दुसरा डोस नाही म्हणताच ग्रामस्‍थ संतापले..आणि लसीकरणचं बंद पाडले

नागरिकांना लस देण्याचे ठरले, मात्र सर्व्हर डाऊन असल्याने सर्वांना ताटकळत उभे राहावे लागले
Vaccination
VaccinationVaccination
Updated on



निमगूळ : लसीकरणाचे नियम (Vaccination rules) आरोग्य विभाग (Health Department) वेळोवेळी बदलत असल्याने नागरिकांची फजिती होत आहे. ज्येष्ठ नागरिक (Senior citizen) लस घेण्यासाठी प्राथमिक आरोग्य केंद्रात सकाळपासून रांगेत उभे राहतात. अन नंतर लस आल्यानंतर फर्मान सुटते की आज दुसरा डोस (second dose) मिळणार नाही. फक्त पहिला मिळेल मग दुसऱ्या डोसच्या प्रतीक्षेत बसणाऱ्या नागरिकांना दोन तास बसून घरी जावे लागते, अशी परिस्थिती सर्वत्र असल्याने मनस्ताप सहन करावा लागत आहे. तसेच ऑनलाइन नोंदणीमुळे गावातील ग्रामस्थ लसीकरणापासून वंचित राहत असल्याने ग्रामस्‍थांनी लसीकरण केंद्रावर (vaccination center) गोंधळ घालत मंगळवारी (ता.११) लसीकरण बंद पाडले. (No second vaccination received The villagers closed the vaccination center)

Vaccination
जळगाव जिल्ह्याचा आपत्ती व्यवस्थापन आराखडा तयार करा !

मंगळवारी (ता.११) नियमानुसार अनेक पन्नाशीच्यावर नागरिकांनी प्राथमिक आरोग्य केंद्रावर रांग लागली. सोमवारी (ता.१०) जिल्हा आरोग्य विभागाच्या व्हॉट्स ॲपवर मिळालेल्या परिपत्रकानुसार वेगळी माहिती दिली गेली. त्यातून ज्येष्ठ नागरिकांना काही तास थांबून घरी जावे लागले. जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्या कार्यालयातून नियमावली बदलत असल्याची कल्पना सर्वसामान्यांना नसल्याने गोंधळ निर्माण होतो. मंगळवारी नियमावलीमुळे १८ ते ४४ वयाच्या नागरिकांना लस देण्याचे ठरले, मात्र सर्व्हर डाऊन असल्याने सर्वांना ताटकळत उभे राहावे लागले. ज्यांची ऑनलाइन नोंदणी झाली आहे. त्यांनाच पहिला डोस मिळणार असल्याचे सांगितले गेले, त्यात ऑनलाइन प्रणाली पाहता एकही लाभार्थी निमगूळ गावाचा नव्हता.

गावातील नागरिक संतप्त
गावातील ग्रामस्थ व मुले लशीपासून राहून जातात. बाहेरगावच्यांना लस दिली जाते. या मुद्यावर वैद्यकीय अधिकारी, कर्मचाऱ्यांना ग्रामस्थांच्या रोषाला सामोरे जावे लागले. ग्रामस्थांनी अगोदर गावात लसीकरण करा, अशी मागणी करत वैद्यकीय अधिकारी साक्षी कुवर यांना निवेदन दिले. गावातील लसीकरण पूर्ण होईपर्यंत बाहेरगावच्या नागरिकांना लसीकरण करू देणार नसल्याचा इशारा देऊन लसीकरण बंद केले. दरम्यान डॉ. हितेंद्र देशमुख यांनी प्राथमिक आरोग्य केंद्राला भेट दिली व ग्रामस्थांना समजूत काढण्याचा प्रयत्न केला. मात्र नागरिकांनी गावाचे लसीकरण होईपर्यंत तुमची ऑनलाइन प्रक्रिया तुमच्याकडे ठेवा, अशी ठाम भूमिका घेतली व लसीकरण बंद पाडले.

Vaccination
उत्तराखंडमधील जागेश्वर धाम आहे प्रसिध्द ? कशासाठी तर वाचा !

निमगूळ गाव जिल्ह्यात हॉटस्पॉट म्हणून कोरोनाची सुरवात झाली होती. अनेकांना प्राण गमवावे लागले, अशा स्थितीत तत्काळ गावात लसीकरण पूर्ण व्हायला पाहिजे होते. ते अजूनही झाले नाही. पुन्हा तशी परिस्थिती उद्भवल्यास वरिष्ठ अधिकारी जबाबदार राहतील. तत्काळ गावाचे लसीकरण पूर्ण करावे.
- दीपक बागल, माजी उपसरपंच निमगूळ

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.