भुसावळ : तापी नदी पात्रात प्रति सेकंद ९१ हजार ५४९ क्युसेक्सने पाण्याचा विसर्ग तापी नदीत करण्यात येत आहे. यामुळे तापी नदिला पुर सदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे तापी नदी काठावरील नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
रावेर तालुक्यात ५ कोटींचे नुकसान
रावेर तापी व पूर्णा नदीला आलेल्या पुरामुळे हतनूर धरणाचे पाणी तालुक्यातील नऊ गावातील शेती शिवारात घुसल्यामुळे केळी, कापूस, पेरू या पिकांचे सुमारे साडेपाच कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अहवाल वरिष्ठांना सादर करण्यात आला. सततच्या पावसामुळे पंचनाम्यात अडथळा निर्माण होत आहे. तालुक्यात ऐनपुर, विटवा, निंबोल, सांगवे, थेरोळा, निंभोरासिम, पातोंडी, खिरवड, नेहेते या नऊ गावातील केळी, कापुस व पेरु आदि १९६ हेक्टर क्षेत्रातील पिकांचे सुमारे पाच कोटी, ६३ लाख रूपये नुकसानीचा प्राथमिक अहवाल कृषी व महसुल विभागा तर्फे वरिष्ठांना पाठवण्यात आला आहे. दरम्यान वस्तुनिष्ठ पंचनामे करण्यास सुरुवात झाली असून यात पावसाचा अडथळा येत आहे.
जामनेर तालुक्यात नदीपात्रात वाहून
जामनेर : तालुक्यात सुरु असलेल्या संततधार पावसामुळे कांग नदीला पुर आला आहे. सकाळी नदी काठालगत शौचाला गेलेला साठ वर्षीय इसम पुरात वाहून गेला आहे. गेल्या दहा-बारा दिवसांपासुन पावसाच्या संततधारेमुळे तालुकाभरातील जनजिवन पुर्णपणे विस्कळीत झाल्याचे दिसते. शेतांमधे पाणी मोठ्या प्रमाणात असल्याने ओल कायमच आहे, अशात शेतीची कामे पुर्णपणे थंडावली आहेत. पिकांना खतांची मात्रा देण्यासाठीही उसंत मिळत नाही तर दुसरीकडे कोळपणी-निंदणीसाठीच्या कामांनाही ब्रेक लागला आहे.गेल्या आठवडाभरापासुन शेतमजुरही रिकाम्या हाताने घरी बसुन आहेत.
अमळनेरमध्ये मुसळधार
अमळनेर : संततधार पावसाने शहरासह तालुक्यातील जनजीवन विस्कळीत झाले. नागरिकांनी घरातच राहणे पसंत केले आहे. बोरी नदीला अद्याप पूर आलेला नाही. ग्रामीण भागात अनेक मातीच्या घरांची पडझड झाली. यात वावडे एक घर, लोण बुद्रुक दोन, लोणचारम एक व शहापूर येथे एक घर कोसळले आहे. अमळनेर शहरातील सखल भागामध्ये पाणी साचले आहे. अनेक रस्त्यांवर डबके साचले असून प्रवाशांची तारांबळ उडत आहे.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.