‘त्या’ अधिकारी, कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल करा

चौकशीत एकूण १०३ सिंचन विहिरींवर नियमबाह्य खर्च झाल्याचे समोर आले.
Fraud
FraudFraud
Updated on


धुळे : महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत (Mahatma Gandhi National Rural Employment Guarantee Scheme) अस्तित्वातील जुन्या विहिरींच्या (Wells) कामांची नियमबाह्य अंमलबजावणी झाल्याने जबाबदार अधिकारी, कर्मचाऱ्यांवर (Officers, employees) गुन्हा (crime case) दाखल करून त्यांच्याकडून शासनाच्या अपव्यय झालेल्या खर्चाची वसुली करावी, असा सक्त आदेश जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वान्मती सी. यांनी (Zilla Parishad Chief Executive Officer Vanmati C) धुळे, साक्री, शिंदखेड्याच्या गटविकास अधिकाऱ्यांना दिला. त्यामुळे अधिकारी, कर्मचारी वर्तुळात खळबळ उडाली आहे. (wells work scam guilty against crime case ceo order)

Fraud
बीएचआर घोटाळा; कंडारेला पळवणारे अन्‌ मदतगार रडारवर


वादग्रस्त सिंचन विहिरींच्या कामांची जिल्हाधिकारी संजय यादव यांच्या सूचनेनुसार अभिलेख तपासणी करण्यात आली. त्यासाठी पाचसदस्यीय समिती नेमली होती. चौकशीत एकूण १०३ सिंचन विहिरींवर नियमबाह्य खर्च झाल्याचे समोर आले. त्यामुळे जिल्हाधिकारी, नाशिक विभागीय आयुक्तांनी नियमानुसार दोषींवर कारवाई करण्याचे निर्देश सीईओ वान्मती सी. यांना दिले.


असे झाले गैरप्रकार
मनरेगांतर्गत लाभ देण्यापूर्वी धुळे तालुक्‍यातील २९, साक्री तालुक्यातील चार आणि शिंदखेडा तालुक्यातील दहा, अशा एकूण ४३ प्रकरणांत संबंधित लाभार्थ्यांशी निगडित सात-बाऱ्यावर सिंचन विहीर कच्ची/पक्की, अशा असयुक्तिक नोंदी आढळल्या आहेत. धुळे तालुक्‍यातील ५९ आणि शिंदखेडा तालुक्यातील तीन, अशा एकूण ६२ सिंचन विहिरींशी निगडित लाभार्थ्यांनी संबंधित गटात कामाच्या मंजुरीपूर्वीच वीजजोडणी केल्याचा धक्कादायक प्रकार चौकशीत पुढे आला. ज्या विहिरींची कोणतीही लाइन आउट न देता कामे झाली आहेत, अशा धुळे तालुक्‍यातील पाच विहिरींच्या कामासाठी अज्ञात व्यक्तीने त्या लाभार्थ्यांच्या नावाचा गैरवापर करून लाइन आउट, जिओ टॅगिंग व मोजमाप नोंदविलेली असल्याचा गंभीर प्रकारही उजेडात आला आहे. यातही महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत ४२२ सिंचन विहिरींना भुवन आणि गुगल ॲपद्वारे प्रशासकीय मान्यता मिळण्यापूर्वी विहीरसदृश खड्डे खोदून ठेवल्याचे चौकशीत निष्पन्न झाले.

Fraud
जळगाव जिल्ह्यात पहिल्या, दुसऱ्या लाटेतील नीचांकी रुग्णसंख्या


निधी उकळण्यासाठी धडपड
या प्रकरणात अनियमितता, गैरप्रकारातून कामांपूर्वी किंवा कामे मार्गी लावल्याचे दर्शवून शासकीय निधी उकळण्याचा प्रयत्न झाल्याचे निदर्शनास येते. यात धुळे, शिंदखेडा, साक्री तालुक्यांत मोठे रॅकेट सक्रिय असल्याची चर्चा आहे. संबंधित अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या संगनमताशिवाय असले उद्योग शक्य नाहीत. त्यामुळे या प्रकारांची गांभीर्याने दखल घेऊन गटविकास अधिकाऱ्यांनी संबंधितांवर गुन्हा दाखल करणे अपेक्षित आहे. गटविकास अधिकारी, विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, सीईओंच्या आदेशाचे पालन करतात की जबाबदारी टाळतात, याकडे सर्वांचे लक्ष असेल.


वान्मती. सी. यांची शिफारस
सीईओ वान्मती सी. यांनी धुळे, साक्री, शिंदखेडा गटविकास अधिकाऱ्यांना सिंचन विहिरीप्रकरणी जबाबदार अधिकारी, कर्मचारी, पदाधिकारी आणि लाभार्थ्यांची फसवणूक करणाऱ्या व्यक्तींविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचा आदेश दिला आहे. तसेच अधिकारी, कर्मचाऱ्यांवर शिस्तभंगविषयक कारवाई करणे आणि त्यांच्याकडून अनियमित कामांसाठी झालेल्या खर्चाची वसुली करण्याचाही आदेश दिला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()