मेहुणबारे (ता.चाळीसगाव) : केवळ स्वतःच्या कुटुंबातील व्यक्तींची काळजी घेणे, हेच आपले इतिकर्तव्य नसून, बसमध्ये ४५ हून अधिक जणांचा जीव एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी सुखरूपपणे नेण्याची कामगिरी लांबे वडगाव (ता. चाळीसगाव) येथील सूनबाईने स्वीकारली आहे. मुंबई येथे महापालिकेत चालक असलेल्या पतीच्या पावलावर पाऊल ठेवत या सूनबाईने राज्य परिवहन महामंडळाच्या जिल्ह्यातील पहिल्या महिला चालक ठरल्या आहेत. सुमारेअठ्ठावीस वर्षीय तरुणी आपल्या कळमडू या माहेर व लांबे वडगाव या सासरसाठी कौतुकाची ठरली आहे.
राज्यातील विविध विभागांतून तब्बल १६२ महिला बसवाहक- चालक झाल्या आहेत. या महिलांचे विविध विभागांत प्रशिक्षण सुरू आहे. लांबे वडगाव (ता. चाळीसगाव) येथील सूनबाई असलेल्या शुभांगी कारभारी केदार- मोरे यांना जिल्ह्यातून पहिल्या महिला बसवाहक- चालक झाल्या असल्याचा मान मिळाला आहे. शुभांगी केदार (मोरे) यांचे तीन फेब्रुवारीपासून औरंगाबाद येथे प्रशिक्षण सुरू आहे. प्रशिक्षण ३६५ दिवसांचे असल्याचे त्यांनी सांगितले.
हेपण वाचा - सुरक्षित प्रवासाची हमी नावालाच... एसटीचे 462 अपघात
पतीच्या पावलावर पाऊल!
कळमडू (ता. चाळीसगाव) गावाची कन्या शुभांगी यांचा विवाह २०१५ मध्ये लांबे वडगाव येथील तरुण सूरज मोरे यांच्याशी झाला. सूरज मोरे वसई-विरार महापालिकेत दोन वर्षांपासून चालकपदावर आहेत. पतीच्या पावलावर पाऊल ठेवून शुभांगी यांनी चालक म्हणून ‘एसटी’त मिळालेली संधी सोडली नसून, पतीने वेळोवेळी केलेले मार्गदर्शन त्यांना मोलाचे ठरले आहे. पतीबरोबर शुभांगी यांचे वडील कारभारी केदार हे वीज वितरण कंपनीत नोकरीस असून, त्यांनीदेखील मुलीला प्रोत्साहन देत तिच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले.
नोकरी सोडून ‘एसटी’ची स्टेअरिंग!
शुभांगी ‘डीएड’ पदविका व कला पदवीधारक आहेत. त्या लग्नापूर्वीही चाळीसगाव येथे इंग्लिश स्कूलमध्ये शिक्षिका म्हणून काम केले. लग्नानंतरही हल्ली मुक्काम असलेल्या मुंबई (गोरेगाव) येथे खासगी संस्थेत शिक्षिका म्हणून नोकरी करीत होत्या. पतीच्या खांद्याला खांदा लावून त्यांनी घेतलेला ‘एसटी’त नोकरीचा वसा स्वीकारला. ही दोन्ही कुटुंबासाठी कळमडू व लांबे वडगाव या गावांसाठी ही अभिमानाची बाब असल्याने ग्रामस्थांनी आनंद व्यक्त केला.
शुभांगी यांचे गिरणा विद्यालयात पाचवी ते बारावीपर्यंतचे शिक्षण झाले आहे. शिक्षक एम. एस. पारेराव यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले असून, या शिस्तप्रिय शाळेमुळेच मी आज घडली असल्याचे शुभांगी केदार यांनी यावेळी सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.