सोनगीर (धुळे) : नातीचे लग्न डोळे भरून पहाण्याची आजीची इच्छा अपूर्णच राहिली. नातीच्या लग्नाच्या आदल्या दिवशीच आजीचे निधन झाले. धुमधडाक्यात लग्नाच्या तयारीवर विरजण पडले. नातेवाईकांच्या डोळ्यात अश्रू पण लग्नाची सर्व तयारी झालेली असल्याने पुढे ढकलणे शक्य नव्हते. एका बाजूला आईचे प्रेत व दुसऱ्या बाजूला कन्येचा विवाह अशी विचित्र परिस्थिती येथील रामेश्वर सैंदाणे यांचेवर आली. (dhule-mother-death-in-daughter-marriage-before-one-day)
एन. जी. बागूल हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाचे कर्मचारी रामेश्वर सुकलाल सैंदाणे यांच्या लाडकी कन्या लक्षिका हिचे निजामपूर (ता. साक्री) येथील मुकुंद नारायण चित्ते यांचे पुत्र विवेक यांच्याशी बुधवारी दुपारी विवाह झाला. परंतु विवाह सोहळ्याच्या आदल्या दिवशी मंगळवारी (ता. १५) सायंकाळी हळद समारंभ होता. पण मंगळवारी दुपारीच रामेश्वर सैंदाणेच्या आई भिकुबाई सुकलाल सैंदाणे (वय ८१) यांचे निधन झाले. अचानक आईचे निधन झाल्याने लग्नाच्या आनंदावर विरजण पडले.
मुहूर्त रोखता येईना; मृतदेह शवपेटीत
लग्न पत्रिका पोहचलेल्या, जेवणाचे आमंत्रण दिले गेले अशा परिस्थितीत काय करावे सुचेना. हृदयावर दगड ठेवून पुढील कार्यक्रम वाद्य वगैरे न वाजवता पार पाडण्यात आले. मयत आईला दोन दिवस शवपेटीत ठेवण्यात आले. बुधवारी दुपारी साध्या पध्दतीने लग्न लागल्यानंतर दुपारी तीनच्या सुमारास आईची प्रेतयात्रा काढण्यात आली.
लग्नानंतर अश्रूंचा बांध फुटला
आईचे निधन झाल्यावर मुलीच्या वडिलांनी तसेच आजीचा आशिर्वाद न मिळाल्याने लग्नाच्या सात फेरे घेतांना नातीने कसेतरी अश्रू लपवले. मात्र लग्नानंतर अश्रूंचा बांध फुटला. दोन दिवसांपासून रोखून धरलेल्या अश्रूंना मोकळी वाट करून दिली. भिकुबाई सैंदाणे या दीपक सैंदाणे, एन. जी. बागूल हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाचे कर्मचारी रामेश्वर सैंदाणे, ग्रामपंचायत सदस्य प्रतिनिधी मोहन सैंदाणे यांच्या मातोश्री तर आनंदवन माध्यमिक विद्यालयाचे शिक्षक गोपाल सैंदाणे यांच्या आजी होत्या.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.