ऑक्सिजन लेवल ४५ त्‍यात मधुमेह; तरी तिची कोरोनावर मात

ऑक्सिजन लेवल ४५ त्‍यात मधुमेह; तरी तिची कोरोनावर मात
corona fight
corona fightcorona fight
Updated on

पिंपळनेर (धुळे) : ऑक्सिजन लेवल ४५ पर्यंत खाली आलेल्या कोरोनाबाधित (Coronavirus) प्रियांका कांबडे यांनी भारतमाता रुग्णसेवा समितीच्या सहकार्यामुळे व ग्रामीण रुग्णालयातील डॉक्टरसह स्टाफने (Doctors) केलेल्या प्रयत्नांमुळे कोरोनावर मात केल्याने सर्वत्र त्यांच्यासह समिती आणि डॉक्टर्सचे अभिनंदन होत आहे. (Oxygen Level 45 Diabetes; Overcome her corona though)

कोविड पॉझिटीव्ह असलेल्या प्रियांका कांबडे (वय ३०, मुळगाव काकरपाडा, ता. साक्री. ह. मु. शहापुर) उच्चशिक्षित परिवारातील असून अतिशय प्रतिकूल परिस्थितीत पिंपळनेर ग्रामीण रुग्णालयातील डेडीकेटेड कोविड हेल्थ सेंटर येथे उपचारासाठी भरती झाल्या. सोबत नुकतीच कोविडमधून बरी झालेली आई तर वडील १५ दिवसांपुर्वीच मृत झालेले. अशा परिस्थितीत आई सुवर्णा कांबडे यांनी स्वतः कार चालवून प्रियांकाला रुग्णालयात भरती केले.

corona fight
दुर्देवी: आईचा ऑक्सिजन बेडअभावी मृत्यू; लेकीने केले सॅनिटायझर प्राशन

कारच बनविली रूग्‍णवाहिका

प्रियांकाची ऑक्सिजन लेवल ४५ पर्यंत खाली आलेली त्यात मधुमेह, या परिस्थितीत रुग्णालयातील डॉक्टर्स/नर्सिंग स्टाफ यांनी सकारात्मक राहून उपचार सुरू ठेवले. तर चिंताग्रस्त असलेल्या सुवर्णा कांबडे समितीच्या कार्यकर्त्यांना भेटताच भारतमाता रुग्णसेवा समितीने हव्या त्या मदतीचे आश्वासन दिले. गरज वाटली तेव्हा भोजन, गावातील नातेवाईकांकडून जेवणाचा डबा आणून देणे, एचआरसीटीसाठी साक्रीला जाण्यासाठी त्यांच्याच स्विफ्ट कारची रूग्णवाहिका बनवली. छोट्या ऑक्सिजन सिलिंडरची तात्पुरती व्यवस्था कारमध्येच केली आणि आई लेकीला साक्रीला नेऊन परत आणले.

corona fight
ऑक्‍सिजन, बेडनंतर कोरोनाबाधितांसमोर गोळ्यांची समस्‍या; रुग्णांची प्रकृती खालावतेय

आई व्यतिरिक्‍त कोणीच नव्हते

समितीचाच कार्यकर्ता चालक म्हणून सोबत गेला. सर्व काही व्यवस्थित सुरू असताना मधुनच एकदोन वेळा ऑक्सिजन कमी वाटला म्हणून डॉक्टर्स रिस्क नको म्हणुन व्हेंटिलेटरसाठी पुढे हलवले पाहिजे, असे सांगू लागले. मात्र धावपळ करायला कोणी नाही अशा परीस्थितीत एकटी काय करु, असे त्या माऊलीने सांगताच डॉ. जितेश चौरे यांनी धावपळ झालीच तर आपण सर्वतोपरी प्रयत्न करू, असे आश्वासन दिले. शेवटी तिथेच उपचार सुरू राहिले आणि सर्वांच्या प्रयत्नांना यश येऊन प्रियंकाला डिस्चार्ज मिळाला. यामुळे प्रियांकाच्या आईने समितीच्या हेल्पलाईन नंबरवर कॉल करून कार्यकर्त्यांना रुग्णालयात बोलवत आभार मानले. त्यांनी सख्ख्या नातेवाईकांना इच्छा असुनही मदतीला येता आले नाही. त्यावेळी समितीने सहकार्य केल्याची भावना व्यक्त केली. तसेच कार्यकर्त्यांची धावपळ बघून समितीला सात हजार रुपयांची देणगी देत इतर गरजूंसाठी वापरा, अशी भावना व्यक्त करून त्या मुलीसह प्रसन्न मुद्रेने घराकडे रवाना झाल्या. त्यांच्या चेहऱ्यावरील समाधान व कृतज्ञता पाहुन समितीने केलेल्या कामाचे खरच सार्थक झाल्याचे समितीच्या कार्यकर्त्यांनी सांगितले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.