ तीन एमएलडी पाणीपुरवठा होतो. सध्या असलेल्या पाणीसाठ्यातून दोनशे दिवस पाणीपुरवठा करता येणार आहे.

Lake Nakane
रस्त्यातील डबक्यात चालविल्या नाव;भुसावळला भाजयुमोचे आंदोलन


नकाणे तलावावरून शहरातील ३० टक्के भागाला पाणीपुरवठा करण्यात येतो. हनुमान टेकडी जलशुद्धीकरण केंद्रातून कुमारनगर, सिमेंट जलकुंभ, रामनगर, अशोकनगर जलकुंभावरून त्या परिसरात पाणीपुरवठा होतो.
- चंद्रकांत उगले, कनिष्ठ अभियंता, महापालिका, धुळे

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()