कोरोनाचा विळखा ः धुळे जिल्ह्याला गरज ३२ टन ऑक्सिजनची

कोरोनाबाधित रुग्णवाढीबरोबर ऑक्सिजनची गरज वाढल्याने रोज १६ टनप्रमाणे दोन टँकर मिळून एकूण ३२ टन ऑक्सिजन जिल्ह्याला मिळत आहे.
Oxygen
OxygenOxygen
Updated on

धुळे ः जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने शासकीय व खासगी रुग्णालयांना मिळून मेडिकल ऑक्सिजनची मागणीही वाढली आहे. ती पूर्वी सरासरी २३ टन होती. मात्र, काही दिवसांपासून ही गरज ३२.५० टनवर पोचली आहे. त्यासाठी शर्थीचे प्रयत्न करत जिल्हाधिकारी संजय यादव यांनी जिल्ह्यासाठी रोज प्रत्येकी १६ टनप्रमाणे दोन टँकर मिळविण्यात यश मिळविले आहे. इतकेच नाही, तर ऑक्सिजन पुरवठ्याबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी संकटावेळी नंदुरबार, मालेगावलाही मदतीचा हात दिला आहे.

जिल्ह्यात गुरुवारी (ता. १५) रात्रीपर्यंत दुसऱ्या लाटेतील तीन हजार ६८१ कोरोनाबाधित रुग्ण उपचार घेत होते. यात अनेक रुग्णांना रेमडेसिव्हिर इंजेक्शनसह मेडिकल ऑक्सिजन, व्हेंटिलेटरची गरज भासत आहे. हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयास रोज सरासरी १३ टन लिक्विड ऑक्सिजनची गरज भासते. महाविद्यालयाने जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून चाकण (पुणे), गुजरात येथून सरासरी १३ ते साडेतेरा टन ऑक्सिजन मिळविला आहे. उर्वरित १९ टन ऑक्सिजन मिळविण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी कसोशीने प्रयत्न केले. कोरोनाबाधित रुग्णवाढीबरोबर ऑक्सिजनची गरज वाढल्याने रोज १६ टनप्रमाणे दोन टँकर मिळून एकूण ३२ टन ऑक्सिजन जिल्ह्याला मिळत आहे.

बफर स्टॉकवर कटाक्ष

नंदुरबारला तीन टन, तर संकट काळात मालेगावलाही ऑक्सिजनचा पुरवठा केला जात आहे. धुळ्यात गोविंदा कंपनी दहा टन ऑक्सिजनचे रिफिलिंग करते, तर अडीच टन ऑक्सिजन हवेतून गोळा केला जातो. याप्रमाणे एकूण १२.५० टन ऑक्सिजन ही कंपनी पुरविते. उर्वरित जिल्ह्याला गरज असलेला ऑक्सिजन अन्य ठिकाणाहून मिळविला जात आहे. विशेष म्हणजे २४ तासांचा बफर स्टॉक करण्यावर जिल्हाधिकारी यादव यांचा कटाक्ष आहे. काही दिवसांपूर्वी ऑक्सिजनची कमतरता भासली तेव्हा बफर स्टॉकने जिल्ह्यावरील संकट टाळले होते. येथील चार ते पाच खासगी रुग्णालय औरंगाबादहून एका वितरकाकडून ऑक्सिजन मिळवितात. त्यांनाही पुरवठ्यात व्यत्यय आल्यावर तो गुंता जिल्हाधिकारी यादव यांनी सोडविला होता.

ऑक्सिजन बेड असे

जिल्ह्यातील कोविड केअर सेंटर असलेल्या रुग्णालयनिहाय ऑक्सिजन बेडची स्थिती अशी ः धुळे ः देवरे (देवपूर)- आठ, सुधा- आठ, सिद्धेश्‍वर- दहा, तेजनक्क्ष- सहा, जवाहर मेडिकल- १२०, ओम क्रिटिकल- ३०, सेवा सुपर- ३०, लोकमान्य- २०, विघ्नहर्ता- ३३, श्रद्धा- ६५, श्री गणेशा- ३६, अलमासीरा- दहा, साईसुंदर- दोन, दशक- पाच, अंजना- २२, इकरा- नऊ, शिफा- चार, केशरानंद- ३०, समर्थ नारायण- १९, लाबेक- २२, विजयदीप- दोन, साईबाबा- दोन, महाकाली- दहा, आधार- तीन, साई- चार, ओंकार- सहा, यशोदा- सहा, साई मानवता- आठ, विजय हिरे- पाच, सिद्धिविनायक- दहा, अर्चना- दहा, अपूर्वा- दहा आणि हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय- १०२, सिव्हिल- ५७, साक्री ः अकलाडे- आठ, अहिरराव- आठ, सुहारी- १५, निनाद- पाच, साक्री कोविड सेंटर- दहा, शिरपूर ः लाइफलाइन- १२, विघ्नहर्ता- दहा, धन्वंतरी- दहा, जम्बो कोविड सेंटर- २०, दोंडाईचा ः अंकित पाटील- पाच, शिवकृपा- पाच.

ऑक्सिजनयुक्त बेडची स्थिती

(शासकीय व खासगी मिळून)

धुळे शहर एकूण : ७२४

साक्री तालुका : ४१

शिरपूर तालुका : ५२

दोंडाईचा : दहा

जिल्हा एकूण : ८२७

संपादन- भूषण श्रीखंडे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.