धुळ्यात अग्नीतांडव;४० कापड दुकाने आगीच्या भक्ष्यस्थानी

अग्निशमन दल वेळेत आले असते तर बरेच नुकसान टळले असते
Market
MarketMarket
Updated on

धुळे : शहरातील आग्रा रोडवरील (Agra Road) मुख्य बाजारपेठ (Market)असलेल्या पाचकंदील चौकात महापालिकेच्या शंकर मार्केटला सोमवारी (ता. २८) पहाटे साडेचारनंतर आग लागली (Incident of fire). आगीने सुमारे ३५ ते ४० कापड दुकाने विळख्यात लपेटली (Clothing shops burned). अग्निशमन दलाने (Fire brigade) शर्थीचे प्रयत्न करीत सकाळी अकराला आग आटोक्यात आणली. नंतरही ज्वाळा सुरूच होत्या. या घटनेत संबंधित व्यावसायिकांचे सुमारे दोन कोटी रुपयांहून अधिक नुकसान झाल्याची शक्यता आहे. यासंबंधी पंचनाम्याचे काम उशिरापर्यंत सुरू होते. (forty shops were gutted in a fire in dhule city)

Market
भाजपचे भगवान गवळी धुळ्याचे उपमहापौर


पाचकंदील चौकात अरुंद गल्ल्या, अरुंद वाटेत पूर्वीपासून महापालिकेच्या मालकीचे मार्केट थाटले गेले आहे. त्यामुळे आगीसारखी अनुचित घटना घडली तर नियंत्रण मिळविणे सहजासहजी शक्य नाही याची प्रशासनासह सर्वांनाच कल्पना आहे. नेमके सोमवारी पहाटे तसेच घडले. पहाटे पावणेपाचच्या सुमारास चैनी रोडवरील व्यापारी धर्मादास जयस्वाल मॉर्निंग वॉकसाठी घराबाहेर पडले. तेव्हा त्यांना शंकर मार्केटमधून धुराचे लोट निघत असल्याचे दिसले. त्यांनी सुरक्षारक्षकांना माहिती दिली. त्यांनी तत्काळ दुकानमालकांना स्थिती कळविली. त्यांनी मनपा अग्निशमन दल आणि पोलिसांना माहिती दिली. बंब पोचताच आझादनगर पोलिस ठाण्याचे निरीक्षक आनंद कोकरे, शहर पोलिस ठाण्याचे निरीक्षक नितीन देशमुख पथकासह घटनास्थळी दाखल झाले. आग पाहण्यासाठी अनेकांनी पाचकंदील परिसरात गर्दी केल्यामुळे आग विझविण्यात व्यत्यय आला.


काय घडले घटनास्थळी..?
महापालिकेचे शंकर मार्केट केवळ कापड व्यावसायिकांसाठी दिले आहे. बहुसंख्य सिंधी आणि इतर व्यावसायिकांनी तेथे दुकान थाटले आहे. प्रथम ईश्वरलाल कापड दुकानाला आग लागली. अग्निशमन दलास माहिती दिली असता लागलीच प्रतिसाद मिळाला नाही, अशी तक्रार व्यावसायिकांनी केली. तोपर्यंत अनेक दुकानदार घटनास्थळी आले व त्यांनी इतरांच्या मदतीने हाती येईल तो कापडाचा माल सुरक्षित नेला. धुळे शहरासह शिरपूर, दोंडाईचा, साक्री, अमळनेर, मालेगाव येथील बंब मदतीसाठी दाखल झाले. त्यांनी ३० ते ४० फेऱ्यांतून पाण्याचा मारा करीत आग विझविली. तोपर्यंत तिच्या लपेट्यात आलेली ३५ ते ४० दुकाने खाक झाली. अग्निशमन दल वेळेत आले असते तर बरेच नुकसान टळले असते, असे व्यापारी संघटनेचे अध्यक्ष शंकरलाल मदान यांनी सांगितले. आगीचे नेमके कारण समजू शकले नाही. पोलिसांनी प्रथमदर्शनी शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याचा अंदाज व्यक्त केला.

Market
जळगावात खासगी इंग्रजी, सीबीएसई शाळांची मुजोरी


दुकानदारांना अश्रू अनावर
कोरोना, लॉकडाउनमुळे व्यवसाय नाही, त्यात या आर्थिक संकटामुळे मार्केटमधील दुकानदारांना मोठा धक्का बसला आहे. आपली दुकाने डोळ्यादेखत जळताना पाहून अनेक व्यावसायिकांना अश्रू अनावर झाले. तलाठी योगिता चव्हाण, सी. एम. पाटील, मंडळाधिकारी सागर नेमाने, अमृत राजपूत यांनी घटनास्थळी भेट देत पंचनामे सुरू केले आहेत. मदतकार्यात परिसरातील नागरिकांसह नगरसेवक हर्षकुमार रेलन, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष रणजितराजे भोसले, राजेंद्र चौधरी, भाजपचे सचिन शेवतकर आदींनी सहभाग नोंदविला.

कोरोनाच्या संकटकाळात परीक्षा
शंकर मार्केटला लागलेल्या आगीत कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले. कोरोनामुळे दीड वर्षापासून भांडवली गुंतवणूक करूनदेखील व्यवसायाला अपेक्षित चालना मिळाली नाही. आता संपूर्ण दुकानच आगीच्या भक्ष्यस्थानी पडल्याने दुकानदारांना शासनाने भरभक्कम मदत करावी, अशी अपेक्षा घटनेवेळी मदतकार्यात सक्रिय नगरसेवक हर्षकुमार रेलन आणि आपत्तीग्रस्त मनीष वधवा यांनी व्यक्त केली.

Market
खडसेंनी फडणवीसांना करुन दिली भीष्मप्रतिज्ञेची आठवण!

होलसेल दुकानेही खाक
घटनेत विजय टेक्सटाइल्स, सुदर्शन साडी सेंटर, पुनीत क्लॉथ स्टोअर्स, पुनीत फॅशन, देवीदास ओमप्रकाश, जय मातादी क्लॉथ स्टोअर्स, कृष्णा हॅण्डलूम, द्वारकेश क्लॉथ, दीप एंटरप्राइजेस, गिरीश वस्त्र भांडार, शांतिलाल संतोषकुमार, गुरुजी ट्रेडर्स, कैलास टेलर, दुर्गा माँ खादी भांडार, गुरू टेक्सटाइल, कृष्णा होजिअरी, ईश्वलाल द्वारकादास, ईश्वरलाल ओमप्रकाश, टिकमदास नातुमल, रामचंद्र रेहकाराम, मथुरादास टिकनमल आदी होलसेल दुकाने जळून खाक झाली..

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.