धुळ्यात सराईत चोरांची टोळी जेरबंद; अनेक गुन्हे उघडकीस

लाख रुपये किमतीचे आयशर वाहन असा एकूण २० लाख ४७ हजार २२४ रुपये किमतीचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला.
Thief Arrest
Thief Arrest
Updated on

धुळे: जिल्ह्यातील साक्री व धुळे तालुक्‍यात शेतीमाल चोरीच्या अनेक घटनांच्या (Incidents of theft) पार्श्‍वभूमीवर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने (Local Crime Branch Squad) केलेल्या कारवाईदरम्यान सराईत चोरांची टोळी जेरबंद करण्यात पथकाला यश आले. या टोळीकडून पोलिसांनी २० लाख ४७ हजारावर किमतीचा मुद्देमाल जप्त केला.

Thief Arrest
धरणगाव नगरपालिकेत कोट्यवधींचा गैरव्यवहार


चिंचपाडा (ता.साक्री) येथील संशयित सतीश छोटीराम गायकवाड व त्याच्या काही साथीदारांकडून शेतीमाल चोरी होत असल्याची खात्रीलायक माहिती पोलिसांना मिळाली होती. त्याअनुषंगाने शोध घेताना शनिवारी (ता.१६) सतीश गायकवाड हा त्याच्या साथीदारांसह धुळे शहरातील अकबर चौकात विना नंबर प्लेटच्या दुचाकीसह उभा असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेला मिळाली. पथकाने सतीश गायकवाड (रा. चिंचपाडा, ता. साक्री), विश्वास अशोक अहिरे (रा.अनकवाडी, ता. धुळे) यांना दुचाकीसह ताब्यात घेऊन सखोल चौकशी केली असता त्यांनी साक्री व धुळे तालुका हद्दीत साथीदार लक्ष्मण काळू सूर्यवंशी (रा.तोरणकुडी, ता.साक्री), अनिकेत गंगाराम बहिरम (रा. बोधगाव, ता. साक्री), अण्णा श्रीराम गायकवाड (रा. चिंचपाडा, ता. साक्री) यांच्या मदतीने कांदा, कापूस, लोखंडी सळई तसेच दुचाकी चोरीची कबुली दिली. त्यांच्याकडून मुद्देमाल जप्त केला. चोरलेला कांदा मालेगाव तालुक्‍यातील मुंगसे मार्केटमध्ये विकल्याचे त्यांनी सांगितले.


दरम्यान, आरोपी सतीश गायकवाड व अण्णा गायकवाड हे आर्म ॲक्टखाली दाखल गुन्ह्यात २०१८ पासून फरारी होते. पोलिस अधीक्षक प्रवीणकुमार पाटील, अपर पोलिस अधीक्षक प्रशांत बच्छाव यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हा शाखेचे पोलिस निरीक्षक शिवाजी बुधवंत, सहाय्यक पोलिस निरीक्षक प्रकाश पाटील, योगेश राऊत, श्रीकांत पाटील, प्रभाकर बैसाणे, संजय पाटील, प्रकाश सोनार, संदीप सरग, सुनील पाटील, योगेश चव्हाण, मयूर पाटील, कमलेश सूर्यवंशी, राहुल गिरी, तुषार पारधी, महेंद्र सपकाळ यांच्या पथकाने ही कारवाई केली.

Thief Arrest
जळगाव : कासमवाडी-सम्राट कॉलनीत दोघांवर चॉपरने हल्ला

जप्त मुद्देमाल असा
एक लाख ७० हजार शंभर रुपये रोख, एक लाख ५५ हजार रुपये किमतीच्या वेगवेगळ्या कंपनीच्या चार दुचाकी, ४५ हजार रुपये किमतीचा नऊ क्विंटल कापूस, ५० हजार १२४ रुपये किमतीचे बांधकामाचे स्टील, २७ हजार रुपये किमतीचे वेगवेगळ्या कंपनीचे चार मोबाईल, १६ लाख रुपये किमतीचे आयशर वाहन असा एकूण २० लाख ४७ हजार २२४ रुपये किमतीचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला. या सर्व चोऱ्यांप्रकरणी विविध पोलिस ठाण्यांमध्ये गुन्हे दाखल आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()