नवलनगर (धुळे) : सन २०२१-२२ या शैक्षणिक वर्षासाठी धुळे जिल्हा परिषद (Dhule zilha parishad) मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी शिक्षण विभागासाठी कोरोना काळात दक्षता घेण्याबाबत व ऑनलाइन, ऑफलाइन शैक्षणिक (Online education) वातावरणाबाबत तीस मार्गदर्शक सूचना दिल्या आहेत. मंगळवार (ता.१५) पासून शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी १०० टक्के उपस्थित राहणार आहेत. गतवर्षी राबवलेल्या विविध उपक्रमांसारखेच या शैक्षणिक वर्षातही ऑनलाइन - ऑफलाइन पद्धतीने विद्यार्थ्यांना अभ्यास करावा लागणार आहे. अध्ययन अध्यापनासाठी नव्या उत्साहाने प्रारंभ करावा, असे आवाहन केले आहे. (dhule-zilha-parishad-education-department-guideline-online-and-offline-study)
गत शैक्षणिक वर्षातील उपक्रम
झूम मीटिंग, गुगल मिट, व्हॉट्स अॅप एज्युकेशन, लिंक शेअर, पीडीएफ निर्मिती, केबल नेटवर्कद्वारे शिक्षण, तंत्र सेतू ॲप दिशा ॲप, यूट्यूब चैनल, प्रथम संस्थेद्वारे रेडिओ कार्यक्रम, एनसीआरटी संचलित ज्ञान गंगा उपक्रम, प्रत्यक्ष गृहभेटी, गृहपाठ देणे, तपासणे स्वाध्याय पुस्तिका, विषय मित्र, गल्ली मित्र, पालक मित्र, ओट्यावरील शाळा, बालरक्षक भेटी असे विविध उपक्रम राबविले होते.
हे आहेत ३० निकष
शाळा व्यवस्थापन समिती सभा आयोजित करून स्थानिक पदाधिकारी व पालक, आरोग्य विभाग यांच्याशी समन्वय ठेवावा. जमा करण्यात आलेल्या पुस्तकातून चांगली पुस्तके विद्यार्थ्यांना वर्गनिहाय वाटप करावे. विद्यार्थी शाळाबाह्य राहणार नाहीत याची दक्षता घ्यावी. सरल, यु-डायस प्रणालीतील माहिती अद्यावत करून आधार अद्ययावत करणे. दिशा या ॲपचा प्रचार प्रसार करण्यात यावा. इ कन्टेन्टची निर्मिती करावी. दाखल पात्र विद्यार्थ्यांची शंभर टक्के नोंदणी करावी. विद्यार्थी लाभाच्या योजना, शिष्यवृत्तीची रक्कम विद्यार्थ्यांच्या खात्यावर वेळीच जमा करावी. शाळेत सॅनिटायझर, मास्क, साबण, थर्मल गन, पल्स ऑक्सीमिटर या गोष्टींची व्यवस्था करावी. सुविधा नसलेल्या विद्यार्थ्यांसाठी ग्रामपंचायतीच्या मदतीने टीव्ही, रेडिओ, संगणक व्यवस्था करण्यावर भर द्यावा. व्हाट्सअप ग्रुप नव्याने तयार करून शिक्षण विभागाने दिलेल्या ३० निकषांचे पालन करणे अपेक्षित आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.