Dhule Fortified Rice : केंद्र शासनाकडून शैक्षणिक वर्ष सन २०२१-२२ पासून फोर्टीफाईड तांदळाचा प्रथमच पुरवठा केला जात आहे.
कापडणे : राज्यामध्ये कोविड-१९ (Covid-19) च्या प्रादुर्भावामुळे शाळा बंद आहेत. विद्यार्थ्यांना शालेय पोषण आहार योजने (School nutrition diet scheme) अंतर्गत शिजविलेल्या आहाराचा पुरवठा केला जात नाही. केंद्र शासनाच्या (Central Government) मार्गदर्शक सूचनांनुसार योजनेअंतर्गत अनुज्ञेय तांदूळ व आहार खर्च मर्यादेमध्ये डाळी व कडधान्य विद्यार्थ्यांना वितरीत केले जात आहे. आता त्यांना फोर्टीफाईड तांदूळ (Fortified rice) प्रथमच पुरविण्यात येत आहे. पुरवठा करण्यात आलेल्या तांदूळामध्ये काही प्रमाणात तांदूळ फोर्टीफाईड आहे. हा नियमित तांदूळापेक्षा थोडासा पिवळसर आहे. त्यामुळे पालकांनी मनामध्ये संभ्रम निर्माण करू नये, असे आवाहन शिक्षण विभागाने (Department of Education) केले आहे.
केंद्र शासनाकडून शैक्षणिक वर्ष सन २०२१-२२ पासून फोर्टीफाईड तांदळाचा प्रथमच पुरवठा केला जात आहे. फोर्टीफाईड तांदूळ व नियमित तांदूळ याचे प्रमाण १:१०० आहे. म्हणजेच पुरवठा करण्यात आलेल्या तांदळामध्ये फोर्टीफाईड तांदूळाचे प्रमाण १ किलो मध्ये १० ग्रॅम या प्रमाणात आहे.
तांदुळात ही आहेत पोषक घटक..
विद्यार्थ्यांच्या आहारामधील सूक्ष्म पोषकतत्वांची कमतरता भरून काढण्याकरीता फोर्टीफाईड तांदूळ देण्यात येत आहे. यात tron, folic acid and Vitamin B१२ तसेच Zinc Vitamin A, Vitamin ४९,३२,B५.B६ या पोषक घटकांचा (Micronutrients) समावेश करून फोर्टीफाईड तांदूळ बनविण्यात आलेला आहे. विद्यार्थ्यांना अधिकची पोषकतत्वे मिळण्याच्या दृष्टीने तांदूळ अत्यंत उपयुक्त आहे.
पाण्यात का तरंगतो हा तांदुळ
प्रक्रीया करण्यात आलेल्या फोर्टीफाईड तांदळाचे वजन हे नियमित तांदळापेक्षा कमी असते. त्यामुळे हा तांदूळ पाण्यामध्ये वर तरंगतांना दिसून येतो. हा तांदूळ पिवळसर रंगाचा दिसत असेल आणि पाण्यामध्ये तांदूळ भिजू घातल्यानंतर त्यापैकी काही तांदूळ पाण्यावर तरंगत असल्याचे निदर्शनास आल्यास गैरसमज करण्यात येऊ नये, असेही परीपत्रकात नमूद केले आहे. दरम्यान फोर्टीफाईड तांदूळ नियमित पध्दतीने शिजविण्यात यावा. यासाठी कोणत्याही प्रकारची वेगळी कार्यपध्दती अवबलविण्याची आवश्यकता नाही, असे कळविले आहे.
तो प्लॅस्टीक तांदुळ नाही...
राज्यामध्ये प्रथम पालघर व अहमदनगर जिल्ह्यांमध्ये प्लास्टीकचा तांदूळ पुरवठा केल्याच्या तक्रारी झाल्यात. शाळा स्तरावरून तांदूळाचे नमुने संकलित करून प्रयोगशाळा तपासणी करण्यात आलेली आहे. याबाबत भारतीय अन्न महामंडळाकडून देखील अभिप्राय घेण्यात आले असून, हा तांदूळ प्लास्टीकचा नसून फोर्टीफाईड तादूळ असल्याचे निष्पन्न झाले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.