धुळे तालुक्यात कापसावर मरचा रोगाचा वाढला प्रादुर्भाव

धुळे तालुक्यात यावर्षी पुरेसा पाऊस न झाल्याने पेरण्या लांबल्यात. त्यातही बहुतांश शेतकर्‍यांनी दुबार पेरण्या केल्या आहेत.
Cotton
Cotton
Updated on

कापडणे : पावसाळ्याचे महत्वपुर्ण तीन महिने चारच पावसात निघून गेले. पावसाळा (Rain) संपायला अवघा महिना शेष आहे. शेवटच्या महिन्याचे सुगीची धांदल सुरु होते. शेती (Farmer) शिवारात उशिर्‍याच्या दुबार पेरण्या (Sowing) आणि पावसा अभावी पिकांची (Crop) वाढ झालेली नाही. कडधान्याचा हंगाम आलाच नाही. शेतकर्‍यांच्या कपासावर (Cotton) उरलेल्या आशाही धुळीस मिळत आहेत. कापसावर मर, बोंड अळी, करपा आणि लाल्याचा प्रादुर्भाव आदी रोगांचा हल्ला एकाच वेळी पाहायला मिळत आहे. शेतकरी पुरते हतबल झाले आहेत.

Cotton
जालना, जळगावमध्ये अतिवृष्टी; चाळीसगावात अनेक जनावरे वाहून गेल्याची भीती

गळीत हंगाम बोंबलला
धुळे तालुक्यात यावर्षी पुरेसा पाऊस न झाल्याने पेरण्या लांबल्यात. त्यातही बहुतांश शेतकर्‍यांनी दुबार पेरण्या केल्या आहेत. तालुक्यात मुग, उडीद, चवळी या कडधान्याचा बर्‍यापैकी पेरा होता. दुबार पेरणी अन त्यानंतर महिनाभर लांबलेल्या पावसाने कडधान्य पिकांची वाढच झाली नाही. हा हंगाम पुर्णपणे बोंबलला आहे. घरपुरतीसाठीही कडधान्य हाती लागलेले नाही. नगदी पिक आणि सुगीपुर्व बर्‍यापैकी हाती लागल्यास हाती पैसा येतो. मात्र हा हंगाम गेल्याने शेतकर्‍यांच्या माथी निराशाच पडली आहे.

Cotton
टिप देणाऱ्यांची हजारांत बोळवण..आणि अ‍ॅक्शनवाले लाखांत


कापूस मक्यावर आशा पण...
शेतकर्‍यांची कापूस आणि मक्यावर आशा आहे. दोन्ही पिकांची पावसा अभावी पुरेशी वाढ झालेली नाही. कापसावर मर, करपा, बोंडअळी आणि लाल्याचा प्रादुर्भाव वाढत झालेला आहे. बर्‍याचशा शेतांमध्ये कापसाची स्थिती दयनीय झाली आहे. शेतकर्‍यांनी मोठा खर्च करूनही हाथी काहीही लागणार नसल्याने चिंता व्यक्त होत आहे. कापसाच्या नुकसानीचे पंचनामे करण्याची मागणी होवू लागली आहे.

Cotton
गिरीश महाजनांनी खडसेंना दिले आव्हान..तुमची सीडी दाखवाचं



उत्तरार्धाचा पाऊस अन...
आता उत्तरार्धाचा जोमदार पाऊस होण्याकडे शेतकर्‍यांच्या आशा लागल्या आहेत. जोमदार पावसाने नदी नाले दुधडी भरून वाहतील. विहिरी व कुपनलिकांची पाणी पातळी वाढेल. निदान आगामी रब्बी हंगाम तरी चांगला येईल, अशी आशात्मक चर्चा सुरु झाली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()