धुळे जिल्ह्यात म्युकरमायकोसिस उपचारासाठी टास्क फोर्स

ऑपरेशन थिएटरच्या तातडीने निर्मितीसाठी व औषधांसह इंजेक्शनचा साठा उपलब्ध व्हावा
Myocardial infarction
Myocardial infarctionMyocardial infarction
Updated on


धुळे : म्युकरमायकोसिसच्या (Myocardial infarction) उपचारासाठी (Treatment) धुळे जिल्ह्यात टास्क फोर्सची समिती स्थापन (Task Force Committee Establishment) करण्यात आली असून, त्याचा जिल्ह्यातील रुग्णांना फायदा होणार असल्याचे आमदार फारूक शाह (MLA Farooq Shah) यांनी सांगितले.

(dhule district myocardial infarction treatment task force committee establishment)

Myocardial infarction
तयारी तिसऱ्या लाटेची : बालकांसाठी मोहाडीत शंभर खाटा राखीव

कोरोनानंतर आता पोस्ट कोविड म्युकरमायकोसिस आजार प्रचंड वेगाने वाढत आहे. यामध्ये कान, नाक, घसातज्ज्ञांचे सहकार्य महत्त्वाचे असणार आहे. जिल्ह्यात म्युकरमायकोसिसच्या उपचारासाठी टास्क फोर्सचे गठन करण्याच्या व त्यासाठी मॉडेल ऑपरेशन थिएटरच्या तातडीने निर्मितीसाठी व औषधांसह इंजेक्शनचा साठा उपलब्ध व्हावा, यासाठी आमदार शाह यांनी मंत्रालयात आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची भेट घेतली. या वेळी टोपे यांनी मंत्रालयातील व आरोग्य विभागातील अधिकारी तसेच संबंधित जिल्ह्यातील आरोग्याधिकारी यांची मंत्रालयात बैठक बोलावून बैठकीत तत्काळ धुळे जिल्ह्यासाठी म्युकरमायकोसिसवर उपचार व देखरेखीसाठी टास्क फोर्स समिती स्थापन करण्याचे आदेश दिले. तसेच या समितीमार्फत या आजारावर शस्रक्रिया तसेच इंजेक्शन व औषधांचा पुरेसा साठा उपलब्ध करण्याचे तत्काळ आदेशही टोपे यांनी याच बैठकीत दिले.

Myocardial infarction
कोरोना संसर्गाची तीव्रता कमी..पण मृत्यूच्या आकड्यांनी चिंता वाढवली

या संदर्भात आमदार शाह यांनी धुळे जिल्ह्यातील जिल्हा रुग्णालय व भाऊसाहेब हिरे मेडिकल कॉलेजच्या आरोग्याधिकाऱ्यांशी बैठक घेऊन जिल्ह्यासाठी लागणारी औषधे व साधनसामग्रीसाठी विचारणा करून आजारावर येणाऱ्या अडीअडचणींसंदर्भात अधिकाऱ्यांशी विचारविनिमय केला होता. त्याच अनुषंगाने आमदार शाह यांनी तातडीने टोपे यांची भेट घेऊन धुळे जिल्ह्यात वाढणाऱ्या म्युकरमायकोसिस आजारावर कसे नियंत्रण मिळवता येईल, याबाबत चर्चा केली होती. या समितीमुळे म्युकरमायकोसिस बाधित रुग्णांना योग्य उपचार व शस्रक्रियेसाठी येणाऱ्या अडचणी आता सुलभ होणार आहेत. मंत्रालयातील बैठकीस राजेश टोपे, अमित देशमुख, मेडिकल कॉलेजचे सर्व वैद्यकीय अधिकारी व मंत्रालयातील आरोग्य विभागातील अधिकारी उपस्थित होते.
(dhule district myocardial infarction treatment task force committee establishment)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.