धुळे जिल्हा बँकेकडून ११७ टक्के पीककर्जवाटप

गेल्या वर्षी जिल्हा बँकेने खरीप कर्जाची ९३ टक्के वसुली केली
 Dhule Bank
Dhule Bank Dhule Bank
Updated on


धुळे : तीन महिन्यांत धुळे-नंदुरबार जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने कार्यक्षेत्रात (Dhule-Nandurbar District Central Co-operative Bank) तब्बल ११७ टक्के पीककर्ज (Crop lone) वाटपाचे उद्दिष्ट गाठले. कोरोनाच्या संकटकाळातही शेतकऱ्यांप्रति (Farmer) संवेदनशीलता आणि खरीप हंगामाची गरज ओळखून, आखडता हात न ठेवता जिल्हा बँकेने उद्दिष्टापेक्षा अधिक पीककर्जवाटप केले. या उत्कृष्ट कामगिरीबद्दल जिल्हाधिकारी संजय यादव (Collector Sanjay Yadav)यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात प्रातिनिधिक स्वरूपात जिल्हा बँकेचे सरव्यवस्थापक जी. एन. पाटील (General Manager of the Bank G. N. Patil) यांचा सत्कार केला. (dhule district Bank distributes one hundred and seventeen percent crop loans to farmers)

 Dhule Bank
१५ फुट अजगाराचा हल्ला..आणि डोळ्यासमोर शेळी केली फस्त

खरीप हंगामात संबंधित राष्ट्रीयीकृत, ग्रामीण, व्यापारी, खासगी बँकांनी मिळून आतापर्यंत जिल्ह्यात सरासरी १५ टक्क्यांहून अधिक पीककर्जाचे वाटप केलेले नाही. त्यात जिल्हा बँकेची कामगिरी उल्लेखनीय दिसून येत आहे. जिल्हाधिकारी कार्यालयात डीएलसीसीची बैठक झाली. जिल्हाधिकारी यादव अध्यक्षस्थानी होते. त्यात खरीप पीककर्ज वाटपाचा आढावा घेण्यात आला. जिल्हा बँकेने १८ जूनपर्यंत धुळे व नंदुरबार जिल्ह्यात एकूण २२४ कोटींचे पीजकर्ज वाटप केले. ते लक्ष्यांकाहून अधिक ११७ टक्क्यांपर्यंत वाटप झाले, अशी माहिती सरव्यवस्थापक पाटील यांनी दिली. जिल्ह्यातील इतर राष्ट्रीयीकृत व इतर बँकांपेक्षा जिल्हा बँकेची कामगिरी सरस दिसून आली. त्यामुळे जिल्हाधिकारी यादव यांनी जिल्हा बँकेचे सरव्यवस्थापक पाटील यांच्यामार्फत सत्कार केला. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वान्मती सी., अग्रणी बँकेचे व्यवस्थापक मनोज दास, नाबार्डचे जिल्हा विकास व्यवस्थापक विवेक पाटील, जिल्हा बँकेचे व्यवस्थापक पी. बी. वाघ व अन्य बँकांचे प्रतिनिधी उपस्थित होते.


Farmer lone
Farmer loneFarmer lone

असे केले कर्जवाटप
जिल्हा बँकेने धुळे जिल्ह्यात १२० कोटींचे पीककर्ज वाटपाचे उद्दिष्ट ठेवले. पैकी १८ हजार ७५८ शेतकऱ्यांना १३७ कोटी रुपये वाटप केले. हे प्रमाण ११४ टक्के आहे. नंदुरबार जिल्ह्यात ७१ कोटी पीककर्ज वाटपाचे उद्दिष्ट असताना नऊ हजार ९१४ शेतकऱ्यांना ८७ कोटी कर्ज वाटप केले. हे प्रमाण १२२ टक्के आहे. यानुसार एकूण १९१ कोटींच्या उद्दिष्टांपैकी जिल्हा बँकेने २८ हजार ६७२ शेतकरी सभासदांना २२४ कोटी म्हणजेच ११७ टक्के पीककर्ज वाटप केले. गेल्या वर्षी जिल्हा बँकेने खरीप कर्जाची ९३ टक्के वसुली केली. तसेच ३० जून २०२१ अखेर उर्वरित सर्व शेतकऱ्यांनी मागील वर्षाच्या कर्जाची शंभर टक्के परतफेड करून नवीन हंगामातील नवीन खरीप कर्जासाठी पात्र व्हावे, असे आवाहन बँकेचे अध्यक्ष राजवर्धन कदमबांडे, संचालक मंडळ व मुख्य कार्यकारी अधिकारी धीरज चौधरी यांनी केले.

 Dhule Bank
'कोविड’मुळे अनाथ झालेल्या बालकांना मिळणार दरमहा मदत

खरिपापूर्वीच बँकेची तयारी सफल
खरीप हंगामापूर्वीच जिल्हा बँकेचे अध्यक्ष राजवर्धन कदमबांडे, संचालक मंडळ, सीईओ धीरज चौधरी यांनी पीककर्ज वाटपाचे नियोजन सुरू केले. त्यात श्री. कदमबांडे यांनी १२ एप्रिलपासून कर्ज वाटपास सुरवात करावी, अशी सूचना दिली. त्यांनी दिलेल्या नियोजनानुसार बँकेने सर्व संस्थांचे कमाल मर्यादा पत्रक मुदतीत मंजूर केले. नंतर सभासदांना रूपे क्रेडिट कार्डमार्फत कर्जवाटप झाले. याबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी समाधान व्यक्त केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.