भोलेनाथचे दर्शन घेण्याआधिच भाविकांवर काळाचा घाला; 3 जण ठार

Dhule Accident News: तरुण कन्नड हून उज्जैन येथील महाकाल दर्शनासाठी जात असल्याची माहिती नातेवाईकांनी दिली आहे.
Dhule Accident
Dhule Accident
Updated on

सोनगीर : मुंबई आग्रा महामार्गावरील (Mumbai Agra Highway) बाभळे फाट्याजवळ जलशुद्धीकरण केंद्रासमोर सोनगीर कडून नरडाणा कडे जाणाऱ्या कारचा अपघात (Accident) झाला. अपघातात 3 जण ठार झाले 2 गंभीर तर 3 जण जखमी झाले आहेत. सदर तरुण कन्नड हून उज्जैन (Ujjain) येथील महाकाल दर्शनासाठी जात असल्याची माहिती नातेवाईकांनी दिली आहे. ही (ता. 20) शुक्रवारी रात्री एक वाजेच्या सुमारास घडला. 

Dhule Accident
धुळे पोलिसांनी कर्णकर्कश सायलेन्सर रोलरखाली तुडवले

बाभळे फाट्याजवळ जलशुद्धीकरण केंद्रासमोर सोनगीर कडून नरडाणा कडे जाणाऱ्या M.H. 22.U 7128 क्रमांकाची ही कार पलटली. कार चालकाचा ताबा सुटल्याने पलटून तीनशे मिटर अंतरापर्यंत पलटी होत गेली. अपघातात सचिन सुभाष राठोड (वय 27), गणेश भगवान हिरे (वय. 26), पवन विजय जाधव ( वय. 24), सर्व राहणार कन्नड जि.औरंगाबाद हे ठार झाले असून सागर समाधान पाटील (वय23) , गौरव कांबळे, किशोर राठोड, नवनाथ आण्णा बोरसे, शिवाजी जग्गु जाधव (वय 26) सर्व राहणार कन्नड हे जखमी झाले आहेत.

Dhule Accident
Dhule Accident

भाविक कन्नडचे

हे सर्व तरुण कन्नड येथून श्रावणमास असल्याने उज्जैन येथील भोले महाकाल दर्शनासाठी जात असल्याची माहिती नातेवाईकांनी दिली आहे. शनिवारी सकाळी अप्पर पोलीस अधिक्षक प्रशांत बच्छाव तसेच वाहतूक विभागाचे पोलीस निरीक्षक हेमंतकुमार भामरे, शिंदखेडा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुनील भाबड यांनी अपघातस्थळी भेट दिली. यावेळी पोलीस उपनिरीक्षक गजानन गोटे, एस. आर गांगुर्डे, व्ही. जे बर्डे, विजय पाटील, आदी पोलीस कर्मचारी हजर होते. शिंदखेडा पोलीस ठाण्यात अपघाताची नोंद करण्यात आली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()