धुळे मनपातील कारभाराची उच्चस्तरीय चौकशी होणार

महापालिकेच्या बांधकाम, पाणीपुरवठा, आरोग्य आणि लेखा विभागाबाबत लवकरच विशेष पथक नेमून उच्चस्तरीय चौकशी केली जाणार
धुळे मनपातील कारभाराची उच्चस्तरीय चौकशी होणार
Updated on


धुळे ः कचरा संकलनाच्या ठेक्यावरून (Garbage collection contracts) मनपातील सत्ताधारी भाजपने एमआयएमचे आमदार फारूक शाह (MLA Farooq Shah) यांना डिवचल्यानंतर ते तक्रारीसाठी(Complaints)नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे (Minister Eknath Shinde) यांच्याकडे गेले. त्यावर मंत्र्यांनी मनपातील दोन वर्षांमधील कारभाराची महसूल आयुक्तांकडून चौकशी (Commissioner of Revenue) केली जाईल, असा निर्णय जाहीर केला. या पाठोपाठ शिवसेनेचे महानगरप्रमुख मनोज मोरे यांनीही मंत्री शिंदे यांना गाठले आणि मनपा (Dhule Municipal Corporation) कारभाराबाबत कैफियत मांडली. त्यावरही मंत्री शिंदे यांनी मनपा कारभाराची उच्चस्तरीय चौकशी केली जाईल, असा निर्णय जाहीर केला.

धुळे मनपातील कारभाराची उच्चस्तरीय चौकशी होणार
माफ करा..पण आम्ही घरात बसून काम करू शकत नाही-राज्यमंत्री डॉ. पवार


महापालिकेच्या बांधकाम, पाणीपुरवठा, आरोग्य आणि लेखा विभागाबाबत लवकरच विशेष पथक नेमून उच्चस्तरीय चौकशी केली जाणार असल्याची माहिती नगरविकास मंत्री शिंदे यांनी भेटीत दिली, असे श्री. मोरे सांगितले. त्यांनी नगरविकास मंत्री शिंदे यांना दिलेल्या निवेदनाचा आशय असा ः मनपाची निवडणूक २०१८ मध्ये झाली. त्यात भाजपने ७५ पैकी ५० जागा जिंकत एकहाती सत्ता मिळवली. सक्षम विरोधी पक्ष नसल्यामुळे सत्ताधारी भाजपने मनपा प्रशासनाला हाताशी धरत सर्वच विभागात अनियमित आर्थिक कारभार चालविला आहे. या विरोधात शिवसेनेने वेळोवेळी पाठपुरावा करत पालकमंत्र्यांना पुराव्यासह निवेदने दिली. विविध आंदोलन, निवेदनांच्या माध्यमातून तक्रारी केल्या. मात्र, आयुक्त अजीज शेख यांनी वेळ मारून नेत सत्ताधाऱ्यांना पाठीशी घातले आहे.

धुळे मनपातील कारभाराची उच्चस्तरीय चौकशी होणार
धुळ्यात शिवसेना उपप्रमुखाच्या गावातील पदाधिकारींचा भाजपात प्रवेश

धुळेकरांच्या कमाईतून मनपात संकलित होणाऱ्या कर रक्कमेतून व शासनाच्या विविध योजनांसाठी मंजूर सुमारे ५०० ते ६०० कोटींच्या निधीतील योजना आर्थिक अनियमिततेमुळे अपूर्णावस्थेत आहेत.

धुळे मनपातील कारभाराची उच्चस्तरीय चौकशी होणार
शासनाचे आदेश..गाळेभाडेवरील पाचपट दंड आकारणीचा ठराव रद्द


शहरात साक्री रोडवरील छत्रपती मेडिकल ते श्री कालिकामाता मंदिर रस्ता, कंटेनमेंट झोनसाठी लागणाऱ्या बांबूच्या प्रक्रियेत झालेला घोटाळा, गांधी पुतळा ते ज्योती थिएटरपर्यंतचा काँक्रिट रस्ता, कोरोनामुळे मृत झालेल्यांच्या अत्यसंस्कारांसंबंधी बिले, भूमिगत गटार योजना, पाणीपुरवठा योजना आदी कामांमध्ये झालेल्या घोटाळ्यांच्या चौकशीची मागणी केली आहे. महापालिकेचे अंदाजपत्रक ३० ते ४० टक्के फुगीर असते. तसेच अंदाजपत्रकाप्रमाणे कामे न करता वरवर बिले काढली जातात. निविदा प्रक्रियेबाबत ठेकेदारांची साखळी भेदून काहींनी ऑनलाईन टेंडर भरण्याचा प्रयत्न केला, तर त्याला दमबाजी केली जाते. महापालिकेचा सध्याचा कारभार मनपा जळीतकांडाच्या दिशेने चालला आहे. त्यामुळे विभागवार समिती नेमून चौकशी करावी, अशी मागणी आहे, असे निवेदन श्री. मोरे यांनी नगरविकासमंत्री शिंदे यांना दिले. शिवसेनेचे धुळे- नंदुरबार जिल्हा संपर्कप्रमुख बबनराव थोरात, उपजिल्हा प्रमुख किरण जोंधळे, महानगरप्रमुख मनोज मोरे, माजी नगरसेवक संजय वाल्हे, कुणाल पानपाटील आदी उपस्थित होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()