धुळे जिल्ह्यातील थांबलेल्या ९२ कोटींच्या कामांचा मार्ग मोकळा

Dhule Zilla Parishad News :कोरोना व जिल्हा परिषदेच्या पोटनिवडणुकीसाठी आचारसंहिता जाहीर झाल्याने कामे थांबली होती.
Dhule Zilla Parishad
Dhule Zilla ParishadDhule Zilla Parishad
Updated on

धुळे : जिल्हा परिषदेच्या (Dhule Zilla Parishad) बांधकाम विभागांतर्गत (Construction departments) तब्बल ९२ कोटींच्या निधीतून ४४० कामे मार्गी लागत आहेत. त्यानुसार काही कामांचे कार्यादेश दिले आहेत, तर काही कामे निविदास्तरावर आहेत. गट व गणांची पोटनिवडणूक (By-election) स्थगित झाल्याने उठविलेल्या आचारसंहितमुळे कामे होण्याचा मार्ग सुकर झाला आहे.

(dhule zilha parishad ninety crore rupees works green signals)

Dhule Zilla Parishad
धुळे शहरातही वाळू तस्कर सक्रिय

शिक्षण, आरोग्य, महिला व बालकल्याण विभागांची बांधकामे जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाच्या माध्यमातून होतात. त्यानुसार वर्गखोल्या, अंगणवाडी, आरोग्य केंद्र आणि उपकेंद्रांना मंजुरी मिळाली आहे. तसेच रस्त्यांची कामेही मंजूर झाली होती. मात्र, कोरोना व जिल्हा परिषदेच्या पोटनिवडणुकीसाठी आचारसंहिता जाहीर झाल्याने कामे थांबली होती.

पोटनिवडणुकीबाबत ओबीसी जागांवरील आरक्षणाचा वाद सर्वोच्च न्यायालयाच्या पटलावर गेला होता. तसेच कोरोनाच्या संकटकाळामुळे पोटनिवडणूक स्थगित करावी, अशी मागणी विविध पातळीवरून होत होती. त्यानुसार पोटनिवडणूक स्थगित झाली आणि जाहीर आचारसंहिता शिथिल झाली. परिणामी, आता १७ कोटींच्या निधीतून ११७ वर्गखोल्यांचे काम होणार आहे. त्याचबरोबर ४३ अंगणवाड्यांचे काम मंजूर आहे. त्यात आदिवासी क्षेत्रातील १४, तर बिगरआदिवासी क्षेत्रातील २९ अंगणवाड्यांचा समावेश आहे. या कामांसाठी सुमारे चार कोटी रुपये खर्च होतील. या सर्व कामांचे कार्यादेश देण्यात आले आहेत. तसेच १८ कोटी ५० लाखांच्या निधीतून तीन प्राथमिक आरोग्य केंद्रे, तसेच सात कोटी ५० लाखांच्या निधीतून दहा उपकेंद्रे होणार आहेत. ही कामे निविदास्तरावर आहेत. त्याशिवाय ४५ कोटींच्या निधीतून २५२ रस्त्यांची कामे मंजूर झाली आहेत. त्यातून २२२ रस्त्यांच्या कामांचे कार्यादेश देण्यात आले आहेत, असे प्रशासनाने सांगितले.

Dhule Zilla Parishad
आमदारांत रस्सीखेच;ब्रेक टेस्ट ट्रॅक सेंटर भडगाव की चाळीसगावात?


आचारसंहिता शिथिल झाल्यामुळे कामे मार्गी लावण्यात येत आहेत. कार्यादेश दिल्यानंतर तातडीने कामे सुरू होतील. त्याचप्रमाणे निविदास्तरावरील कामे मार्गी लावण्याचे प्रयत्न होत आहेत.
-डी. एस. बांगर, कार्यकारी अभियंता, बांधकाम विभाग, जि.प., धुळे

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()