धुळ्यात शिवसेना उपप्रमुखाच्या गावातील पदाधिकारींचा भाजपात प्रवेश

केंद्रीय राज्य मंत्री डाॅ. भारती पवार यांच्या जनआशीर्वाद यात्रा निजामपूर येथे आली असता गावात कार्यक्रम झाला.
shiv sena workers join bjp
shiv sena workers join bjp
Updated on


निजामपूर : केंद्रीय आरोग्य व कुटुंबकल्याण राज्यमंत्री डॉ. भारती पवार (Minister of State Dr. Bharti Pawar) यांच्या जनआशीर्वाद यात्रेनिमित्त ( Janaashirwad Yatra) येथील वाणी मंगल कार्यालयात झालेल्या कार्यक्रमात शिवसेनेचे (Shiv Sena) साक्री तालुका उपप्रमुख त्रिलोक दवे व निजामपूर शहरप्रमुख भय्या गुरव व शिवसैनिकांनी भारतीय जनता पक्षात (BJP) प्रवेश केला. डॉ. भारती पवार उपस्थित होत्या. जिल्हा उपप्रमुखांच्या गावातच शिवसेनेला खिंडार पडल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.

shiv sena workers join bjp
पाण्याचे येणारे संकट ओळखून एकवटले शेतकरी; नदीपात्रात नांगरटी सुरू


बसस्थानकापासून ते वाणी मंगल कार्यालयापर्यंत फटाक्यांच्या आतषबाजीसह वाजतगाजत मंत्री डॉ. पवार यांचे स्वागत झाले. खासदार डॉ. हीना गावित, माजी मंत्री अशोक उईके, विभागीय संघटक लक्ष्मण सावजी, किशोर काळकर, जिल्हा परिषद सदस्य हर्षवर्धन दहिते, भाजपचे जिल्हाध्यक्ष नारायण पाटील, संघटक सरचिटणीस डी. एस. गिरासे, आदिवासी आघाडीच्या प्रदेश चिटणीस लीला सूर्यवंशी, पिंपळनेरचे मंडलाध्यक्ष मोहन सूर्यवंशी, साक्री मंडलाध्यक्ष वेडू सोनवणे, सविता जयस्वाल, डॉ. हरिभाऊ ठाकरे आदी व्यासपीठावर होते.

shiv sena workers join bjp
सातबाऱ्यावरील कालबाह्य "बोझ्यांच"ओझं उतरणार


म्हसाई ट्रस्टचे अध्यक्ष लक्ष्मीकांत शहा, नमो-नमो महिला मोर्चाच्या तालुका उपाध्यक्षा योगिताबेन शहा, प्रा. सविता पगारे, साक्री मंडलाध्यक्षा दीपाली जगदाळे, माजी सरपंच ईश्वर न्याहळदे, भाजपचे जैताणे शहराध्यक्ष भूषण न्याहळदे, मनसेचे तालुकाध्यक्ष योगेश सोनवणे, सचिव गजानन शहा यांनी मंत्री डॉ. पवार यांचा सत्कार केला. पंचायत समिती सदस्य सतीश वाणी यांनी डॉ. हीना गावित यांचा, तर विजय राणे यांनी माजी मंत्री अशोक उईके यांचा सत्कार केला.
केंद्रीय मंत्री डॉ. पवार यांनी मनोगत व्यक्त केले. संदीप मुसळे, श्याम पवार, जितेंद्र सोनवणे, लुकेश भोई, विक्की बदामे, अमित मोहने, सुरेश मोरे, अभिजित भावसार आदींनी भाजपत प्रवेश केला. शिवसेनेने केलेल्या अनैसर्गिक महाविकास आघाडीमुळे व्यथित होऊनच आपण धनुष्यबाण सोडून कमळ हाती घेतल्याचे पक्षांतर केलेल्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले.
माजी पंचायत समिती सदस्य वासुदेव बदामे यांनी प्रास्ताविक केले. प्रा. भगवान जगदाळे यांनी सूत्रसंचालन केले व आभार मानले. जिल्हा कार्यकारिणी सदस्य अजितचंद्र शहा, संजय खैरनार, दशरथ शेलार, शहराध्यक्ष महेंद्र वाणी, मुकेश पाटील, मोहिनी जाधव व कार्यकर्त्यांनी संयोजन केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.