कापडणेच्या सुपुत्राची कलाकृती राजभवनात झळकणार

काही चित्रकारांनी मुख्यमंत्री व पंतप्रधान निधीत रक्कम जमा केली, अशी माहिती ख्यातनाम चित्रकार दीपक पाटील यांनी दिली.
कापडणेच्या सुपुत्राची कलाकृती राजभवनात झळकणार
Updated on



कापडणे : राज्यातील प्रसिद्ध आणि राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय प्रसिद्ध चित्रकार (Painter) आणि कला क्षेत्रातील ख्यातनाम कलाकारांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Governor Bhagat Singh Koshyari) यांची भेट घेतली. कोरोना (Corona) काळात राज्यासह देशातील कलाकारांची उपासमार आणि इतर समस्यांवर चर्चा झाली. १ नोव्हेंबरपासून कलादालनेही सुरू होत असल्याने कलाकारांनी समाधान व्यक्त केले.

कापडणेच्या सुपुत्राची कलाकृती राजभवनात झळकणार
धुळेः दोन कोरोनाबळींमुळे धोक्याची घंटा पुन्हा वाजली



चित्रकारांचे दातृत्व
दीड वर्ष कोरोना महामारीमुळे लॉकडाउनमुळे अनेक लोकांवर आर्थिक संकट आले. अशा परिस्थितीत अनेक दानशूर व्यक्तींनी आपल्या परीने मदत गरजूंपर्यंत पोचविण्याचा प्रयत्न केला. यात काही चित्रकारांनी चित्र कमी दरात उपलब्ध करीत, त्यातून येणारी रक्कम गरजू लोकांपर्यंत पोचविली. काही चित्रकारांनी मुख्यमंत्री व पंतप्रधान निधीत रक्कम जमा केली, अशी माहिती ख्यातनाम चित्रकार दीपक पाटील यांनी दिली.


कलाकारांचीही आर्थिक कुचंबणा
कलाकार समाजातील अनेक सामाजिक संस्थांना आर्थिक मदतीसाठी निधी देण्यासाठी चॅरिटी शोमध्ये अमूल्य कलाकृती (चित्र-शिल्प) भेट देतात. हेच चित्रकार मागील दीड वर्ष आर्ट गॅलरी तसेच चित्र विक्री बंद असल्याने त्रस्त आहेत. शहरातील व गाव खेड्यातील अनेक चित्रकारांवर आजही आर्थिक संकट कोसळले आहे. अशा परिस्थितीतही हार न मानता चित्रकार त्यांचे चित्रनिर्मितीचे काम सातत्याने करीत आहेत, अशा भावना चित्रकारांनी राज्यपाल कोश्यारी यांच्याकडे व्यक्त केल्या.


१ नोव्हेंबरपासून आर्ट गॅलरी ओपन
१ नोव्हेंबरपासून राज्यातील संपूर्ण आर्ट गॅलरी उघडत आहेत. दीड वर्षाचा बंद व पुढील कमीत कमी एक ते दोन वर्षांत अनिश्चित कला विक्री आणि यातून चित्रकारांना उद्‍भवणाऱ्या समस्या, गरजू चित्रकारांना शासनाकडून मदत मिळावी, यासाठी आमदार आशिष शेलार यांच्या नेतृत्वाखाली, तसेच ऐरावत आर्ट गॅलरीप्रमुख जयंत पटेल यांच्या पुढाकारातून राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याशी चित्रकार दीपक पाटील, ज्ञानेश्वर ढवळे, रामजी शर्मा, रतन शहा, रमेश थोरात, आशिफ शेख, सोनल अयंगर, समाजसेविका पर्ल तिरंदाज आदींनी चर्चा केली.

कापडणेच्या सुपुत्राची कलाकृती राजभवनात झळकणार
सहकारात राजकारण नको..केवळ बाताच!


कलाकारांच्या समस्यांबाबत सकारात्मक चर्चा झाली. कलाकारांच्या भावना राज्यपाल कोश्यारी यांनी समजून घेतल्या. माझी कलाकृती राजभवनात झळकणार असल्याने समाधान वाटत आहे.
-दीपक पाटील, ख्यातनाम चित्रकार, कापडणे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.