नंदुरबार : गेल्या वर्षी राज्यातील आश्रमशाळा (Ashram School) बांधकामासाठी ५०० कोटींपेक्षा जास्त, तर यंदा ६०० कोटींपेक्षा जास्त निधी मंजूर केला आहे. तसेच कर्मचारी वसाहतीसाठी पुढील वर्षात तरतूद करण्यात येईल, अशी माहिती आदिवासी विकासमंत्री ॲड. के. सी. पाडवी (Minister Adv. K. C. Padvi) यांनी दिली. ते एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प (Tribal development), तळोदांतर्गत अक्कलकुवा तालुक्यातील बर्डी शासकीय आश्रमशाळा येथे उभारलेल्या मुलींच्या वसतिगृह इमारतीच्या उद्घाटनावेळी बोलत होते.
(ashram school buildings two years eleven hundred crore funds)
या वेळी जिल्हा परिषद अध्यक्षा सीमा वळवी, समाज कल्याण सभापती रतन पाडवी, महिला व बालकल्याण सभापती निर्मला राऊत, माजी मंत्री पद्माकर वळवी, दिलीप नाईक, जिल्हा परिषद सदस्य सी. के. पाडवी, रूपसिंग तडवी, कार्यकारी अभियंता डी. बी. बागूल, प्रकल्प अधिकारी अमोल मेतकर, तहसीलदार रामजी राठोड आदी उपस्थित होते.
विद्यार्थ्यांसाठी चांगली सुविधा
अॅड. पाडवी म्हणाले, ‘‘इमारती उभ्या करण्यासोबतच गुणवत्तापूर्ण शिक्षणावर भर देणे गरजेचे आहे. त्यासाठी अध्यापन पद्धतीत बदल करीत नावीन्यपूर्ण उपक्रम राबवावे लागतील. आदिवासी विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी सहाय्य करणार आहे. विद्यार्थ्यांनी शैक्षणिक सुविधांचा लाभ घेऊन उच्चशिक्षित व्हावे आणि गावाचा विकास घडवून आणावा. वसतिगृह इमारतीमुळे विद्यार्थ्यांसाठी चांगली सुविधा निर्माण झाली आहे. बर्डी आश्रमशाळेची कामगिरी नेहमीच चांगली राहिली आहे. कोरोनाच्या संकटातही विद्यार्थ्यांची संख्या अधिक होती. स्थानिक लोकप्रतिनिधी आणि ग्रामस्थांनी गावाच्या विकासासाठी एकत्रितरीत्या चांगले काम केले आहे. शिक्षकांनी विद्यार्थ्यांना कोरोनाविषयक माहिती द्यावी आणि विद्यार्थ्यांनी मार्गदर्शक सूचनांचे पालन करावे, असे आवाहन त्यांनी केले. दरम्यान, पालकमंत्री पाडवी यांच्या हस्ते वसतिगृह परिसरात वृक्षारोपण करण्यात आले. एमबीबीएस शिक्षण पूर्ण करणाऱ्या बर्डी आश्रमशाळेचा विद्यार्थी सायसिंग वसावे यांचा मंत्री पाडवी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
तेरा इमारतींचे काम सुरू
तळोदा प्रकल्पांतर्गत १३ इमारतींचे काम सुरू आहे. आठ इमारतींच्या कामाला मंजुरी मिळाली आहे, अशी माहिती श्री. मेतकर यांनी दिली. मुला-मुलींच्या वसतिगृह इमारतींचे काम वेगाने पूर्ण करण्यात येत असल्याची माहिती श्री. बागूल यांनी दिली.
या आहेत सुविधा
-बर्डी येथील इमारतीसाठी चार कोटी १२ लाख खर्च
-संरक्षण भिंतीचे कामही करण्यात आले आहे
-वसतिगृह इमारतीत ७५ मुलींसाठी सुविधा
-मनोरंजनासाठी सभागृह
-अधीक्षक निवास
-सिकरूम, अभ्यास कक्ष
-भोजनकक्ष आदी सुविधा
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.