दुकाने सोमवार ते शुक्रवार दुपारी चारपर्यंतच सुरू; दोन दिवस व्‍यवहार बंद

दुकाने सोमवार ते शुक्रवार दुपारी चारपर्यंतच सुरू; दोन दिवस व्‍यवहार बंद
दुकाने सोमवार ते शुक्रवार दुपारी चारपर्यंतच सुरू; दोन दिवस व्‍यवहार बंद
Updated on

धुळे : शहरासह जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी अत्यावश्यक मेडिकल दुकाने, वैद्यकीय सेवा वगळता इतर सर्व प्रकारची दुकाने, आस्थापना सोमवार ते शुक्रवार दुपारी चारपर्यंत सुरू राहतील. अत्यावश्‍यक सेवा वगळता शनिवार व रविवार इतर सर्व दुकाने, आस्थापना पूर्णपणे बंद राहतील, असा आदेश जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष तथा जिल्हादंडाधिकारी संजय यादव यांनी जारी केला. (dhule-collector-sanjay-yadav-order-mini-lockdown-shop-open-time)

दुकाने सोमवार ते शुक्रवार दुपारी चारपर्यंतच सुरू; दोन दिवस व्‍यवहार बंद
एकनाथ खडसे, रोहिणी खडसेंना ट्विटरवरून शिवीगाळ

मुख्य सचिवांच्या आदेशानुसार डेल्टा, डेल्टा प्लस यांसारख्या नवीन स्वरूपातील विषाणूचा प्रसार होत असून, व्यापक भौगोलिक क्षेत्रासह चार ते सहा आठवड्यांमध्ये तीव्र स्वरूपात तिसरी लाट वाढण्याची शक्यता वर्तविली जात आहे. जळगाव, रत्नागिरी आणि इतर जिल्ह्यांमध्ये कोविड १९ च्या वेगवेगळ्या स्वरूपातील संसर्गामुळे बाधित रुग्ण आढळत आहेत. अशा विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी शासनाने कडक निर्बंध लादण्याचे सूचित केले आहे. त्यानुसार निर्बंध कडक करण्याचा आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी बजावला.

बारा तासांची संचारबंदी

शहरासह जिल्ह्यात सोमवारी (ता. २८) पहाटे पाचपासून संचारबंदी लागू होईल. यात सायंकाळी पाच ते पहाटे पाचपर्यंत नागरिकांना मुक्तपणे संचार करण्यास मनाई राहील. तसेच रोज सायंकाळी पाचपर्यंत पाचपेक्षा अधिक नागरिक एकत्र येण्यास मनाई म्हणजेच जमावबंदी लागू असेल. यात पूर्व नियोजित कार्यक्रम, लग्न समारंभ, अंत्यविधी वगळले आहेत.

दुकाने सोमवार ते शुक्रवार दुपारी चारपर्यंतच सुरू; दोन दिवस व्‍यवहार बंद
३८ हजार बेशिस्त वाहन चालकांना एक कोटींचा दंड

येथे ५० टक्‍के ग्राहकांनाच परवानगी

हॉटेल, रेस्टॉरंट, बार ५० टक्के ग्राहक क्षमतेसह सुरू राहतील. शनिवार व रविवारी डायनिंग पूर्णपणे बंद राहील. केवळ पार्सल सुविधा, टेक अवे, घरपोच सुविधा देता येतील. सोमवार ते शुक्रवार केवळ दुपारी चारपर्यंत डायनिंग सुरू राहतील. मात्र, दुपारी चार ते रात्री नऊपर्यंत केवळ पार्सल सुविधा, टेक अवे, घरपोच सुविधा देता येतील. खासगी कार्यालये दुपारी चारपर्यंत सुरू राहतील. अंत्यविधीसाठी केवळ २० जणांना परवानगी राहील. सर्व प्रकारच्या बैठका, ग्रामपंचायत, को-ऑपरेटिव्ह निवडणूक ५० टक्के क्षमतेसह करता येतील. जिम, सलून, ब्यूटिपार्लर, स्पा सेंटर, वेलनेस सेंटर ५० टक्के ग्राहक क्षमतेसह केवळ प्री- बुकिंग पद्धतीने रोज चारपर्यंत सुरू राहतील. एसीचा वापर करण्यास मनाई राहील. माल वाहतूकव्यवस्था सुरू राहील. केवळ तीन व्यक्तींचा (वाहनचालक/क्लिनर/हेल्पर) समावेश राहील. आंतर-जिल्हा प्रवास सुरू राहील. मात्र, लेव्हल पाचमध्ये समाविष्ट जिल्ह्यांमध्ये प्रवासासाठी पोलिस विभागाकडून ई- पास घेणे आवश्यक राहील.

तर फौजदारी कारवाई

निर्यातीचे लघू, सूक्ष्म, मध्यमसहित उद्योग, कंपन्या, आस्थापना, घटक नियमितपणे सुरू राहतील. सर्व शाळा, महाविद्यालये, शैक्षणिक, प्रशिक्षण, कोचिंग क्लासेस बंद राहतील. ऑनलाइन, दूरस्थ शिक्षणप्रक्रिया सुरू राहतील. यांसह विविध निकष लागू असताना कोरोनासंबंधी वेळोवेळी जाहीर सर्व नियमांचे काटेकोर पालन व्हावे, अन्यथा संबंधितांवर फौजदारी कारवाई केली जाईल, असा इशारा श्री. यादव यांनी दिला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()