बालविवाहात धुळे जिल्हा तिसऱ्या क्रमांकावर; कोरोनाकाळातील परिणाम

बालविवाहाची प्रथा मोडीत काढण्यासाठी जे काही लढे, चळवळी राबविल्या गेल्या त्या पुन्हा हाती घेण्याची गरज निर्माण झाली आहे.
Child Marriage
Child Marriage Child Marriage
Updated on



धुळे : कोरोनाच्या संकटकाळातील (corona crisis) पडसाद मुला-मुलींवरही उमटत आहेत. अभ्यासाची (study) सवय कमी होऊन ते मोबाईलच्या आहारी गेले आहेत. यात विविध कारणांमुळे बालविवाहासंबंधी (Child marriage) प्रकाशित अहवालात परभणी (Parbhani) प्रथम, बीड (Bid) द्वितीय, तर धुळे (dhule) जिल्हा तिसऱ्या क्रमांकावर पोचला आहे. ही गंभीर स्थिती सावरण्यासाठी सामूहिक प्रयत्नांची गरज आहे.

(corona crisis increase child marriage dhule district ranks third)

Child Marriage
धुळे जिल्ह्यातील पाच मध्यम प्रकल्पातून पाणी सोडले जाणार !

यासंदर्भात येथील मानसशास्त्रतज्ज्ञ प्रा. वैशाली पाटील (Psychologist Pro. Vaishali Patil) व अभ्यासक जगदीश झिरे (Practitioner Jagdish Zire) यांना बालकल्याणासह वैयक्तिक समुपदेशनातून अशा विविध समस्या जाणवल्या. ते म्हणाले, की कोरोनाचा संसर्ग पसरल्यामुळे पुढील दोन वर्षांत ४० लाख मुलींना बालविवाहाचा धोका संभवतो, असा इशारा ग्लोबल चॅरिटी (Eshara Global Charity) संस्थेने सर्वेक्षणाअंती दिला आहे. त्यामुळे बालविवाहाची प्रथा मोडीत काढण्यासाठी जे काही लढे, चळवळी राबविल्या गेल्या त्या पुन्हा विनाविलंब हाती घेण्याची गरज निर्माण झाली आहे. कोरोनाशी मुकाबला करताना बालविवाह रोखणे कठीण होईल, असा युक्तिवाद झाला. तर असंख्य मुलींचे भवितव्य अंधारात लोटले जाईल. ही राज्यासह समाजासाठी धोक्याची घंटा आहे.

नेमकी कारणे काय?
संसर्गजन्य कोरोनामुळे शहरी भागात खेळणे, मैदानावर जाण्यास बंधने आल्यामुळे असंख्य मुले अबोल, चिडचिडी झाली आहेत. ग्रामीण भागात विशेषतः आर्थिक दुर्बल घटकात मुलीची मोठी जबाबदारी वाटत असल्याने, तिचे काय होईल, या विचारातून बालविवाह केले जात आहेत. तसेच ग्रामीण भागात सर्वाधिक भारनियमन असते. त्यामुळे टीव्हीसारखी मनोरंजनाची साधने, कॉम्प्युटर, लॅपटॉप वापरावरही गदा येते. शिवाय कोरोनाच्या संकटकाळात शाळा- महाविद्यालये बंद असतात. मोबाईलचा अधिक गैरवापर होताना दिसतो. त्यामुळे प्रेमप्रकरणे घडतात. काही मुलींची गर्भधारणा होते. असले प्रकार कानावर आल्यानंतर चिंताग्रस्त पालक मुलीचा विवाह केलेला बरा, अशा मानसिकतेत येतात. कुटुंबाकडून तिच्यावर विवाहासाठी दबाव वाढू शकतो. प्रसंगी काही कारणांमुळे किशोरवयीन गर्भधारणेत वाढ होऊ शकते. कमी समज असल्यावर बालविवाह झाल्यास त्याचे परिणाम भांडणे, प्रसंगी आत्महत्येचे टोक गाठण्यापर्यंत दिसतात. यात बालविवाहाच्या प्रथेस पालकांचा अशिक्षितपणा प्रमुख कारण ठरते.

Child Marriage
ऑक्सिजन लेवल ४५ त्‍यात मधुमेह; तरी तिची कोरोनावर मात

व्यापक जनजागृती व्हावी
जडणघडणीत मुलांचा मानसिक, शारीरिक, सामाजिक विकास योग्य पद्धतीने झाला पाहिजे. त्यांना आवडत्या क्षेत्रातील प्रगतीसाठी सर्वच स्तरांतून प्रोत्साहन देणे गरजेचे ठरते. मुलांमधील मानसिक, भावनिक, वर्तनविषयक समस्यांचे उपचार मानसशास्त्रात दडलेले आहेत. बालविवाह होऊ नये व समाजात तशी जनजागृती होण्यासाठी व्यापक प्रयत्नांची गरज आहे. देशात बालविवाहाचे प्रमाण ४७ टक्के, तर राज्यात ३५ टक्के आहे. हेच प्रमाण परभरणीत ४८ टक्के, बीडमध्ये ४३.७ टक्के, तर धुळे जिल्ह्यात ४०. ५ टक्के आहे. लोकसंख्यावाढीशी थेट संबंध असणाऱ्या बालविवाहांमुळे मातामृत्यू, गर्भपात, कुपोषित अर्भके (राष्ट्रीय प्रमाण ४२ टक्के), तसेच स्त्री शिक्षण आणि स्त्री सक्षमीकरणासंदर्भात अनेक प्रश्न निर्माण होत आहेत. अत्याचाराला बळी पडणाऱ्यांमध्ये बालविवाहातील मुलींचे प्रमाण अधिक असल्याचेही प्रा. सौ. पाटील, श्री. झिरे यांनी सांगितले.


Child Marriage
धक्कादायक प्रकार..काकाच्या घरात पुतण्याने रचला दरोड्याचा कट

नैराश्‍यातून बाहेर काढण्याची गरज
प्रा. सौ. पाटील, श्री. झिरे यांनी सांगितले, की शहरी भागात मुले-मुली न्यूरोडेव्हलपमेंट डिसऑर्डर, कम्युनिकेशन डिसऑर्डर, चाइल्डहूड डिसऑर्डरचे, तर ग्रामीण भाग बालविवाहाचे शिकार होत आहेत. मुलांमधील समस्या सोडविण्यासाठी, त्यांच्यासह पालकांना नैराश्‍याच्या गर्तेतून बाहेर काढण्यासाठी मानसशास्त्रतज्ज्ञ, अभ्यासक प्रयत्नशील आहेत. यात कमीपणा वाटू नये, बदनामीची अनाठायी भीती न बाळगता पालकांनी मानसशास्त्रीय समुपदेशनावर भर द्यावा.

(corona crisis increase child marriage dhule district ranks third)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.