धुळे : मेंढपाळांच्या चराई क्षेत्राच्या वादाप्रकरणी वन विभागाच्या (Forest Department) निषेधार्थ ठेलारी समाजातील (Thelari society) ५५ जणांनी येथील वन विभागाच्या कार्यालय (Forest Department Office Dhule) परिसरात मुंडण केले. तसेच वन विभाग मेंढपाळांना जाणीवपूर्वक त्रास देतो, असा आरोप करत ठेलारी महासंघाने अधिकाऱ्यांचे ‘श्राद्ध’ घालत आंदोलन (Movement) केले. त्याची दखल घेतली नाही, तर पंधरा दिवसांत वनाधिकाऱ्यांच्या कार्यालयांना टाळे लावण्याचा इशारा आंदोलकांनी दिला. (forest department office dhule thelari society movement)
मेंढपाळांसाठी असलेले ६८ हेक्टर क्षेत्र कुठले, असा प्रश्न उपस्थित करीत ठेलारी महासंघाने बुधवारी (ता.३०) येथे वन विभाग कार्यालयात पिंडदान करीत मुंडण आंदोलन केले. जिल्ह्यातील अनेक गावांत मेंढपाळ स्थिरावले आहेत. त्यांच्याकडील मेंढ्यांना चारण्यासाठी शासनाने ६८ हेक्टर क्षेत्र देऊ केले. परंतु, ते क्षेत्र कोणते? याबाबत स्थानिक वनाधिकारी स्पष्टीकरण देत नाहीत. मेंढ्या चारताना मेंढपाळांना त्रास दिला जातो. मेंढ्या बेकायदा चारल्या असे सांगून दंड वसूल केला जातो. मेंढपाळांनी त्यांची बाजू मांडण्याचा प्रयत्न केला, तर शासकीय कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल केला जातो. त्यामुळे मेंढ्यांचे पालनपोषण करायचे कसे, असा प्रश्न मेंढपाळांचा आहे.
वन विभाग दाद देत नसल्याने संतप्त ठेलारी समाजाच्या ५५ जणांनी आंदोलन केल्याचे आंदोलक शिवदास वाघमोडे, रामदास कारंडे, दिनेश सरग, मोतीराम गरदरे, ज्ञानेश्वर सुळे, मोहन भिवरकर, विनोद खेमनर, पप्पू थोरात, भारत शिंदे, चंद्रकला मासुळे, रोहन खेमनर, पन्नालाल सूर्यवंशी, पंकज मारनर, प्रवीण खामगळ, नाना ठेलारी, पिंटू भिवरकर, रामचंद्र पडळकर, गोविंदा रूपनर, नाना पडळकर, समाधान ठोंबरे, संदीप वाघमोडे आदींनी सांगितले. ते म्हणाले, की अनेकदा चराई क्षेत्राची मागणी केली. पण, ती न दाखवत वन विभाग अन्याय करीत आहे. त्यामुळे आता आत्मक्लेश करीत मुंडण केले. मागणीबाबत पंधरा दिवसांत अंतिम निर्णय झाला नाही, तर वन क्षेत्रावर ठेलारी महासंघाचे फलक लावत ते मेंढ्या चारण्यासाठी सुरक्षित केले जाईल. पिढ्यान् पिढ्या मेंढ्यांचे पालनपोषण करीत ठेलारी कुटुंब उदरभरण करतात. वन विभागाच्या एककल्ली कारभारामुळे मेंढपाळ त्रासले आहेत. पिंडदान आणि मुंडणाच्या या आंदोलनामुळे आता उपवनसंरक्षक भोसले यांनी उचित निर्णय घ्यावा, असे आंदोलकांनी सांगितले.
आमदार पाटील यांचा पाठिंबा
मेंढपाळांच्या आंदोलनास काँग्रेससह राज्य कार्याध्यक्ष आमदार कुणाल पाटील यांनी पाठिंबा दिला, अशी माहिती माजी आमदार शरद पाटील यांनी दिली. पक्षाचे ज्ञानेश्वर पाटील, बोरीसचे उपसरपंच कुणाल पाटील यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.